द्वापारयुगी मथुरानगरीचा राजा होता 'कंस'.....
सदा छळे तो सज्जना, करी अति विध्वंस....
अत्याचारांचा भार न पेलवला धरणीमातेला....
दुष्टाच्या निर्दालना, जन्म घेण्या...ती विनवी प्रभुला...
या कंसाची, पाठची बहीण होती 'देवकी'...
पुढे 'वसुदेवा'ची ती राणी झाली लाडकी...
वरातीच्या रथाचे सारथ्य पत्करले होते कंसाने...
बहिणीची पाठवणी करत होता मानाने....
इतक्यात, घनगंभीर आवाजात, एक आकाशवाणी वदली...
ऐकून ती, कंसाची जणू पाचावर धारण बसली...
"कंसा, तुझी लाडकी बहीण आता तुझीच वैरिणी बनेल.
देवकीच्या 'आठव्या' गर्भाकडून तुझा मृत्यू घडेल."
ऐकून ती आकाशवाणी, चवताळला, संतापला कंस...
नवपरिणित दांपत्याला मग घडला बंदिवास