मिपा तल्या प्रतिक्रियांमध्ये
नमस्कार.
मिपा तल्या प्रतिक्रियांमध्ये कायम ‘ब्लॉगची जाहिरात’ असं काहीतरी माझ्या ब्लॉगबद्दल म्हटलेलं असतं. संपूर्ण ब्लॉग (लेखच) मी इथं देत असल्याने ब्लॉगची जाहिरात करतो असं कसं म्हणता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे विकावू माल खपवण्यासाठी जाहिरात करावी लागते. माझे लेख म्हणजे विकाऊ माल नाही. ब्लॉगला मी कोणाचेही प्रायोजकत्व घेतले नसल्याने जितके जास्त लोक ब्लॉग वाचतील तेवढा प्रायोजकाचा फायदा होईल असंही काही नाही. म्हणून ब्लॉगची जाहिरात केली जाते असं का म्हणतात ते मला कळत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे, आपले विचार मांडणे म्हणजे जाहिरात करणे असं होत नाही. लेखांतून विचार मांडलेले असतात.
मिसळपाव