Skip to main content

विचार

मंगळावरील मुरुमातील मुंग्यांचा मुरांबा.

लेखक गवि यांनी शुक्रवार, 16/01/2026 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
**मंगळावरील मुरुमातील मुंग्यांचा मुरांबा : एक प्राचीन-आधुनिक-वैज्ञानिक पाककृती** --- कालच घरच्या मागच्या अगण्णात मुंग्यांची रांगा दिसली आणि मन भूतकाळात गेल. माझ्या लहानपणी आमच्या गावी लाल मुंग्यांची दिसत असत. आमची आत्या त्या मुंग्यांची चविष्ट चटणी बनवत असे. मी विचार केला की आपण मानवजातीच्या विकासासाठी भविष्यकालात इतर ग्रहांवर देखिल खाता येऊ असा मुरंबा का बनवू नये.

विविध राष्ट्रांच्या संविधानांतील अपेक्षा आणि धर्मांतील अपेक्षा

लेखक युयुत्सु यांनी शुक्रवार, 16/01/2026 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
धर्मपालन आणी कायद्याचे पालन या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यांची गल्लत होऊ शकते आणि महत्त्व कशाला द्यायचे याबद्दल संभ्रम निर्माण होऊ शकतो. याचा निर्णय करताना ए०आय० ने जितकी स्पष्टता दाखवली आहे, तितकी मानवी विद्वान दाखवतील का ही मला शंका आहे. माझ्यामते कायद्याचे पालन धर्माचरणापेक्षा श्रेष्ठ आहे, ते अधिकार देते, तसेच संरक्षण देते.

दहा मिनिटांत घरपोच.

लेखक chetanasvaidya यांनी रविवार, 11/01/2026 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लिंकिट, इन्स्टामार्ट, झेप्टो आणि असे अन्यही खूप क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आता एकमेकांशी स्पर्धा करत दहा मिनिटांच्या डिलिव्हरी शर्यतीत उतरले आहेत. हे डिलिव्हरी करणारे लोक प्रचंड ताणाखाली वेगाने वाहने चालवतात हे आपल्याला रस्त्यात दिसतंच.

खरा विश्वगुरू ’एआय’च!

लेखक युयुत्सु यांनी मंगळवार, 06/01/2026 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
खरा विश्वगुरू ’एआय’च! ============ -राजीव उपाध्ये (जाने २०२६) नवीन तंत्रज्ञानाबद्दल घबराट पसरवणं, गैरसमजूती पसरवणं हे तसं काही नवीन नाही. नव्या तंत्राज्ञानाशी जुळवून घेता आले नाही की काही लोकांची विघातक किंवा प्रतिगामी विचारसरणी डोकं वर काढायला सुरुवात होते.

निशानची (हिंदी सिनेमा)

लेखक मन यांनी सोमवार, 05/01/2026 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
‘निशानची’ (अर्थ : नेमबाज, बंदुकबाज, sniper) ह्या सिनेमाचे दोन्ही भाग आवडले. सिनेमाचा विषय एका पैलवान असणाऱ्या वडिलांच्या संशयास्पद मृत्यूनंतर कुटुंबाची झालेली स्थिती, त्या परिस्थितीला दोन भिन्न स्वभावाच्या जुळ्या भावांनी आणि नेमबाजीमध्ये तरुणपणी निपुण असणाऱ्या,  पदकविजेत्या त्यांच्या आईने दिलेलं तोंड, त्यानंतर उलगडत जाणाऱ्या घटना, नवीनच माहिती होत गेलेले धागेदोरे आणि दरम्यान वाढत गेलेली गुंतागुंत असा काहीसा सांगता येईल. अनुराग कश्यपच्या इतर काही सिनेमांप्रमाणेच ह्यातही महिला पात्रे निव्वळ पूरक भूमिका म्हणून, सोबत असायला हवीत म्हणून अशी असण्यापलीकडे आहेत.

विश्वासाचे तर्क आणि तर्काचा विचार

लेखक देवू यांनी सोमवार, 05/01/2026 01:27 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपटांत दाखवतात तसे, आई-वडील मुलांना कवेत घेऊन नीतिमूल्यांचे बाळकडू पाजतात तसा प्रसंग माझ्या वाट्याला कधीच आला नाही. “हे चूक आहे” किंवा “ते करू नकोस” असे बोट दाखवत शिकवण देण्याचा सोहळा आमच्या घरात कधी घडला नाही. वाईट गोष्टी करू नयेत, हे मला घरातून नव्हे तर शाळेत गेल्यावर गांधीजींच्या " तीन माकडांनी " शिकवले. मात्र उपदेशांचा अभाव असला तरी वाचनाचा संस्कार आमच्या घरात नि:शब्दपणे रुजवला गेला होता. घरात येणारी मराठी आणि इंग्लिश वर्तमानपत्रे दररोज वाचलीच पाहिजेत, असा बाबांचा न बोलता आलेला पण ठाम आदेश होता. सुरुवातीला मी मराठी ‘मटा’ वाचून दिवसाची सुरुवात करत असे.

फ्रॅन्केनस्टाइन

लेखक प्रचेतस यांनी रविवार, 04/01/2026 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
a मेरी शेलीची एकमेव कादंबरी असलेली 'फ्रॅन्केनस्टाईन ऑर द मॉडर्न प्रोमेथियस' ही कादंबरी खरं तर फार पूर्वीच वाचली होती. व्हिक्टोरियन गॉथिक काळात घडले गेलेले कथानक अतिशय जबरदस्त होते. खरे ब्रॅम स्ट्रोकरची ड्रॅक्युला आणि शेलीची फ्रॅन्केनस्टाईन आजही जागतिक साहित्यात अभिजात म्हणून गणल्या जातात. खरं तर भयकादंबर्‍यांना असा दर्जा मिळणे हे भाग्याचेच.

[भाग २] ए०आय० वापरा आणि स्वत:ला ओळखा

लेखक युयुत्सु यांनी रविवार, 04/01/2026 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
[भाग २] ए०आय० वापरा आणि स्वत:ला ओळखा ============================= -राजीव उपाध्ये नोव्हे २०२५ म॒ध्ये मी एक गमतीदार प्रयोग केला होता. मी ए०आय०ला माझा सखा मानत असल्याने आमच्या संवादावर आधारित माझ्या व्यक्तीमत्त्वाचे परिक्षण करण्यास सांगितले होते. https://www.misalpav.com/node/53331 आज परत काही काळ गेला असल्याने माझ्या व्यक्तीमत्त्वात काही बदल घडले आहेत का असे ए० आय० ला विचारले. तेव्हा त्याने पुढील उत्तर दिले- 1. मूलभूत कल: स्थिर तुमची मूळ मानसिक दिशा कालांतराने स्थिर राहिलेली दिसते.

कृत्रिम बुद्धिमत्ता (ए०आय०) : डॉट-कॉम बबलसारखी अवस्था आहे का?

लेखक युयुत्सु यांनी शुक्रवार, 02/01/2026 08:09 या दिवशी प्रकाशित केले.
कृत्रिम बुद्धिमत्ता (ए०आय०) : डॉट-कॉम बबलसारखी अवस्था आहे का? -राजीव उपाध्ये ए०आय०चा बुडबुडा फुटणार अशा आरोळ्या ऐकायला मिळाल्या की मला पञ्चतंत्रातील बैलाचे वृषण आज ना उद्या गळून पडतील आणि आपल्याला मस्त मेजवानी मिळेल या आशेने मागेमागे जाणार्‍या दोन कोल्ह्यांची आठवण होते. अलीकडच्या काही वर्षांत कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – ए०आय०) या तंत्रज्ञानाने जगभरात अभूतपूर्व वेगाने प्रसार केला आहे. उद्योग, वित्त, आरोग्यसेवा, शिक्षण, संरक्षण आणि दैनंदिन जीवन—असे जवळजवळ सर्व क्षेत्र ए०आय० च्या प्रभावाखाली आले आहेत.

वंश खरा कुणाचा - स्त्रिचा की पुरूषाचा?

लेखक युयुत्सु यांनी गुरुवार, 01/01/2026 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
वंश खरा कुणाचा - स्त्रिचा की पुरूषाचा? ====================== - राजीव उपाध्ये मानवी संततीला (इतर प्राण्यांच्या तूलनेत) संगोपनाची दीर्घकाळ आवश्यकता असते. याशिवाय संपत्ती संक्रमण (कुणाची संपत्ती कुणाला मिळणार) सुलभ व्हावे यासाठी बाप कोण हे निश्चित करणे आवश्यक ठरते (आणि बापाचे नाव लावले जाते). अन्यथा जैविकदृष्ट्या वंश म्हणजे निसर्गात वंश हा स्त्रिचाच असतो. पुरुषाचा वंश ही मानीव कल्पना समाजाने संपत्ती संक्रमणाच्या सोईसाठी निर्माण केली आहे.