गणेशभक्त सलमान!
बेफाम गाडी चालवुन केलेला अपघात, केलेले तमाशे वगैरेसाठी कुप्रसिद्ध झालेल्या सलमानने घरात गणपती बाप्पांना आणले, त्यांची सहकुटुंब पूजा अर्चा केली. या कृत्यामुळे मुल्ला मौलवी व धर्मांध संघटनांनी त्याच्याविरुद्ध फतवा काढला आहे. यावर प्रतिक्रिया देताना सलमानने 'या धर्मगुरुंनी दहशतवाद व दहशतवादी यांच्याविरूद्ध फतवा का बरे काढला नाही?' आणि "या सर्वधर्मसमभावी देशात कुणाही धर्मीयास कोणत्याही धर्माचे पालन करण्याची पूर्ण मुभा आहे' असे म्हटले आहे.
हिंदु संघटनांनी केलेल्या आवाहनांवर आगपाखड करुन या संघटनांना अतिरेकी, प्रतिगामी, समाजघातकी, मूलतत्ववादी, धर्मांध वगैरे विशेषणे बहाल करुन त्यांचा धिक्कार करणारे व आवाहन करणार्या संघटनांवर बंदी घालण्याची मागणी करणारे 'समाजवंत व विचारवंत' या फतव्याविरोधात मात्र अद्याप मूग गिळुन आहेत. चालायचेच.
हिंदु संघटनांनी वा संस्थांनी एखाद्या नाटकाला/ चित्रपटाला हरकत घेत त्याचे प्रयोग बंद पाडायचा प्रयत्न करताच 'कलेच्या स्वातंत्र्याची गळचेपी' सहन न झालेले सप्तस्वातंत्र्याचे तमाम उद्गाते जेव्हा हुसेन निर्मित चित्रपटातील काही भागाला मुस्लिम संघटनांनी आक्षेप घेतला व हुसेन साहेबांनी तो भाग विनाशर्त काढुन टाकला तेव्हाही असेच गपचूप बसलेले होते.
वाचने
3042
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
या
या कुटुंबाचा धर्म कोणता?
अगदी अगदी...
In reply to अगदी अगदी... by भडकमकर मास्तर
प्रत्येक
"प्रत्येक