गणपती उत्सव का इव्हेंट???...

लेखक: निकुंज जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
तीन दिवसां वर यिवुन ठेपलेल्या गणेश उत्सव हा महाराष्ट्र सह पुर्ण भारतत मोठया प्रमाणावर साजरा होतॊ. प्रदेशात राहणारे आपलेच भारतीय बांधव सुद्धा हा उत्सव आनंदाने साजरा करतात. गनपती म्हणजे महाराष्ट्रच आराध्य दैवत. सार्वजनिक गणेश उत्सव मंडळची आणि घरगुती गणपती बसवंयरीची जय्य्त तयारी चालु सुद्ध झाली. पण गणपती आले की हमखास एक प्रश माझ्यामनामध्ये येतॊ. तो म्हणजे गणपती उत्सव का इव्हेंट???... सार्वजनिक गणेश उत्सव प्रथम बाळ गंगांधार टिळकानी चालु केला लोकना एकत्र आणण्या साठी पण आज काल एकाच गल्लीत तीन किंवा चार मंडळ एक मेकांवर पाय देऊन उभी असतात गणपतीच्या मिरवणुकीला तीन तीन ढोल ताशा पंथक असतात. तीस तास चालणारी विसर्जन मिरवणूक आज प्रत्येक शहरात सहज चालते आज ह्याच विसर्जन मिरवणूक मुळे मंडळानं मध्ये चुरस व्हडत चालली आहे. काही गणपती मंडळ जमा झालेल्या वर्गणी मधुन गरीब लोकांना आणि अनाथ लोकांना मदत करतात. पण त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्या एव्हडी आहे. आमच्या इथे एका घरा मध्ये दर वर्षी साडेसहा फुट उंचीची मूर्ती बसवली जाते. पुण्यासारख्या शहारात जिथे लोकाना इंच इंच जागे साठी धडपड करावी लागते तिथे एव्हडं मोठा गणपती बसावंण किती अवघड असेल ह्याची आपण कल्पना करू शकतोच. त्या गणपतीची मोठी मिरवणूकही काढली जाते. मोठया मोठया फटाक्यांच्या माळा आणि आतिश बाजी केली जाते. गुलाल उधळला जातो. त्या मुळे प्रदूषण होत. पण ह्याच्या कडे कोणीही ठोस पावले अजूनही उचली नाहीत. गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन नदीत न करता तलावात केलं तर घरच्यांना ते रुचण्या सारखं नसत. एक गणपती नदीत विसर्जन केल्याने असं काय होत???... असे प्रश्न विचारले जातात. फक्त मोदीनी स्वच्छ भारत अभियान चालू करून काही होणार नाही. सगळ्यांनी त्याला पुढाकार घेतला पाहिजे . गणपती बसवणं ही आपली परंपरा. माझा त्याला आजीबात विरोध नाही. पण ही परंपरा काळानुसार बदलायला हवी मी या लेखाने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व.

वाटलंच मला. म्हणूनचं विचारलं सार्वजनिक शब्द राहिलाय कि मुद्दाम ठेवलाय ;)

महासंग्राम यांनी 02/09/2016 - 10:16 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

आमच्या इथे एका घरा मध्ये दर वर्षी साडेसहा फुट उंचीची मूर्ती बसवली जाते. कोणी किती फुटांची मूर्ती बसवायची हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आपण जर मागच्या वर्षीचा पेपर पाहिलेत तर लक्षात येईल कि नागरिकांचा हौदात विसर्जन करण्याकडे कल वाढतो आहे.
पण गणपती आले की हमखास एक प्रश माझ्यामनामध्ये येतॊ. तो म्हणजे गणपती उत्सव का इव्हेंट???
गणपती हा उत्सवच आहे बाकी तो इव्हेंट आहे कि कि नाही हे ज्याच्या त्याच्या मानण्यावर आहे. अजून एक प्रदूषण, मिरवणुकीबाबत पडणारे प्रश्न तुम्हाला गणपतीमध्येच पडतात, बाकीच्या धर्मात सण साजरे होत नाहीत का ??? कि तेव्हा तुम्हाला प्रश्नच पडत नाहीत. मुद्देसुद उत्तराची अपेक्षा.

प्रदूषण, मिरवणुकीबाबत पडणारे प्रश्न तुम्हाला गणपतीमध्येच पडतात, बाकीच्या धर्मात सण साजरे होत नाहीत का ???
म्हणजे समोरचा चिखलात खेळतोय म्हणून मी शेणात लोळतो असे काही लॉजिक आहे काय यामागे ?

नाही मास्तर माझं म्हणणं एवढंच आहे कि या गणपती आल्यावरच का आठवते. टिका/टिप्पणी करावयाची असल्यास सर्वधर्मसमभाव ठेवावा इतकच. बाकी ज्या चुकीच्या प्रथा आहे त्या बंद करायलाच हव्यात या बाबत अगदी सहमत आहे.

गणपतीएवढा सर्वंकष त्रास इतर कोणत्या धर्माच्या कोणत्या उत्सवांचा होतो तेवढी एक लिष्ट द्या ना धागाकर्त्याला, पुढच्या वेळेला लक्षात ठेवून धागे काढतील ते.

धागाकर्ता जर गणपतीवर एवढं लिहू शकतो तर इतर धर्माच्या सणाबद्दल पण त्याला माहिती असेलच अशी अपेक्षा आहे.

त्यांचं सोडा, मलाच उत्सुकता आहे, की गणपतीसारख्या सर्वंकष त्रासदायक उत्सवासारखे आणखी कोणत्या धर्माचे कोणते उत्सव होतात?

हे घ्या मोहरमची मिरवणूक आणि डिजे, आंबेडकर जयंतीला वाजणारे डिजे

मोहरम व आंबेडकर जयंतीचे डिजे-मिरवणूक ही गणपती उत्सवाचीच देण आहे, हे बंद होईल तसे तेही बंद होईल.

हे तुम्ही इतक्या खात्रीने कसे काय सांगताय? की सर्व देशभर मोहरम व आंबेडकर जयंतीचे डिजे व मिरवणूक तुमच्याच नेतृत्वात निघतात.

सर्व गणपती बंद करुन बघा ना तुमच्या नेतॄत्वात.. बाकीचे आपोआप बंद होईल याची खात्री देतो. प्रॉमिस!!

सर्व गणपती बंद करुन बघा ना तुमच्या नेतॄत्वात.. बाकीचे आपोआप बंद होईल याची खात्री देतो. प्रॉमिस!!

बाकी प्रत्येक गल्लीबोळातल्या गणपतींच्या सर्वंकषपणाशी स्पर्धा करणे वरच्या दोन्ही उत्सवांना शक्य नाही हे एक राहिलंच. नुसता इतरधर्मियांबद्दल आकस योग्य नाही. जेवढी गणपतीमंडळे आणि त्यांचे डिजे आहेत त्याच्या पंचवीस टक्के तरी ह्या दोन्ही उत्सवांचा एकत्र त्रास आहे काय ह्याबद्दल उत्सुकता आहे. कोणा जाणकाराने आकडेवारी मांडावी.

सर गल्लत होते आहे, इथे इतर धर्माच्या सणांबद्दल आकस असं कुठे नाही कधीच नसणार. कुप्रथा( इथे डीजे इ .) सगळीकडेच आहेत/असतात. फक्त त्याबद्दल आवाज उठवायचा तर सर्वधर्मातल्या कुप्रथा( इथे डीजे इ .) बद्दल उठवावा असं म्हणणं आहे.

मंदारशेठ, तेच सांगतो आहे. सार्वजनिक गणपती हे ह्या उच्छादाचे मूळ आहे हे मान्य करावेच लागेल. सार्वजनिक गणपती हाच एक मुळात उच्छाद आहे हे मान्य केलंत तर पुढच्या घटना समजून येतील. आपणच आधी गणपती रस्त्यावर आणला, त्याचा बाजार मांडला, आपण इतरांना आयतेच उकसवले, त्यांनीही त्यांचे उत्सव रस्त्यावर आणले. कित्येक दलित वस्तींमधे ९०-९२ च्या सुमारास गणपती प्रतिष्ठापना सुरु झाल्या, निमित्त काय तर त्या पोरांना भोंगे लावून दहा दिवस नाचायला पाहिजे होते तसेच जसे ते हिंदु मुलांना बघत होते, ती संधी त्यांना आयतीच व राजरोस मिळाली. त्यांची गणपतीत भावनिक गुंतवणूक तेवढ्याचपुरती. नंतर २००० सालानंतर डिजेचे प्रकार गणपतीवाल्यांनीच आणले, मिरवणुका-ढोल वाढले. तसे मोहरम आणि आंबेडकर जयंतीचे निमित्त धरुन इतरांनीही हे फॉलो केले. आता होतंय कसं की कोणी म्हणतो की बाबा रे बंद करा तो गणपती तर लोक त्याला म्हनतात 'इतरांनाही सांगा'. ह्यात नक्की काय लॉजिक आहे हे मला तरी समजलेलं नाही. आपल्याला आपले नाच-मिरवणुका-भोंगे खटकत नाहीत तेवढ्या इतरांच्या खटकतात. त्यांचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी असले तरी. आपल्याला आपल्याच गणपतीचा धंदा मांडलेला अजिबात खटकत नाही पण इतरांचे सण खटकतात. हे व्यक्तिगत तुमच्याबद्दल नाही तर एकंदर हिंदुसंस्कृतीरक्षक लोकांच्या वारंवार उफाळून येणार्‍या धर्माभिमानाबद्दल आहे. इतरांना सांगण्याआधी आपण आपलेच उच्छाद बंद करावेत हे सुचले तर बरे की नाही? नंतर बहुमताच्या दबावाने इतर पण बंद करता येतील, किंवा जी स्पर्धा लागली आहे ती आपोआप संपेल. बघा पटतंय काय? तसंही आता हे वादविवादाचं नेहमीचंच झालंय. जशा प्रथा निर्माण झाल्या तशा बंद झाल्या तरी काय फरक पडतो हे काही मला समजत नाही. असो.

सर, लो. टिळकांनी घरातला गणपती सार्वजनिक केला तो जनजागृती करण्यासाठी मान्य करालच. काळानुसार यात बदल होत गेला,काही कुप्रथा आल्या हे हि मान्य. पण, उत्सव बंद हा काही यावरचा उपाय नाही. त्या कुप्रथा चुकीच्या बदलू शकतो. ज्या आयडी ने धागा हा काढलाय, तो मोकलाया सारखा आहे. आणि एकूण ७ महिन्यात स्वताच्याच २ धागे आणि फक्त दोन प्रतिसादात ते पण मुद्देसूद नाही. तेव्हा मी विचारलेल्या प्रश्नावर उत्तरे येतील अशी अपेक्षा नाही. तेव्हा माझ्याकडून पूर्णविराम.

दुसरी बाजूही आहे ना ह्याला, मी नाकारत नाहीच. अनेक गणेशमंडळे समाजोपयोगी कामे करत आहेत, काहींनी तर यावर्षीपासून विनावर्गणी सुरु केले आहे, कोल्हापुरातच डिजेबंदी सुरू झाली. अशा अनेक घटनांचे आपण स्वागत करायला हवे. ते न करता 'इतरांना सांगा ना आधी' वाल्यांचा गवगवा जालावर तरी जास्त दिसतो. म्हणून बोललो. तुम्ही वैयक्तिक घेऊ नका. बाकी धागाकर्त्यांबद्दल मला काही ठावूक नाही. तेव्हा असो! माझ्याकडून थांबतो.

राजाभाउ यांनी 02/09/2016 - 12:19 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

धाग्याचे शिर्षक वाचले तेंव्हाच ही चर्चा आता हिंदु धर्म विरूद्ध ईतर अशी जाणार हेच वाटल होत. अपेक्षेप्रमाणे पहील्या काही प्रतीसादच ते सापडल चालु द्या

amit_m यांनी 02/09/2016 - 15:06 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

सार्वजनिक गणेश उत्सवाचा त्रास जेवढा होतो ,, तेवढा बाकी जयंत्या मिरवणुका यांचा होत नाही. हे माहित असून उगाच वेड पांघरायला आवडतं लोकांना..

ज्योति अळवणी यांनी 02/09/2016 - 20:31 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

त्रास प्रत्येक सार्वजनिक इव्हेंटचा होतो. पण बंद कोण करणार? सुरवात कोण करणार? सार्वजनिक मंडळी नक्की नाही, राजकीय नेते नाही, प्रशासनाची हिम्मत नाही, सामान्य नागरिकांना इच्छा शक्ती नाही.

निकुंज यांनी 05/09/2016 - 09:38 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

मंदार भालेराव यांच्या म्हणण्या प्रमाणे आताच हा विषय का???... कारण एकच दर वर्षी प्रमाणे ह्या वर्षी चा गणपती काही तरी वेगळ्या प्रकारे साजरा व्हावा म्हणूंन. बाकी कोण काय करतंय ह्या पेक्षा आपण काय करतो आहोत हे माझ्या साठी महत्वाचं आहे. दहा दिवस चालणारा, करडो लोक एकाच वेळी सहभागी होणारा दुसऱ्या कोणताही सण माझ्या तरी परिचयाचा नाही. जरी असेल तरी त्या बद्दल मला विचार करायची गरज नाही. कारण गणेश उत्सव हा आपला सण आहे. माझा सण आहे. प्रचेतसच्या म्हणण्या प्रेमाणे गणेशोत्सव बंद केला पाहिजे. ह्याला मी पुर्ण विरोध करतॊ. ग्लोबलीझशनच्या जगामध्ये आपण पश्चात लोकांचे सण आणि रीती अंगिकारू लागलो आहोत. तिथे आपला म्हणुन एक तरी सण हा हवाच. माझा गणपती उत्सवाला कधीच विरोध नव्हता आणि नसणार आहे. माझा विरोध आहे गणपती उत्सवाच इव्हेंट मध्ये होत चाललेल्या बदलला. गणामास्तर पाठींबा दिल्या बद्दल आभारी आहे. संदीप डांगे यांच्या दुसरी बाजूही आहे ना ह्याला, शी मी पुर्ण सहमत. पण अशी मंडळ फक्त हाताच्या बोटावर मोजण्या एव्हढीच आहेत. सार्वजनिक मंडळीनी डी. जे. आणि मिरवणुकीवर होणारा खर्च सामाजिक कार्या साठी वापरावा एव्हढच माझं म्हणन आहे. ज्योति अलवनिच्या म्हणण्या प्रेमाणे त्रास प्रत्येक सार्वजनिक इव्हेंटचा होतो. पण बंद कोण करणार???... त्यावर मी एव्हढाच म्हणेल, "दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्य भाग बुडाला. " चांगली कामे नेहमी आपल्या पासुन सुरु करावी. जे बरोबर येतील त्यांना घेऊन पुढचा प्रवास करावा. पुन्हा एकदा माझ्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व

संदीप डांगे यांनी 05/09/2016 - 10:27 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by निकुंज

Permalink

चांगली कामे नेहमी आपल्या पासुन सुरु करावी. जे बरोबर येतील त्यांना घेऊन पुढचा प्रवास करावा.
अम्म्म! माझ्या घरी गणपती बसवायचे बंद केले आहे, कुणाला वर्गणीही देत नाही. कुठे गणपती बघायलाही जात नाही, मी आपल्यापासून सुरुवात केली आहे. कुणाला माझ्याबरोबर यायचे आहे का?? अवांतरः सर्वांना गणेशचतुर्थीच्या खूप सार्‍या शुभेच्छा!! उत्सव करा बिन्दास, फक्त कचरा करु नका इतकी विनंती.

प्राध्यापक यांनी 05/09/2016 - 10:47 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

हेच म्हणायचे होते सर्व धर्माचे सर्व उत्सव ज्याने त्याने आपापल्या परीने परंतु खाजगी जागेत साजरे करावेत. त्या साठी सर्व समाज वेठीला धरण्यात काय अर्थ आहे.

कपिलमुनी यांनी 05/09/2016 - 19:13 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

व्हडत या शब्द आवडल्या गेला आहे .

प्रभाकर पेठकर यांनी 05/09/2016 - 22:04 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

ही परंपरा काळानुसार बदलायला हवी अहो ती (परंपरा) बदलली आहे म्हणूनच आज ही लेख वगैरे लिहून समाज प्रबोधन करण्याची वेळ आली आहे. ६० च्या दशकात घरोघर वर्गणी मागून साधा गणपती मंदिरात बसविला जायचा. रोजच्या आरत्या, प्रसाद आणि शेवटच्या दिवशी नदीत विसर्जन. आख्ख्या गावात एकच सार्वजनिक गणपती होता. पुढे पुढे ह्यात पैसा आला. प्रायोजक शोधून त्यांच्या कडून मोठ्या रकमा वसूल केल्या जाऊ लागल्या. त्या साठी त्यांच्या दुकानाची प्रसिद्धी केली जायची. (बॅनर्स द्वारे). हे प्रमाण व्यावसायिक स्पर्द्धेमुळे तर कधी मंडळांच्या दहशतीमुळे प्रमाणाबाहेर वाढत गेले. मंडळांकडे गरजेपेक्षा जास्त पैसा येऊ लागला. गंगाजळी वाढू लागली. पैशाला पाय फुटले आणि आयोजकांची चंगळ होऊ लागली. ह्या चंगळीत ज्यांना समाधानकारक वाटा मिळाला नाही त्यांनी त्यांनी आपापली चुल वेगळी मांडली. मंडळे फुटू लागली, वाढू लागली, स्पर्धा वाढू लागली आणि भक्ती संपून इव्हेंट सुरु झाला. लोकांना आकर्षीत करण्यासाठी, आपल्या मंडळाची प्रसिद्धी करण्यासाठी (कारण त्या प्रमाणात पैसा वाढत जातो) जास्त रोषणाई, गणपतीच्या मुर्तींची उंची वाढविणं हे उद्योग सुरु झाले. सर्वसामान्यांना भव्य-दिव्यतेचे आकर्षण असतेच. एरवी कधी गणपतीलाच काय पण कुठल्याही देवाला नमस्कार न करणारी तरूणाई सार्वजनिक गणेशाच्या भव्य मुर्ती, देखावे आणि जमणारा 'खास' भक्तांचा सागर न्याहाळण्यासाठी रात्र रात्र फिरू लागली. पण अजून उन्माद सुरु झाला नव्हता. मग त्यात ढोल, ताशे, लेझीम, महिलांची पथकं वगैरे वगैरे मसाला वाढविण्यात आला. ढोल-ताशे वाजू लागले की अंगात वारे सळसळू लागतात. म्हणूनच लढाईच्या आधी ढोल ताशे वाजविले जायचे. सैन्या मध्ये अनन्वित शक्तीसंचार होतो. मागचा पुढचा विचार न करता तो शत्रू सैन्यावर तुटून पडतो. इथे तोच प्रकार होतो अंगात संचारलेल्या वार्‍याला आवरता येत नाही म्हणून मग नाचण्याची जोड दिली गेली. ह्यावर्षी तर सैराट आहेच धम्म्माल करायला. ही युवा शक्ती पाहून स्थानिक राजकिय नेते मागे राहिले असते तर त्यांना राजकारण म्हणजे काय हेच कळले नाही असा अर्थ झाला असता. राजकिय नेत्यांचे पाठबळ मिळाले की झुंडशाही, कायद्याचे उल्लंघन, दमदाटीने पैसा वसूली आदी मार्ग मोकळे झाले. ह्यात मिडियावाले कसे मागे राहतील त्यांनाही त्यांची रोटी भाजून घ्यायची असतेच. एखाद दुसरा 'हिंदू सणांमधील अनिष्ट प्रथा' सारख्या विषयावर चर्चासत्र घ्यायचे बाकी ह्या इव्हेंटचे 'कव्हरेज' घेऊन ही 'मजा' घरोघर पोहोचवायची आणि ह्या 'इव्हेंटला' जास्तीत जास्त समर्थक मिळवून द्यायचे हाच सुप्त हेतू दिसून येतो. ह्या बेभान गर्दीत खरा भक्त हरवून गेला. इव्हेंटच, उत्सवाचं अक्राळविक्राळ स्वरूप पाहून त्याची छाती दडपून गेली आणि तो घरात बसला. सूज्ञ भक्त घरात बसल्याने स्वार्थी आयोजकांना रान मोकळे मिळाले. आता गोष्टी हाताबाहेर गेल्या आहेत. आपल्याच धर्माला का नांवे ठेवायची? इतर धर्मियांवर कधी नाही कोणी बोलत. ह्यावर मला वाटतं सुधारणा ही नेहमी आपल्या घरापासून सुरु करावी. आधी आपण आपले घर स्वच्छ करून नंतर इतरांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले तर लवकर पटेल. सर्व धर्मातील ह्या विचाराच्या लोकांनी आपापले घर (अनिष्ट धार्मिक प्रथा) स्वच्छ केल्यास सर्व समाज आणि देश स्वच्छ होईल.

पेठकर काकांनी मैदानाच्या सर्व बाजूंकडे उत्तुंग षटकार ठोकले आहे, अर्थात अगदी परखड आणि सहज सत्य प्रतिपादन आहे, विचारांशी सहमत 100000 टक्के!

पैसा यांनी 05/09/2016 - 22:13 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

ते सगळेच सार्वजनिक रूपातले बंद करायला हवेत. फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे दोनच सार्वजनिक स्वरूपाचे सण असावेत. बाकी सगळे खाजगी. आपापल्या घरात काय ते करा. रस्त्यावर अजिबात येऊ नका.

हुप्प्या यांनी 06/09/2016 - 04:50 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

दोन तीन वर्षांपूर्वी ऐन गणपतीच्या दिवसात पुण्यात रहाण्याची वेळ आली. भयंकर होता अनुभव. अमुक रस्त्यावर मिरवणूक असणार म्हणून कामावरुन येताना कुठलातरी दुसराच रस्ता घ्या. त्यात प्रचंड पाऊस. मोठ्ठी कोंडी. रस्त्यात पाणी काही विचारू नका! डोकेदुखी होती. दर दोनचार दिवसांनी असे काहीतरी होत होते. अनंत चतुर्दशीला कुठल्यातरी स्थानिक उत्सवांचे बाप्पा मिरवत विसर्जनाला चालले होते. तेव्हा त्या भयंकर आवाजाने डोके फिरून गेले. प्रचंड स्पीकर्सच्या भिंती गाडीवर लादून त्या कर्णकटू आवाजात काहीतरी किंचाळत होत्या. शिवाय ढोल ताशे आणि अन्य आरडाओरडा होताच. त्यात संगीत, सूर, ताल वगैरे काहीही नव्हते. प्रचंड, कानठळ्या बसवणारा, डोके दुखवणारा अर्थशून्य आणि कधी संपणारच नाही असे वाटणारा आवाज. एकंदरीत सहभागी होणारे लोक सामान्य लोकांवर सूड उगवायचा अशा थाटात तो बीभत्स गोंगाट करत होते. माझ्यासारख्या धडधाकट लोकांचे असे होते आहे तर आजारी लोक, अर्भके ह्यांचे काय होत असेल ह्याचा विचार करुनही शहारा येतो. मुख्य हमरस्त्याजवळ रहाणार्‍या लोकांचे हाल भयानक आहेत. ह्याला उत्सव सोहळा म्हणणे हेच पाप आहे. काहीतरी क्रांतिकारी चळवळ करुन हे प्रकार थांबवले पाहिजेत. टिळकांनी सुरु केला असो नाहीतर गांधींनी. आज त्याचे जे रूप आहे ते एक माफिया वा दाऊदच्या टोळीला शोभेल असे गुन्हेगारी कृत्य ह्या विकृतीचे रुप आहे. असला गणपती मला तरी नकोच नको. आवडत नसेल तर सहभागी होऊ नका हे आजच्या गणेश उत्सवात शक्य वाटत नाही. आसमंत दणाणून सोडणारा गोंगाट दुर्लक्षित करणे अशक्य आहे. सार्वजानिक शांतता हा सामान्य नागरिकाचा हक्क आहे. हे श्रीमंती चोचले नाहीत. असा गोंगाट थांबवणे अशक्य असल्यास सरकारने कान बंद करण्याची उपकरणे वाटप करावीत. त्याचा खर्च गणेशमंडळाकडून घ्यावा (अर्थात तो नागरिकच भरणार!). विमानतळ, जनरेटर, भट्टी अशा मोठ्या आवाज करणार्‍या भागात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना अशी उपकरणे कानावर लावावी लागतात. तीच इथेही वापरायला पाहिजेत नाहीतर सामान्य लोकांचे आरोग्य धोक्यात येईल. गणेशोत्सवाचे खूळ हाताबाहेर गेले आहे. ते पूर्ण बंद करावे.

बब्बा यांनी 06/09/2016 - 15:24 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

लोकमान्य टिळकांना सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माधमातून लोकांना ब्रिटीश सत्तेविरुद्ध एकत्र आणायचे होते तो हेतू सफल झाला आहे, ब्रिटीश आपल्या गावाला १९४७ सालीच परत गेले आहेत ,आता गणपतीचे पूजन फक्त घरात करायला हरकत नाही.

खालीमुंडी पाताळधुंडी यांनी 06/09/2016 - 18:10 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

गणपतीवरून थेट मोहरम आणि आंबेडकरजयंती??? वाऽऽऽह क्या बात!!!! मोहरम किती मोठ्या प्रमाणात होतो??? >> अतिशय अल्प आंबेडकरजयंती?? >> अलिकडे स्तोम माजले आहे हे मान्य,पण याला कारण शिवजयंती आहे. बाकी चालू द्या.

@ मंदार भालेराव आणखी एक राहिलं आंबेडकर तुमचे नाहीत का? जात जा ना तुम्हीपण नाचायला.

विशुमित यांनी 07/09/2016 - 10:46 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

Permalink

+1111 हा दुजाभाव अजून शतके चालणार देव जाणे...!!

मंदार जी, प्रतिसाद खामुं पाधुं ना दिला होता. "गणपती, शिवजयंती, मोहरम, आंबेडकर जयंती, दिवाळी, ईद, क्रिस्मस हे सगळे आपलेच" असे ज्या दिवशी सर्व भारतीय म्हणतील तोच खरा सुदिन आणि तो येण्यासाठी आणखी काही शतके नक्की लागतील, असा माझा अंदाज आहे.

महासंग्राम यांनी 07/09/2016 - 12:17 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

Permalink

आंबेडकर माझे नाहीत निष्कर्ष तुम्ही कसा काढलात ???? आंबेडकर माझे पण आहेतच पण मी नाचायला जात नाही हे सुद्धा तितकेच खरं आहे .

@खालीमुंडी पाताळधुंडी >> मोहरम आंबेडकर जयंती हे उत्सव उदाहरणादाखल दिलेत कारण मला उगाच मेगाबायटी प्रतिसाद लिहिण्यात काहीच रस नाही, आणि यात सगळ्याच धर्माचे उत्सव धरावे. बाकी मला जे म्हणायचे आहे ते मी वर लिहिलेल्या प्रतिसादात स्पष्ट केलेच आहे.