संस्कार म्हणजे काय (भाग- दोन)

लेखनविषय:
लेखनप्रकार
- डॉ. सुधीर रा. देवरे एखाद्या घटनेला कसे सामोरे जायचे हे अनुभवी व्यक्‍तीने नवशिक्याला समजावून सांगणे म्हणजे संस्कार, अशी संस्काराची ताप्तुरती व सुटसुटीत व्याख्या करता येईल.

दिनु आणि जान्या आजा

लेखनप्रकार
ही कथा काल्पनिक आहे याची नोंद घ्यावी अरे!!! थांब का ईतका घाईत चालु राहिलाय . पाठीमागुन दिनुला कुणीतरी आवाज दिला .आवाज ऐकुन दिनु मागे वळला बघतो तर कुणीतरी काठी टेकत टेकत त्याच्या दिशेन येत होतं. आजुबाजुला काळोख असल्यामुळे दिनुला नक्की कोण आहे हे स्पष्ट दिसत नव्हते. जेव्हा तो म्हातारा जवळ आला तेव्हा दिनुने त्या म्हाताऱ्याला ओळखले. तो म्हातारा जान्या आजा(जनार्दन) होता. गावातील सर्वात जुना म्हातारा हाच होता. दिनुने जान्या आजाला कुठ गेला होता . म्हनुन विचारले तेव्हा जान्या आजा म्हणाला आरं पोरा मी शेताकडं गेलो होतो .रे!! येतांना ऊशीर झाला .

‘तुला’

लेखनविषय:
लेखनप्रकार
‘तुला’ तुला मानण्यात काहीच अर्थ नाही, तू आहेस ही जाणिव मुळात नकोशी आहे. इथे तू हवाच कुणाला आहे. तुझ्या आदर्शांचा न्याय जगात सर्वत्र लावता येत नाही. तूला स्मरायचे ते फक्त मन:शांती साठी ? मन:शांती ती फक्त योग्य निर्णयासाठी. आणि योग्य निर्णय तो फक्त आपल्या फायद्यासाठी ? पिडीत, उपेक्षित, अन्याय सहन करणारे अश्या ढाली घेवून जगणार्यां, समानतेची मागणी करणार्यांना तुझ्यावरच विश्वास नाही. तुझ्या तत्वांचे उपदेश देणार्यांमध्ये ‘मी’ पणाचा वास येतो. असे दोन्हीही सतत तुलना करत असतात. तुझ्या चांगल्या वाईटची. आस्तिक नास्तिकाच्या विचारांची. यश अपयश – चढ उतार सगळ्याचं पाहावे लागतात.

थायलंड (एक अश्वत्थामा)

लेखनविषय:
लेखनप्रकार
व्हिएतनाम युद्ध!, दक्षिणपूर्व आशियात कम्युनिस्ट विचारसरणीचा आणि पर्यायाने रशियाच्या वाढत्या प्रभावाला आळा घालण्यासाठी अमेरिका, 'व्हिएतनाम' या चिमुकल्या देशाविरुद्ध १९५४ पासून इनडायरेक्ट आणि ६०साली प्रत्यक्ष युद्धात उतरली. २० दिवसांत व्हिएतनामच्या मुसक्या आवळू या वल्गनेसह उतरलेली अमेरिका प्रत्यक्ष २० वर्ष या युद्धात अडकून पडली. हिच २० वर्षे थायलंडच्या तीन महत्वाच्या शहरांच्या अंतर्बाह्य बदलास कारणीभूत ठरली. अमेरिकेचा आजही मित्र राष्ट्र असलेल्या 'थायलंड' देशात त्याकाळी अमेरिकेने "युद्ध-तळ" बनवला होता.

ओमरान दानीश

लेखनप्रकार
dan dan फोटोत असलेला हा 5 वर्षाचा छोकरा, ओमरान दानीश बुधवारी सिरीयन आर्मी किंवा रशियन एयरफोर्स ने अलेप्पो शहरात एका इमारती वर केलेल्या हवाई हल्ल्यात हा सापडला होता. याला जेव्हा ऍम्ब्युलन्स मध्ये आणण्यात आलं तेव्हा याच्या चेहरा पूर्णपणे रक्ताने माखलेला होता आणि अंग धुळीने भरलेले होते.

एकटी - शतशब्दकथा

लेखनविषय:
लेखनप्रकार
१५ ऑगस्टची लगबग. लेकीच्या हट्टासाठी ती शाळेत यायला तयार झालेली. लेकीचं देशभक्तीपर गाणं तिनं चांगलंच पाठ करून घेतलेले. पांढरा गणवेश, मामाने आणलेले पांढरे शूज घालून लेक डोईच्या शेंड्या उडवत फिरत होती. ********************** शाळेतील ध्वजवंदनाचा कार्यक्रम शिस्तबद्धरीत्या पार पडत होता. पाहुण्यांनी तिरंगा फडकविला. हिने उजव्या हाताची सलामी दिली. तालात वाजणारा बँड. समूहाच्या धीरगंभीर आवाजातल्या ‘जन गण मन’ बरोबर तिने सूर मिसळले. मान आणि नजर वर रुबाबदारपणे फडकणाऱ्या तिरंग्यावर. पुढच्याच क्षणी तिचे डोळे डबडबले, पुढचं धूसर झाले. घशातून आवाज निघेना. अंग थरथरू लागले. . . . तोच तिरंगा!

अतिरेक !

लेखनप्रकार
विचारांचा अतिरेक झाला की मग मी कोणासोबत तरी बोलून मन मोकळं करतो, पण आज विचार केला की लिहून मन मोकळं करावं! वर्तमान पत्रात जाहिराती येतात , म्हणजे खूपच येतात. 'वर्तमान पत्रातील जाहिरातींचा अतिरेक' या विषयावर एक वेगळा लेख लिहावा लागेल! पण अधून मधून बातम्या सुद्धा येतात! नाही असं नाही! कसल्या असतात या बातम्या? दहशतवादाच्या आणि बलात्काराच्या. या दोन भयंकर समस्यांनी भारतालाच काय सगळ्या जगाला ग्रासलंय. दहशतवाद! हिंसेचा अतिरेक झाला की माणूस दहशतवादी होतो. आता या विषयावर बोलायला लागलं की आपसूकच एक वाक्य ऐकू येतं की "दहशतवादाला धर्म नसतो"! नसतोच मुळी.

अपराध मीच केला... शिक्षा तूझ्या कपाळी

लेखनविषय:
लेखनप्रकार

रुस्तुम

.

संरक्षण क्षेत्र त्यामधला भ्रष्टाचार. कुणी तरी एक त्याविरुद्ध लढतो. त्यामधे खूप काही सोसतोही. रंग दे बसंतीमधे याची उत्तम हाताळणी झालेली आहे.

तसंच काही असेल अशी आशा होती कारण तशी प्रसिद्धी झाली होती. पण सुरुवातीला प्रेमकथा, नंतर अपेक्षाभंग, त्यानंतर विश्वासाला तडा. देशासाठी लढणार्‍याने देशाकडे लक्ष द्यावे की घराकडे... वगैरे वगैरे.

आशय - भाग ५

लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रस्तावना आणि भाग १ आशय - भाग २ आशय - भाग ३ आशय - भाग ४ मी तसा वर्गातला हुशार विद्यार्थी म्हणून गणला जात होतो. जरी कधीही मी वर्गाच्या मेरिटलिस्टमध्ये आलो नसलो, (त्यात नेहमी मुलीच असायच्या) तरी गणित, संस्कृत, विज्ञान वगैरे विषयात असलेल्या गतीमुळे, तसेच माझ्या भावाच्या तसेच वडिलांच्या रेप्युटेशनमुळे तसी माझी इमेज चांगली होती. याचा मला बर्‍याच ठिकाणी त्याचा फायदा मिळायचा.

रात्र.....!

लेखनविषय:
लेखनप्रकार
रात्र एक रात्र ...... एक रात्र शांत बसलेली, उजव्या कुशीवर वळून शांतपणे निजलेली. मनात दिवसभराचा हिशोब मांडते आहे, एक रात्र कपाळाला आठ्या घालून दिवसाबद्दल नाक मुरडते आहे. एक रात्र दिवसाचा श्रम परिहार करते आहे. एक रात्र दिवसच्या रगाड्यातून निवांत पण शोधते आहे. कमाल आहे, निव्वळ प्रकाशाच्या खेळामुळे जागांची ओळख बदलते. एरवी गजबजणारा रस्ता रात्री मात्र निर्मनुष्य असतो, जसा आपला अगडबंब देह जसा अंथरुणावर अस्ताव्यस्त पसरून आराम घेतो. तेव्हा या रस्त्याची भव्यता, सौंदर्य अगदी उठून दिसते. दिवस आणि रात्र यांचा पाठशिवणीचा खेळ मात्र अव्याहत पणे चालू असतो.
Subscribe to विचार