दवबिंदु १ - पानांवरचे
नमस्कार मंडळी!
गेल्या आठवड्यात आमच्या विभागाच्या वार्षिक परिषदेनिमित्त कर्नाळा येथे जायचा योग आला. तेथे दोन दिवस दोन रात्री मुक्काम होता. दुसर्या दिवशी सकाळी समोरच्या हिरवळीवर नजर गेली आणि त्या लुसलुशीत हिरवळीवर अनवाणी चालायचा मोह अनावर झाला. पावलांचे मनसोक्त लाड होत असताना नजर गवतावर चमचमणार्या दवबिंदुंवर गेली. ताबडतोब खोलीवर येउन कॅमेरा उचलला आणि मग एक तास कसा गेला ते समजलेच नाही. गवताच्या पात्यावरचे टपोरे थेंब, पानावरचे नाजुक थेंब, मोठ्या पानांवरचे स्तब्ध थेंब, इवल्याश्या दुरंगी गवत पातीवर हीर्यासारखे लखलखणारे थेंब... किती चित्रे टिपली तरी कमीच होती.
त्यात मला बरी वाटलेली ही चित्रे.
मिसळपाव

प्रियकर सॅम लुईसशी(जॉन गेविन) लग्न करण्यासाठी पैशाची आत्यंतिक जरूरी असलेली मरियन क्रेन (जेनेट लाय) तिच्या ऑफिसमधून चाळीस हजार डॉलर्सचा अपहार करून स्वतःच्या कारने पसार होते, वाटेत एका पोलीस डिटेक्टीव्ह द्वारे पाठलाग होत असल्याचे लक्षात आल्यावर जुनी कार विकून ती दुसरी कार विकत घेते.
अंधार्या रात्री तूफान पावसात कार चालवण्याऐवजी ती एका आडबाजूला असलेल्या बेट्स मॉटेलमध्ये उतरायचे ठरव
बहुचर्चित (?) असा मोरया चित्रपट परवा पाहण्यात आला. झेंडा ह्या सो कॉल्ड वादग्रस्त चित्रपटानंतर अवधूत गुप्ते ह्यांचा हा पुढला चित्रपट. बर्यापैकी कथा, तरुणाईचा फ्रेश लुक आणि दमदार अभिनय ह्यामुळे एकूणच झेंडा आवडून गेला होता. काही काही पंचेस आणि संवाद दाद देण्याजोगे होते, तर काही प्रसंग वाखाणण्याजोगे. एकुणात काय तर झेंडामुळे 'मोरया' बद्दलच्या अपेक्षा थोड्या का होईना उंचावलेल्या होत्या.
हॉरर आणि थ्रिलर चित्रपटांमध्ये कोरिअन चित्रपट हे कायमच स्वतःचा असा एक वेगळा दर्जा टिकवून राहिलेले आहेत. ह्या चित्रपटांच्या यादीतलाच एक अप्रतिम चित्रपट म्हणजे अकॅशिआ. अकॅशिआ म्हणजे छोटी छोटी पिवळी फुले येणारा एक वृक्ष.
डॉक्टर किम आणि त्यांची पत्नी मी-सूक हे विनापत्य दांपत्य.