मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बालगझलः झुऽम झुऽम झुऽम

ऋषिकेश · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
टारगेट वयोगटः २ ते ७ वर्षे ( + काहिश्या निरर्थक नादमय कवितेची मजा घेऊ शकणारा इतर कोणत्याहि वयाचा) इथे झुऽम झुऽम झुऽम ला अर्थ देणारी एखादी हस्तमुद्रा/हावभाव/अंगविक्षेप पालकांनी/शिक्षकांनी करून दाखवणे अपेक्षित आहे. तसेच शेवटाचे कडवे मुल अगदी लहान असेल व दूध पित नसेल तर या तालात पिऊन टाकते असा अनुभव आल्याने टाकले.. एरवी म्हणताना गाळले तरी चालेल =========================== विमान झेपावे कसे? झुऽम झुऽम झुऽम मासा तळी पोहतसे..झुऽम झुऽम झुऽम घोरण्याने काकांच्या मिशीवरून माशी बघा पळतसे...झुऽम झुऽम झुऽम ढेरपोट्या गोट्याच्या पोटावरून धोतर सुटले कसे...झुऽम झुऽम झुऽम टाकलेल्या केळ्याच्या सालीवरून पाय सरकती कसे..झुऽम झुऽम झुऽम तळ्यामधील कमळांच्या पानावरून बेडुक पोहति कसे...झुऽम झुऽम झुऽम बोर्नवीटा घालून ग्लासामधून बाळ दुध पितो कसे...झुऽम झुऽम झुऽम -ऋषिकेश

वाचने 2412 वाचनखूण प्रतिक्रिया 12

अवलिया 12/06/2009 - 18:45
हे हे लुशी लुशी काका! अज्युन लिही नं चान चान !!! =D> =D> =D> (गेल्या कित्येक दशकांपासुन वय वर्षे २ ) अवलिया

चतुरंग 12/06/2009 - 19:06
मस्तच गजल रे ऋषि! :) (अवांतर - आधी 'टारगट वयोगट: २ ते ७' असं वाचलं! ;) ) (टारगट)चतुरंग

संदीप चित्रे 12/06/2009 - 19:40
आधीच लहान मुलांसाठी काही लिहिणं अवघड... त्यात गझल... :) मजा आली.

लिखाळ 12/06/2009 - 20:54
मजा आली :) -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

प्राजु 13/06/2009 - 00:01
खूप छान आहे. लुशी मामाची गझल ऐकल्यावर सगळे नाचती कसे झुऽऽम झुऽऽम झुऽऽम!!! :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर 15/06/2009 - 09:12
धमाल आली रे ऋष्या! :) (बोर्नव्हिटा प्रेमी) तात्या.

मिसळभोक्ता 15/06/2009 - 09:19
बालगीत चांगले आहे. गझलेचे सर्वच नियम धिक्कारल्यामुळे कितीही प्रयत्न केला तरी बालगझल म्हणता येणार नाही. -- मिसळभोक्ता (अधिक माहितीसाठी प्रभूमास्तरांना भेटा.)