Skip to main content

विचार

कम्युनिटी (समूह) रेडिओची ओळख

लेखक खेडूत यांनी मंगळवार, 19/07/2016 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
कम्युनिटी (समूह) रेडिओची ओळख बालपणीच रेडिओशी संपर्क आला - रेडिओ हेच मनोरंजन आणि माहितीचे साधन असल्यामुळे खूप रेडिओ ऐकत असे. गाण्यांसाठी बिनाका गीतमाला अन विविध भारती, तर क्रिकेटवेडापायी सुशील दोशी यांचे धावते वर्णन वेळी अवेळी तासनतास ऐकले असेल. पुढे इलेक्ट्रॉनिक्स शिकतांना स्वतःचा इवलासा प्रक्षेपक तयार केला होता. पण फक्त प्रयोगच. गुरुजींनी तो प्रयोगाव्यतिरिक्त वापरणे बेकायदेशीर असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्याच्यातला उत्साह मावळला होता. पण रेडिओ नेहेमीच जवळचा सोबती राहिला. आजही दूरचित्रवाणीपेक्षा विविध भारती किंवा इंटरनेट रेडिओ जास्त ऐकतो.

विरह.....5

लेखक Bhagyashri satish vasane यांनी बुधवार, 13/07/2016 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वत्र काळोख पसरलेला होता पाऊलं कुठल्या दिशेनं पडत होती याचाही संदर्भ लागत नव्हता मी भ्रमिष्टा अवस्थेत चालत होतो, मला मन आहे विचारशक्ती आहे याचं भानचं नव्हतं! गत आयुष्यातील घटनांचा आढावा घेतांना खरचं वाटतं नव्हतं आपण इतकं काही भोगलय पण आता त्या आठवणी सुध्दा सोबत सोडतील, कळलच नाही चालता चालता घरा पर्यंत येऊन पोहोचलो मी घरात आलो बाजारातुन घेतलेलं सामानं घेतलं आई आणि भाऊ झोपलेले होते मी त्यांना अखेरचं डोळे भरुन पाहिलं आणि मागच्या पाईपने अवनीच्या रुममध्ये प्रवेश केला ती माझीच वाट पाहात होती मी आत आलो, तीने माझा धरुन मला गणपतीच्या मुर्ती जवळ आणलं आणि म्हणाली आपण यांच्याच साक्षीनं लग्न करु!

विरह.....4

लेखक Bhagyashri satish vasane यांनी बुधवार, 13/07/2016 16:05 या दिवशी प्रकाशित केले.
रात्री सर्व झोपल्यावर मी मागच्या पाईपने आत शिरलो, अवनी रडत होती मला बघताच ती गळ्यात पडून रडू लागली मग दोघांच्या आसवांपुढे पावसाचा वर्षाव कमी पडू लागला, मी तीला समजावून सांगू लागलो पण ती एकतच नव्हती, ती म्हणाली,सम्यंक मी तुझी नाही तर कोणाचीच नाही होणार, आणि तुझीही नाही झाले तर आत्महत्या करणार, मी अवनीला खूप समजवलं पण ती ऐकतचं नव्हती मी म्हटलो ठिक आहे तर मी पण तुझ्याशिवाय नाही जगू शकतं आपण उद्या सोबत जिव देऊ! अवनी म्हणाली अरे पण आपण पाहीलेली स्वप्न एकत्र जिवन जगण्याची ती सर्व स्वप्न?

विरह ....3

लेखक Bhagyashri satish vasane यांनी बुधवार, 13/07/2016 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
काय अवस्था होती माझ्या मनाची अनुभववाचुन समजने कठीन! ह्रदयाच्या फाटक्या वस्त्रात चूर झालेल्या मनाचे तुकडे कितपत सांभाळले जातील? सात वर्षाची सोबत काही क्षणातसोबत तुटणार! नियतीला हे मंजुर होत?

एक मृत्युपत्र: पल दो पल का शायर, काही गोष्टी आणि "जान्हवीची आई"!

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 08/07/2016 10:19 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांना नमस्कार! हे एक प्रत्यक्षात लिहिलेलं पत्र आहे. एका काकाच्या मृत्युनंतर तीन महिन्यांनी त्याच्या आई- पत्नी (माझी आजी- मावशी) आणि मुलींना (माझ्या बहिणींना) लिहिलेलं. ह्यामधला आशय आपल्या सर्वांसोबत- आपल्या प्रत्येकासोबत शेअर करावासा वाटला म्हणून फक्त नावं बदलून हे पत्र आहे तसं इथे देतोय. थोडं मोठं आहे, पण शेअर करावं असं वाटलं. खूप खूप धन्यवाद. || ॐ || दि. २७ एप्रिल २०१६ ती. आजी, ती. मावशी आणि मिताली- प्राजक्ता! तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. अगदी सविस्तर आणि मनमोकळेपणाने बोलायचं आहे. तुम्हांला माहितीच आहे की मी किती अबोल आहे! त्यामुळे समोरासमोर बोलताना मला कंठ फुटत नाही.

अंधविश्वास - सार्थक लढा (भाग १) -अंधविश्वास म्हणजे काय?

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 07/07/2016 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
सामान्य माणूस काही आंधळा नाही आहे, कि डोळे बंद करून कुणावर विश्वास ठेवणार. सामान्य माणसाचा जगण्याचा उद्देश्य असतो - सुखी संसार, स्वस्थ्य शरीर आणि भरपूर पैसा. दुसर्या शब्दात स्वास्थ्य, सुख आणि समृद्धी या तीन बाबी भौतिक जगात महत्वाच्या. खान-पान, जीवनमान, व्यायाम इत्यादी बाबींचा प्रभाव आपल्या शरीरावर पडतोच. स्वस्थ्य राहण्यासाठी व्यायाम किंवा शारीरिक मेहनतीचे कामे करावी लागतात. खाण्यापिण्या वर हि नियंत्रण ठेवावे लागते. हे जर जमले नाही तर मनुष्य आजारी पडतोच. एकदा आजार झाला कि दीर्घकाळ औषध-उपचार हि करावा लागतो, पथ्य हि पाळावे लागतात. भरपूर पैसा हि खर्च होतोच.

मंत्रिमंडळे - शैक्षणिक मिक्स अँड मॅच की मिसमॅच ?

लेखक माहितगार यांनी बुधवार, 06/07/2016 08:10 या दिवशी प्रकाशित केले.
या लेखात चिकित्सा सद्य केंद्रीय भाजपा मंत्रिमंडळाची केली असली तरी आधिच्या इतर पक्षीय सरकारांमध्ये अथवा कोणत्याही पक्षीय राज्यसरकारांमध्ये वेगळी स्थिती होती/असते असे नसावे पण तो वेगळ्या अभ्यासाचा विषय असावा. तुर्तास सद्य मंत्रिमंडळाची चर्चा. मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या निवड आणि नेमणूका राजकीय हेतु डोळ्या समोर ठेऊन होतात, विशिष्ट मंत्रालयांसाठी अथवा कारभारासाठी त्या त्या क्षेत्रातील तज्ञच अथवा अनुभवी असावेत असे नाही, एखाद्या पक्षास / पंतप्रधानास नव्याने अथवा बऱ्याच वर्षांनतर जनतेचा कौल मिळतो कुणाला मंत्रि करावे हा त्यांचा अधिकार आहेच त्या बाबत दुमत नाही.

मी एक शेतकरी.....भाग १.... शेतीसाठी लागणार्‍या मुलभूत गोष्टी....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 04/07/2016 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : ह्या लेखांत शेती कशी निवडायची आणि कमीत कमी पैशांत शेतीची राखण कशी करायची?

शेती ह्या विषयासाठी वेगळा विभाग असावा....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 04/07/2016 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, गेली २०-२२ वर्षे मी शेती ह्या विषयावर माहिती गोळा करत होतो आणि अजूनही माहिती गोळा करत आहेच. मिपावर पण ह्या विषयावर बरेच लेख असावेत.पण "शेती" ह्या विषयासाठी स्वतंत्र विभाग नसल्याने, ह्या विषयावरील माहिती शोधतांना खूपच वेळ वाया जातो. सुरंगी, नाखू ह्यांनी ह्या विषयावर बरेच लिखाण पण केले आहे.