मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विरंगुळा

दोसतारः शाळेत लग्न लागते (१)

विजुभाऊ ·
सकाळपासून वर्गातली सगळीच शांत आहेत. तो नेहमी फरफर्‍या स्टोव्ह सारखा येणारा मुलांच्या बडबडीचा आवाज ही कमी येतोय शाळेत सतत काही ना काही तरी व्हायला हवे. रोज नुसते अभ्यास ,लहान सुट्टी, मधली सुट्टी , खेळाचे तास असे करत बसलो की कंटाळा येतो. प्रत्येक तासाला काही ना काही शिकवत असतातच पण तरीही. कितीही आवडत असली तरी बटाट्याची काचर्‍याची भाजी रोज खाऊन कंटाळाच येणार की. सोबत लोणचे , कारळ्याची नाही तर लसुण खोबर्‍याची चटणी तरी हवीच. पण हे शाळेत म्हणायचे म्हंटले की भुगोलाचे भामरे सर म्हणतात. पृथ्वी गोल आहे. तुम्ही कुठूनही निघा , कोणत्याही दिशेने प्रवास करा.

आणि माऊंट किनाबालू सर झाला...

सोत्रि ·

माउंट किनाबालू, ईस्ट मलेशिया ह्या बेटावरील (बोर्निओ आयलंड) साबा ह्या राज्यातला, मलेशियातील आणि साऊथ ईस्ट आशियातील सर्वात उंच पर्वत आहे. आणि, जगातील बेटांवर असलेल्या पर्वतांमध्ये जगात तिसऱ्या नंबरचा उंच पर्वत; ज्याची समुद्रसपाटीपासूनची उंची 4095 मीटर आहे. गिर्यारोहकांमध्ये चढाई करण्यासाठीचं एक मानाचं नाव आहे माउंट किनाबालू (स्थानिक भाषेत गुनुंग किनाबालू) .

सैरभैर डायरी - २.१

कपिलमुनी ·
आयुष्यात काय काय गंमती जमती झाल्यात चाळीशी नंतर याच्या आठवणी लिहाव्यात आता असा विचार केला. यात सलगता काही नाही. सामान्य माणसाच्या आयुष्यातील सामान्य घटना ! पहिल्या भागाला प्रतिसाद देणार्यांचे आभार .

५- तेरी नजरो से आज नजर मिलाना चाहती हु

विजुभाऊ ·
माईदेखील पोटुशी होती. त्यामुळे तीला यायला जमले नव्हते. मी घरी आले.काही दिवस शरीराला आराम मिळाला.माई अवघडलेली होती. तीला बिचारीला त्रास होतोय ते मला कळत होते. पण मलाही थोडा आराम मिळाला. घरातल्या कामाचे काही वाटत नाही.पण वैकुंठरावांच्या त्रासापासून काही दिवसतरी सुटका झाली. क्रमशः मागील दुवा https://www.misalpav.com/node/53387 मला डोहाळ्यांचा त्रास व्हायला लागला. काहीही खाल्ले की पोटात टिकत नाही. कसली कसली स्वप्ने पडायला लागली.

४- तेरी नजरो से आज नजर मिलाना चाहती हु

विजुभाऊ ·
वैकुंठराव अगोदरच कुठेतरी निघून गेले होते. सासुबाईंनी ओठावर लावायला सायीची वाटी दिली. म्हणल्या हे लाव.तोंडावर. आणि सगळं आवरून मगच ये बाहेर. भरल्या घरात असलं रडव्या तोंडाने नांदायचे नसते. लक्ष्मी बाहेर निघून जाते अशाने. क्रमशः मागील दुवा : https://www.misalpav.com/node/53386 खूप गदगदून रडायचे होते पण गळ्यातले त्राणच संपून गेले होते. त्या दिवशी तशीच पडून राहिले. खाण्यापिण्याचीही वासना हरवली होती. संध्याकाळी सासूबाई नी जवळ घेतले. माझ्या पाठीवरून तोंडावरून हात फिरवला. मला माई आठवली. मला कुठे दुखले खुपले की ती ही असेच करायचे. माझ्या डोक्यावर हात फिरवत सासूबाई म्हणाल्या. खा पोरी दोन घास खाऊन घे.

३- तेरी नजरो से आज नजर मिलाना चाहती हु

विजुभाऊ ·
तोच विचार होता अगोदर. आणि तेच केलं असते पण वैकुंठरावाना गोपीकाबाई च आवडल्या . त्यामुळे यावं लागलं इकडे. आतोबा हसतात. क्रमशः मागील दुवा https://www.misalpav.com/node/53380 अगे कौसल्ये असे कसे म्हणतेस. समोरून चालून स्थळ आलंय तर नको का म्हणतेस. दुर्गा आज्ज्जी आता या बोलण्यात पुढे आली. जोडा कसा राम सीतेसारखा शोभेल. मला कळतंच नव्हते काय चाललंय ते. जोडा आणि सोयरीक हे दोन नवीन शब्द माहीत झाले इतकेच. बैलजोडी माहीत होती. पण जोडा हे काहितरी नवीनच. घरात का ठेवणार आहेस. मुलीला, मी या वयाची होते तेंव्हा सासूबाईच्या हाताखाली स्वयंपाक शिकत होते. आडाचे पाणी शेंदायचे, दोन दोन खंडी ज्वारीचे पीठ दळायचे.

तेरी नजरो से आज नजर मिलाना चाहती हुं....( २)

विजुभाऊ ·
अर्ध्या तासापूर्वी झालेल्या त्या सगळ्या मरणप्राय प्रसव वेदनांचा विसर पडला तोंडाचे बोळके दाखवणार्‍या निष्पाप हसण्याने. जणू माझाच जन्म झाला असावा असे वाटले. डोळ्यातून अश्रुंच्या धारा लागल्या होत्या. अनहद असा एक नाद असतो म्हणे. देवांच्या वाद्यांचा. कशावरही आघात न करता हा नाद होतो. तसा नाद कुठेतरी उमटला. तो तसा अनुभव येत असेल तर काहीही करायला तयार होऊ आपण
क्रमशः मागील दुवा https://www.misalpav.com/node/53375 स्पर्षाचे गारूड म्हणायचे की की त्या निष्पाप हसण्याचे. ज्याच्या कडून कसलीही अपेक्षा नाही. ज्याला आपल्याकडून काहिही नकोय. लौकीक अर्थाने ते नाते कसले म्हणायचे.

येरूडकर - कथाकथन.. नव्हे गोष्ट सांगणं.

गवि ·
येरूडकर किंडल बुकमधल्या कथेच्या रूपाने सर्वांना भेटायला आला. पूर्वी मौज दिवाळी अंकात तो प्रकट झाला होता. आता चेतना वैद्य या आवाजाच्या जादूगार असलेल्या व्हॉईस आर्टिस्ट आणि नाट्य दिग्दर्शिका यांच्या अफलातून आवाजात यूट्यूब वर ही गोष्ट ऐका. आवडली तर मनापासून भरपूर प्रतिसाद द्या. शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा.

कथा : तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं?

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर ·
---------- अलिकडं ------------ सगळ्यात आधी त्यांना जाणवला तो निसर्गाच्या सर्व हालचालींनी गजबजलेला एकांत. कुठलाही गोंगाट नाही. काटेरी झुडुपांवरून सर्र असा आवाज करत वाहणारे वारे. पक्षांची किलबिल. तळपायाखाली एखाद्या सपाट दगडाची रुतणारी ऊब. शहरातल्या घरातल्या मधल्या डिजिटल भिंतींना कंटाळून ते इथे भटकत होते. त्या भिंतींच्या आत तीच रोजची 32k पिक्सेलमधली भांडणं करून ते वैतागले होते. ज्या ज्या त्रासदायक आठवणी ते काढत त्या त्या भिंतींवर लगेच प्रोजेक्ट होत. ती किंचाळायची, “तू मला कंट्रोल करू बघतोस”.

तेरी नजरो से आज नजर मिलाना चाहती हुं....

विजुभाऊ ·
दार लाव गं जरा... गोपिकाबाई करवादतात. त्यांना स्वतःलाच त्याचा आवाज परका वाटतो. कुठूनतरी दुरुन आल्यासारखा , कोणातरी दुसर्‍याचाच. इतका परका की त्यानाच कोणीतरी दार लावायला सांगितले असावे असा. क्षणभर अचंभीत व्हायला होते. कोण आलंय या वेळेला म्हणून त्या इकडे तिकडे पहातात. खोलीमधे एक टेबल. त्यावर पाण्याचा जग. सभोवताली औषधांची पिलावळ. गोपीकाबाईना ती औषधाची बाटली आनि तीच्याभोवती असलेल्या छोट्या बाटल्या पाहून उगाचंच जीवतीची आथवण होते.असेच असते ना जीवती मातेचे चित्र. एक स्त्री पिलाबाळांनी लगडलेली. फणसाच्या झाडाला फणस लगडलेले असावे तशी पोरे तीच्या अंगाखाड्यावर लगडलेले असतात.