मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विचार

माझी दिवाळी

संपादक मंडळ ·
नमस्कार मिपाकरहो, दिपावली अभिष्टचिंतन! कोणताही सण आला की आपण तो साजरा करताना आई काय करत असे किंवा आज्जी कसे करत असे ते आठवून, त्यांना विचारून, पुस्तकात वाचून त्या पद्धती आचरणात आणायचा प्रयत्न करतो. काहीवेळा सगळे साग्रसंगीत करायला जमते तर कधी गोष्टी शास्त्रापुरत्या कराव्या लागतात. दिवाळी हा आपल्यकडील मोठा सण समजला जातो. चार दिवस आपापले वैशिष्ठ्य टिकवून असतात. वाईट वृत्तीचा नाश करण्यापासून ते लक्ष्मीच्या पुजेपर्यंत तर सासरच्या नातेवाईकांपासून माहेरच्या नातेवाईकांची भेट घडवत हा सण आठवणींच्या सुखाची उबदार शाल मनावर अलगदपणे सोडून पुढील वर्षाची वाट पहायला लावतो.

उडणारी पाणबुडी आणि हातभट्टीतील प्लुटोनियम म

ताजे प्रेत ·
उडणारी पाणबुडी आणि हातभट्टीतील प्लुटोनियम पुण्यातील एका वस्तीत 'रखमा' नावाच्या एका स्त्रीचा हातभट्टीचा (गावठी दारूचा) अड्डा होता. अंगावर जुनी साडी, दारूच्या वासाने भरलेले हात आणि चेहऱ्यावर कायम एक निर्विकार भाव... हीच रखमाची ओळख होती. पण यामागे एक मोठे रहस्य होते. रखमाने 'न्यूक्लिअर इंजिनिअरिंग'मध्ये डिप्लोमा केलेला होता. पण वशिलेबाजीमुळे आणि नशिबामुळे तिला कुठेच जॉब मिळाला नाही. शेवटी पोटापाण्यासाठी तिने पुण्यात हातभट्टी लावली होती. तिची मुलगी, 'णूड्रॅली', मात्र प्रचंड महत्त्वाकांक्षी आणि गर्विष्ठ होती. णूड्रॅलीला आपल्या आईची आणि तिच्या हातभट्टीच्या व्यवसायाची भयंकर चीड होती.

सहज सुचलं म्हणून _ २०२६

कंजूस ·
मागील धागा ( https://www.misalpav.com/node/52636 )जुना झाल्याने आणि खूप मोठा झाल्याने हा नवीन धागा काढत आहे. राजकीय विषय सोडून इतर विषयांसाठी. ----------------------------- एक नवीन प्रश्न . PASSKEY विरुद्ध PASSWORD १. विविध साईटस किंवा इमेलसाठी login करताना username , password टाकावे लागू नये म्हणून passkey वापरण्याची पद्धत दोन वर्षांपूर्वी आणण्यात आली. २. एकच password सर्व साईटसना ठेवणे धोक्याचे आहे असं डिजिटल सुरक्षितता जाणणारे सांगतात. एवढे password बनवून लक्षात कसे ठेवायचे? ३. एकच password लक्षात ठेवा आणि तो password vault साठी वापरा. त्यात सर्व इतर passwords ठेवा सांगतात.

इराण : डोंगरी भिवरलीचं अधर्मयुद्ध

गामा पैलवान ·
लोकहो, म्हंटलं इराणवर एक लेख व्हायला हवा. सध्या त्याच्या विरोधात अमेरिका व इस्रायल यांचं युद्ध चालू आहे. तर इराणचा इतिहासाचा व आजच्या परिस्थितीचा धावता आढावा घ्यावा असा बेत आहे. तर सुरुवात कुठनं करायची? म्हंटलं नुकताच अली खामेनेई मेलाय तर त्याच्यापासनं लेख सुरू करूया. हा इसम शियांचा प्रमुख होता असा दावा आहे. क्याथलिकांचा पोप असतो तसा. मग हा पॅट्रिस लुमुंबा नामे नास्तिक कम्युनिस्ट विद्यापीठात काय झक मारायला गेला होता का? नाही. मुळीच नाही. तो तिथे कम्युनिस्ट क्रांती भक्कम करणं शिकायला गेला होता. होय, इ.स. १९७९ ची खोमेनीची इराणातली धार्मिक क्रांती कम्युनिस्ट ढाच्यावर आधारित आहे.

शेवटचा तुकडा..

गवि ·
जतिन साधा माणूस आहे.  खूप शांत माणूस आहे. कुणाच्या अध्यात ना मध्यात. असं सागरदर्शन हाऊसिंग सोसायटीत राहणारे बरेच लोक म्हणायचे.  शांततेचा तळ किती खोल असतो याची जाणीव किंवा पर्वा वर वर पोहणाऱ्यांना नसते. त्याला एकटा मात्र कोणी म्हणत नव्हते. एकटे असण्यात एक काहीतरी अस्वस्थता, दुःख वगैरे असतं. गेलाबाजार उदास खिन्न चेहरा तरी असतो.  पण जतिनच्या आतमध्ये आता काहीच उरलं नव्हतं. त्यामुळे खिन्नताही दिसत नव्हती. त्याला एकटा तरी कसं म्हणायचं?  लोकांना काही अंदाज येणं शक्य नव्हतं.

शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..

आजी ·
हल्लीची काही मुलं परीक्षेत शतप्रतिशत म्हणजे शंभरपैकी शंभर मार्कस् मिळवतात. काहीजण तर शंभर टक्क्यांपेक्षा जास्त मार्कस् मिळवतात म्हणे.. कसे कोण जाणे.. हे सर्व माझ्यासारख्या आजी, आजोबा झालेल्या व्यक्तीला अचंबित करणारे असलं तरी ते वास्तव आहे. मी जेव्हा शाळेत जात होते तेव्हा मला कोणत्याही विषयात शत प्रतिशत गुण मिळाले असं फारसं आठवत नाही. तसं म्हटलं तर माझे भाषा विषय उत्तम होते. संस्कृत मध्ये मला दोन, तीन वेळा खरंच शत प्रतिशत गुण मिळालेही होते. पण फक्त आणि फक्त संस्कृतमध्येच.. आमच्या वेळी.. काय सांगू? ३५ टक्क्यांना पासिंग होतं. ७० टक्के मिळाले की डिस्टिंक्शन.

भाग ३ - !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!

kvponkshe ·
भाग ३ - इंटरव्ह्यू चे काही अनुभव ! अनुभव १: साधारण १० एक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी नुकताच CISSP ही सायबर सेक्युरिटी मधील अत्यंत मानाची मानली जाणारी परीक्षा पास झालो होतो. मग एका ओपनिंग साठी एका मल्टी नॅशनल कंपनीत माझा एक इंटरव्ह्यू झालेला. पोझीशन मिड मॅनॅजमेण्ट ची होती. मी अगदी वेळेच्या आधी त्या कंपनीत पोहोचलो. अजून एक दोन जण होते. ते बहुदा बिग ४ मधून आलेले असावेत. माझा नंबर आल्यावर मी आत गेलो. मुलाखत घेणारे पॅनल ३ का चार जणांचे होते. मी आत जाताच त्यांनी एकमेकांकडे सूचक नजरेतून पहिले, आणि काही क्षण माझ्याकडे पाहून मग मला बसायला सांगितले. इंटरव्ह्यू झाला. चांगला म्हणता येईल असा गेला.

"गाॅसिपिंग" याने की "कुचाळक्या"..

आजी ·
गॉसिपिंग उर्फ कुचाळक्या सर्वजण करतात. आपण सगळ्यांनी ते केलंय. लहान मुलं ,स्त्रिया, पुरुष, तरुण ,म्हातारे सगळेजण गॉसिपिंग करतात. गॉसिपिंग करण्यासाठी अट फक्त एकच. ज्याच्याबद्दल किंवा जिच्याबद्दल गाॅसिपिंग करायचं ती व्यक्ती तिथे हजर असता कामा नये. अर्थात कुणीतरी एक चहाडखोर असतोच बरं का आणि तो त्या व्यक्तीपर्यंत ही निंदा नालस्ती, टवाळकी लगबगीने पोहोचवतोच. काही पठ्ठे तर दोन्हींकडेही गाॅसिपिंग करतात आणि दोघांनाही एकमेकांच्या बातम्या पोहोचवतात. गॉसिपिंग फक्त दोघेजण किंवा अनेकजण एकत्र जमून देखील करतात. ते प्रत्यक्ष बोलून किंवा व्हॉट्सॲपवर सांकेतिक भाषेत किंवा फोनवरून देखील चालतं.

सी पी बेरार सर्किट

गवि ·
आज अचानक माझ्या लहानपणीचा भूगोल आठवला. आमचा रत्नागिरी जिल्हा तेव्हा, .. तेव्हा म्हणजे १९७० आणि १९८० च्या दरम्यान,.. पार गोव्याला जाऊन टेकला होता. देवगड हापूस आणि रत्नागिरी हापूस हे एकाच जिल्ह्यातले होते. भूगोलाच्या "आपला जिल्हा" शिकवणाऱ्या एका शालेय वर्षात आमचा रत्नागिरी जिल्हा म्हणजे नकाशातला एक लांबलचक उभट पट्टा होता. सिंधुदुर्ग जिल्हा झाला आणि तळकोंकण अशी वेगळी आयडेंटिटी गडद झाली. माझ्या रम्य बालपणी आम्ही रोज शाळेत पोचताच प्रार्थना म्हणण्यापूर्वी "प्रतिज्ञा" म्हणायचो.

बाई माझी कंबर लचकली..

आजी ·
हेलनसारखा नाच मी करु शकत नाही. अगदी जयश्री गडकर सारखाही नाही. पण तिच्यासारखं न नाचूनही मध्यंतरी माझी कंबर लचकली. दुखायला लागली. मी व्हाटस् ॲप वर लग्गेच ते सर्व मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना कळवलं. मग लगेच सूचना सुरू झाल्या "चोळ,शेक,अमुक पेन किलर घे. तमकं क्रीम लाव. पडून राहा. विश्रांती घे." काहीजणांनी विचारपूस केली. "काही जड वस्तू उचललीस का? फार वेळ खाली वाकून काही केर पोछाचं काम केलंस का?" (ही असली कामं सुनेला करायला सांगत जा."असा सल्लाही काहीजणांनी दिला.) "गार फरशीवर खूप वेळ बसलीस का?" "कमरेचे व्यायाम जास्त वेळ केलेस का?" (नशीब,कुणी झुम्बा डान्स केलास का?