अमृत धारा
प्रतिक्षेत जीव हा दाहला
विसंबली तुजवर जीवनमाला
तुजविन हर जीव अधुरा
आकाशी फाकल्या निल धमन्या
डोंगरी आगी वाचुन वणवा
सिंधू, तलावाची महानता पणाला
घाल धाव बरसत जीवन धारा
अधिर धरती तुज स्पर्शाला
तुज संगच्या ओलपणाला
गुदमरे अंकुर बी प्रसुतीला
पशू पक्षी घालती कोरड ताना
वृक्षे आतूर गार पल्लवीला
ये रे बरसत अमृत धारा.
Taxonomy upgrade extras
मिसळपाव
गमभन मध्ये वापरता असलेल्या भारतीय भाषांमध्ये चॅटींगची सोय एजीओजी.कॉम या संकेतस्थळावर सुरू केली आहे. इथेही गमभन वापरले आहे.
ह्याबद्दल अधिक माहिती -