Skip to main content

विरंगुळा

केल्याने देशाटन, पंडित-मैत्री, 'सभेत संचार'............

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 07/12/2011 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल स्पर्धा कोण वाढली आहे. वर जाण्यासाठी जो तो धडपडतोय. आता जे हुषार आहेत त्यांच ठिक आहे पण आमच्या सारख्यांच काय? आणि आजकाल वर चढायला हुषारी पुरतेच असही नाही. मग मोठ्ठ व्हायचं असेल तर काय करावं बर? आहेत, त्यालाही उपाय आहेत. एक उपाय मागे मी इथे सांगितला होता. आता दुसरा सांगतो. चारचौघात आपल वजन वाढवायच असलं, महत्व प्रस्थापित करायच असल तर मग काहीतरी वेगळं कराव लागतं. थोडक्यात आपणच आपल्याला मोठ कराव लागतं. ते कस? अहो हे कलियुग आहे, बोलणाऱ्याचे दगड खपतात आणि न बोलणाऱ्याच सोनही खपत नाही म्हणे. कस खपणार?

एवरु लेरनी

लेखक अन्या दातार यांनी मंगळवार, 06/12/2011 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
काही गोष्टींचे मोल ती गोष्ट ज्याच्याकडे आहे त्याला जितकी कळते त्याहून चांगल्या तर्‍हेने ती गोष्ट ज्याच्याकडे नाही त्याला उमजत असावी. आईचे प्रेम म्हणजे काय? ममता म्हणजे काय? या गोष्टी कधी सांगून कळण्यासारख्या असतात काय? तर एखाद्या अनाथ म्हणून वाढलेल्याला ही जाणीव प्रकर्षाने होत असेल. असो, सांगायचा उद्देश हा, की परवा आमच्या लाडक्या टॉलिवूड मधील एक निरंजन हा चित्रपट परत बघत होतो.

डाव

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 06/12/2011 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळचं कोवळं सोनसरी ऊन चहूकडे पसरले होते. निंबाळकरांच्या वाड्यासमोरच्या हौदात त्या उन्हाचे कवडसे पडुन उन उन हिरे चमकत होते. कधी काळी ज्या वाड्यात हिर्‍यांचा लखलखाट असायचा तिथे आता या हिर्‍यातच समाधान मानून घ्यायला लागत होते. वाड्यासमोरच्या सैलसर मो़कळ्या पटांगणात निंबाळकरांचे दोन चार बैल चरत होते. पलीकडेच नुकतीच पाडसाला जन्म दिलेली गौरा गाय पाडसाला दूध पाजत होती. निंबाळकर तसे जुन्या वळणाचे त्यामुळे पाडसाचे दूध त्यांनी हिरावून घेतले नव्हते. बाकी पटांगणात गावातल्या कुठल्याही घरात असतो तसा आणि तितकाच पसारा पडला होता.

'डर्टी पिक्चर' : उलाला...उलाला...उलाला...उलाला

लेखक सोत्रि यांनी शुक्रवार, 02/12/2011 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
बराच गाजावाजा करत आज एकदाचा ’डर्टी पिक्चर’ झळकला. फ़र्स्ट डे फ़र्स्ट शो असला भक्तीभाव कधीच नव्हता. सध्या जास्त काही कामधाम नाही त्यात शुक्रवार, त्यामुळे फ़र्स्ट डे फ़र्स्ट शो नाही पण फ़र्स्ट डेला पिक्चर टाकता आला. एका सी ग्रेड अभिनेत्री, सिल्क स्मिता, हीची शोकांतीका पडद्यावर दाखवली. पिक्चर मधे विषेश तसे काही नाही. तसे काही नाही म्हणजे, चांगली पटकथा, उत्कृष्ट दिग्दर्शन, उच्च निर्मीतीमुल्य वगैरे असले काही. साधी सरळधोपट कथा आहे. तसा 'आंबटशौकीन' मसाला भरपूर आहे. एका खेड्यातली लहान मुलगी जीला मोठ्या शहराचे आकर्षण आहे आणि तीची आई तीला शहरात नुसता झगमगाट आहे जो तिच्यासाठी चांगला नाही हे सांगत असते.

कोलावरी कोलावरी डी..

लेखक धमाल मुलगा यांनी शुक्रवार, 02/12/2011 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
एक दिवस असाच आपला घरी बसून निवांत टिवल्याबावल्या करत होतो. तेव्हढ्यात इमारतीमधले वय वर्ष ७-८ असे एक बालकृष्ण फिरत फिरत आमच्या घरी प्रवेश करते झाले. एंट्रीलाच सप्तक लाऊन टाळ्या घेणार्‍या संगीतनाटकातल्या कलाकारासारखं हे महाराज गात आले.. "व्हाय धिस कोलावरी कोलावरी डी". मी चमकुन त्याच्याकडं पाहिलं, तर ह्याला कशाचं काहीच नाही. गातोय आपला जोरजोरात. काय ही पोट्टी, काय काय पाहतात त्या टिव्हीवर, कळो न कळो, आपलं म्हणतच सुटायचं! मग मीच खेकसलो, " एऽ गप रे. तुझं वय काय, तू गातोयस काय? आँ? जरा चार चांगल्या गोष्टी ऐकाव्या माणसानं." त्या बाळासाहेबांनी एकदम 'अरे!

मुल्ला नसीरुदीन

लेखक मन यांनी शुक्रवार, 02/12/2011 12:12 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसापूर्वीच मीमवर "मुल्ला नसरुद्दिनच्या कथा"(http://www.mimarathi.net/node/3298) पाहून पुन्हा लहानपणीचे दिवस आठवले. उन्हाळ्याचे सुट्ट्यात खेळून दमलो,थकलो, की घरी येउन मस्त कलंडून जात असू. कधी कधी एखाद्या शांत दुपारी निव्वळ आजूबाजूचे पस्ख्यांचे आवाज, शेजारच्या दाट झाडीत लपलेली वानरे,हळुवार येणारी झुळूक्,दूरून जाणार्‍या तांबड्या गायींच्या गळ्यातला घंटेचा नीरव शांततेला मंजूळ आवाज, व त्याला निरखणारे आमचे बालमन असा योग जुळून मस्त तंद्री लागे.

आत्याबाईला मिशा असत्या तर ...

लेखक आनंद घारे यांनी शुक्रवार, 02/12/2011 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
आत्याबाईला मिशा असत्या तर ... तिला 'काका' म्हंटले असते. ही म्हण माझ्या लहानपणी खूप प्रचलित होती. कदाचित मी जरा जास्तच चौकस (किंवा आगाऊ) असल्यामुळे नाही नाही ते प्रश्न विचारून मोठ्यांना भंडावून सोडत असेन आणि त्यामुळे वैतागून ते लोक मला ही म्हण वरचे वर ऐकवत असतील. 'आत्या' म्हणजे पित्याची बहीण म्हणजे ती बाईच असणार आणि 'काका' हा पित्याचा भाऊ असल्याने बुवाच असणार हे या शब्दांच्या व्याख्यांवरून स्पष्ट होते. हिंदी भाषेत आत्याला 'बुवा' म्हणतात हे मी पहिल्यांदा ऐकले तेंव्हा माझी हंसून हंसून पुरेवाट झाली होती.

वाट !!

लेखक स्पंदना यांनी बुधवार, 30/11/2011 08:07 या दिवशी प्रकाशित केले.
वाटा तश्या अनेक असतात. प्रत्येकाची आपापली वेगळी असते. वाटा फ़ुटतात, वाटा हरवतात, वाट मिळते, वाट सापडते. वाट पाहिली जाते, वाट दावली जाते, अन वाट लावलीही जाते. कधी कधी आपल्याआपण वाट लागतेही. वाटा चोखाळल्या जातात, जोखल्या जातात. वाट वळणाची असते, वाट निसरडी असते, कधी वाटा वेगळ्या होतात, कधी वाट वाकडी करुन येण होत, अन कधी वाकड्या वाटेला जाण ही होत. कुणी आपापल्या वाटेने जात असतो, कुणास वाट दाखविणारा भेटतो, कुणी वाट अडविणारा असतो. कुणी वाट राखतो, कुणी वाट मारी करतो. कधी कधी वाटेला जायच नसत.गप आपापली वाट धरायची असते. वाटेला धरुन चालायच असत. तश्या वाटा तुम्ही आम्ही खुप पाहिलेल्या असतात.