प्रिय अदू. . . .
काल तुझा दुसरा वाढदिवस झाला! तू दोन वर्षांची झालीस! कालचं तुझं नाचणं, सेलिब्रेशनमध्ये हसणं, सगळ्यांसोबत खेळणं, गोल गोल फिरणं आणि न कंटाळता न रडता अखंड स्टॅमिना ठेवणं. . . खरोखर शब्द फार फार अपुरे आहेत. मला काल तुझी आणखीन एक गोष्ट विशेष वाटली. तुझ्या स्वभावाचा तो भागच आहे. तुझी निरागसता! सहज भाव! मन खरोखर इतकं शुद्ध नितळ असू शकतं? हो, असू शकतं, असतं, हे तुझ्याकडे बघून जाणवतं अदू. म्हणून कालची बर्थडे पार्टी ही 'सूर निरागस हो. . .' अशीच होती. . . .
अदू, गेल्या दोन वर्षभरामध्ये तुझ्यासोबत जीवन सार्थक करणारे असंख्य क्षण आले. एक एक दृश्य डोळ्यांपुढे जीवंत होतं.