Skip to main content

प्रतिभा

देणं-घेणं

लेखक जागु यांनी गुरुवार, 30/04/2009 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्टी - गोष्टीचा व्यवहार, जागोजागी चालतो बाजार ! देणे-घेणे सॄष्टीचा नियम, फळासाठीही ,लागतो संयम! पाहण्यासाठी लागते नजर, प्रश्नालाही लागते उत्तर ! दाम मिळाले तरच काम, आळसासाठी ही ,लागते बेकाम ! देता ओलावा फुटेल अंकुर, अंधार मिळताच, चांदणे टिपूर ! घेण्यासाठी द्यावा लागतो श्वास, अन्यथा मिळतो, यमपुरी वास !
Taxonomy upgrade extras

जगाची रित.

लेखक जागु यांनी बुधवार, 29/04/2009 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
जगाची ही रितच न्यारी, कसेही वागा निंदाच पदरी ! गुणी, सज्जन ठरतो बावळट, स्पष्टवक्ता, म्हणे आम्हास उद्धट ! शांत व्यक्तीला 'माठाची' ची उपमा, चतूराच्या माथी, धटिंगडाचा तुरा ! सुट्टी घेतल्यास होतो कामचुकार, राब-राब राबल्यास ओटी चा भिकार ! सुखात नांदल्यास, बायकोचा बईल, समाजात गुंतल्यास, ह्याचे कसे होईल ? दान करणार्‍यावर, काळ्या पैशाचे लेबल, काट्-कसर करणारा, कंजूष एक नंबर ! निंदकाचे घर असावे शेजारी, शेजार्‍यालाही असतोच शेजारी !
Taxonomy upgrade extras

(ठेव दरवाजा खुला...)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 28/04/2009 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा 'ठेव दरवाजा खुला...' ही भूषण कटककर यांची सुंदर गजल! ;) जाहले आहे कठिण, मी भेटणे म्हणजे तुला बेरकी बापुस कधीचा शोधतो आहे मुला! मी सदा वाईट ठरतो, चांगला ठरतो कधी? बंधुराजे गाठ पडता, ठणकतो माझा कुला दूरदर्शन व्हायचे मज तेवढी होती मुभा हलवताना हात दिसली दूरच्या कोणा मुला रोजचा हा सीन, देते पोरगी हुलकावणी मारते फाट्यावरी पण मारते तोवर डुला! छापकाटा चालला आहे नशीबाचा असा वाट का मी बघत राही रातचा लकडी पुला! रोज काटे टोचती जे आज देखिल टोचले का पुन्हा मी हासलो पण आज दिसलेल्या फुला हाय!

श्री गजानन महाराज ! भक्तिरचना...

लेखक चंद्रशेखर महामुनी यांनी मंगळवार, 28/04/2009 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो.... आत्ता पर्यन्त तुम्ही माझ्या ' प्रेम कविता ' वाचल्यात... त्यांना खुप छान प्रतिसाद दिलात.... आता मी ... ही भक्तिरचना... तुमच्या पुढे सादर करित आहे..... || श्री गजानन महाराज || गजानन नाम... ज्याच्या मुखातुन... [२] चित्ती समाधान.... लाभतसे.... [२] गजानन नाम .... || धृ. || शेगावी प्रगट्ला.. उद्धारण्या जगा प्रेमरुप झाला... भक्तांसाठी... मनोभावे, मुखी घ्यावे.. [२] गणी गणात बोतें.. गजानन नाम .... || १ || काया-वाचा-मने... चित्त एक झाले जीव-शिव तत्व ... एकरुप झाले .. नामा संग, झालो दंग..[२] अंत पार झाला.. गजानन नाम ...
Taxonomy upgrade extras

खरेदी - कोणता घेऊ?

लेखक समजा मी क्ष यांनी मंगळवार, 28/04/2009 06:56 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या बूट चप्पल फेकण्याची टूम निघाली आहे. त्यावर मला सुचलेले हे चित्र.
Boot
माझी चित्रकला हलकी घ्यावी हे सुजाण प्रेक्षकांना कळेलच :) अद्वैत.

जे मला दिसले ते

लेखक दशानन यांनी रविवार, 26/04/2009 17:19 या दिवशी प्रकाशित केले.
वाकडा कंपु तिकडी चाल सगळे भरती माल रिते आमची झोळी शब्दांवाचूनी यार प्रतिसादांच्या लढाईमध्ये एकाची वरताण तर दुसरा घासे वहाण ह्या दारातून त्या दारावर प्रतिसाद बद्दल प्रतिसाद शब्दांना विके कोणी शब्दांसाठी लिहतो एकच बाकी +१ सगळे मागोमाग भार लिहतोय कोण भांडतोय कोण शब्दांना वेठिस धरतोय कोण एक खवाट बाकी सुसाट डुप्लिकेट आयडीचा नेहमीच सुळसुळाट एक नारी नाव धरे भारी हवा दिसे तीज विषारी शब्दांत तीच्या जळजळाट फार तळपते सोडून विषय पार !

मी वसंत मी वसंत..

लेखक प्राजु यांनी गुरुवार, 23/04/2009 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
शिशिरी मळभ दूर झाले, उत्तरायणी रवी आले, बेहोषला आसमंत, मी वसंत मी वसंत... खुलते आज कळीकळी, पानोपानी ही झळाळी, भ्रमराला ना आज उसंत, मी वसंत मी वसंत... ध्यान उभे बैराग्याचे, सळसळणारे मन त्याचे, पिंपळाचा श्वास संथ , मी वसंत मी वसंत... आज तयाला भान नुरे, सुवर्णाचे नाजूक तुरे, राजस आम्र उन्मत्त, मी वसंत मी वसंत... धरा होती ती ल्यायली, दाट धुक्याच्या त्या शाली, सुवर्णरेखा ही दिगंत, मी वसंत मी वसंत... तृणांकुराचे हे थवे, आज भासती नवे नवे, पानगळीची उगा खंत, मी वसंत मी वसंत... भरून गेली किल्बिल सारी, विहंगाची उंच भरारी, सृष्टीची ही नशा जिवंत, मी वसंत मी वसंत...