इंगळी

लेखनविषय:
लेखनप्रकार
चुलीतलं लाकूड तापून लालबुंद झालं होतं. निखारा तप्त होता. आग भडकली होती. छकुलीनं साडी वर करून पिंडरीला उगाचच एक चटका दिला. "आईSss गं.." "काय झालं वैनी.." मास्तरानं भुरका भरत विचारलं. "काय नाय जी... इस्तू लागला जरा.." चुलकांडातली लाकडं तिनं बाहेर काढली. "हिकडंच येत जावा की जेवायला... त्या डब्यातलं कसं खाव रोज.." "सवय झालीय आता... परगावातली नोकरी म्हटलं की अडचणी या आल्याच..." मास्तरनं भातात अजून थोडं वरण ओतलं. अन पुन्हा एक भुरका भरला. "मग बायकुच करावी की एकांदी.." छकुलीनं परातीत पाणी ओतलं. कंदिलाच्या अंधुक प्रकाशात मास्तर तिला लाजून गेल्यासारखा भासला.

आमावस्येचा चंद्र

लेखनविषय:
लेखनप्रकार
एका भिताडावरून उडी हाणताना नेमकं एक भगुणं मधी आलं आणि भुऱ्या सामानासकट खाली कोसळला. चिंचेखालच्या कुत्र्याने कान टवकारले. गडद अंधारात उन्मळून पडलेला भुऱ्या त्याला दिसला आणि ते दबकून गेलं. सवंदडीतली म्हैस बिथरली. हुकल्यासारखा क्षणोक्षणी लागून विझणारा एक जुनाट बल्ब बोचऱ्या थंडीशी लढत होता. मंद हवेची एक झुळूक बाजरीच्या ताटातून सळसळत निघून गेली. भुऱ्यानं सावध कानोसा घेतला. चप्पल अर्धवट तुटलं होतं. नडगी फुटली होती. हात सालवटून निघाले होते. डोक्याला मुक्का मार बसला होता. सावकाश उठून त्याने पोत्यातून बाहेर पडवेली कळशी पुन्हा आत घातली. अंधारात चौफेर नजर फिरवून त्यानं ते पोतं पुन्हा खांद्यावर घेतलं.

x

लेखनविषय:
लेखनप्रकार
सुंदर सुंदर सकाळ झाली. सुंदर सुंदर सुर्य उगवला. काळ्या लाल पिसांचा सुंदर कोबडा भल्या सकाळी सुंदर आरवला. नदी सुंदर दिसत होती. झाडे सुंदर दिसत होती. आभाळही सुंदर दिसत होते. अधूनमधून ढग दिसत होते. तेही तितकेच सुंदर होते. जागोजागी धुके पसरले होते. ते ही तितकेच सुंदर होते. कुठेसा थोडासा हलकासा भुरभुरा पाऊस पडत होता. तो ही तितकाच सुंदर होता. एका सुंदर झाडाखाली म्हसोबाचे एक सुंदर देऊळ होते. त्याच्या पायऱ्यांवरती फुलांचा सुंदर सडा पडला होता. 'ही पण एक सुंदर दुपारंच म्हणायची' काळ्या पाषाणावर झोपलेल्या वैराग्याने हात वर करून कडकडून आळस देत मनाशीच म्हटले.

!माझी छबी!

लेखनविषय:
लेखनप्रकार
तिचं आणि माझं नातं काही वेगळंच आहे. एकमेकींचे लाड करतो. उपदेश करतो. आमचे जितके मतभेद असतात तितकाच जिव्हाळाही असतो. आमचे संवाद कधी हळवे तर कधी हसून हसून डोळ्यात पाणी आणणारे, कधी बौध्हिक पातळीवरचे तर कधी स्वयंपाकातील धाडसी प्रयोग यांची प्रेरणा देणारे, कधी उद्बोधक तर कधी आयुष्याला वेगळे वळण देणारे असतात. माझा तिला आणि तिचा मला शारीरिक, बौधहिक, मानसिक बदल लगेच जाणवतो. या मागे कोणती अंतःप्रेरणा असेल ? जन्मजनमांतरिचा एक स्त्री असल्याचा समान धागे तुझ्यातल्या मला माझे दर्शन घडवून देत असते. कशाला बघू मी उगा आरशात !

कागदाचे झाड

प्रिय जिब्रान खलील, माझ्या लाडक्या मुला, कसा आहेस? देवाने तुला आता भरपूर कागद दिले असतील. पण आता तुला लिहायची इच्छा नसेल, कि अजूनही आहे? माहित नाही. आज तुला पत्र लिहावेसे फार फार वाटत आहे. काल रात्रभर तुझी आठवण येत राहिली, येतच राहिली. तू छोटासा. अरेबिक शब्द, वाक्यं लिहायचा छंद तुला. आईला म्हणालास, ‘आई, मला कागद दे ना आणून! मला लिहायचेय!’ तिने आजूबाजूला पाहिले. घरावर जप्ती येऊन ते दुसऱ्याच्या ताब्यात गेलेले. नवरा तुरुंगात. पदरात छोटी मुले.धर्माची बंधने. बाहेर अंदाधुंदी. छोटीमोठी कामे करून कशीबशी हातातोंडाला गाठ घालीत असे. तिने एकवार तुझ्याकडे असे पाहिले....

प्रिय नर्मदेस

( आज सरिता दिन. त्या निमित्त.....) प्रिय नर्मदेस, कारण काहीही असो, माणूस अनिकेत होतो तेव्हा पाण्यापाशी पोहचतो. मी तुझ्यापाशी पोहचले. अजून ती पहाट आठवते. मध्यरात्री कधीतरी मराठी मुलुख मागे पडला. दुसरा मुलुख लागला हे एसी गाडीतही कसं कळतं? पण कळतं. माणसं निराळी भासू लागली. हळूहळू अनोळखी भाषा कानावर पडू लागली. लक्ष देऊन ऐकलं कि कळतेय असं वाटायचं. पण थकून गेले. किती वेळ कान ताणणार? उन्हाळ्यातील पहाट म्हणजे तशी सकाळच. एकदम गाडीचा आवाज बदलला. कुणी म्हणालं, ‘नर्मदाजी’. मी फट्कन खिडकीवरचा जाड पडदा बाजूला सारला. बाहेर पाहिलं ....... गाडी तुझ्यावरच्या एका अजस्त्र पुलावर उभी होती. टोल भरायला.

चल, घरी चल .....

तू मरून, मोजून १३ वर्षे, ५ दिवस आणि काही तास झालेत. काय काय घडत नाही इतक्या काळात? म्हटलं तर फार काही. म्हटलं तर काहीच नाही. मरणाच्या क्षणापाशी काल गोठून जातो. पण, तू निघून गेल्यापासून back up ठेवल्यासारखा भेटतोयस. आधी फार जड गेलं. मी अनंत काळ अशीच रडत राहणार असं वाटलं. पण तसे नाही घडले. तू परत भेटलास! माझ्या घरासमोर मंदिरापाशी, रात्रभर पावसात वाट पहात उभारलेला. का तर, मी एकदा तरी खिडकी उघडेन, किती पाउस पडतोय असं म्हणत बाहेर बघेन, आणि तुला दिसेन. पहाटे पाऊस टीपटीप करीत थांबला. पुजारी आला. एवढ्या पावसात चहाचा रिकामा कप कोण ठेवून गेलं, म्हणून इकडे तिकडे विचारीत राहिला.

म्हागृ महिमा..

महागुरू सचीन 'पीळ'गावकर हे एक महान व्यक्तिमत्व आहे. आता, त्यांचे कर्तृत्वच इतके महान की स्वतःविषयीचे गौरवोदगार त्यांनी काढले नाहीत तर बोलणंच बंद करावे लागायचे त्यांना. काही नतद्रष्ट मात्र टिंगल करतात त्यांची, पण म्हाग्रु त्या सर्वांना पिळून(सॉरी, पुरून) उरलेत. महाराष्ट्राचा अल पचिनो असे त्यांना म्हणतात खरे पण जॉनी डेप ला अमेरिकेचा सचिन पीळगावकर म्हणतात हे कुणी नाही सांगत.(ये बीक गयी है मिडिया, दुसरं काय?) विग घालून का होईना, पण तारूण्य काय टिकवलंय म्हाग्रुंनी!

फ्यूज -२

लेखनविषय:
लेखनप्रकार
फ्यूज १ ------------- सकाळ झालेली असते. सुर्य उगवलेला असतो. नदी वाहत असते. मग मी त्यात आंघोळ करून घेतो. मला चांगलं वाटतं. मग मी आंडरवेअर पिळून घेतो. मग घरी जाऊन तारेवर टाकतो. मग चौक असतो. चौकात लोकं आसतात. गाड्या रिक्षा टेम्पो भरपूर प्रमाणात पळत आसतात. मी गणपतीच्या देवळात जाऊन तिथला भात खातो. मला चांगलं वाटतं. मग दुपार झालेली असते. ऊन पडलेलं असतं. चौथऱ्यावर सावली असते. सावलीत झोप चांगली येते. माणसाने कायम सावलीत झोपावे. मग त्यानंतर हळूहळू संध्याकाळ होत असते. संध्याकाळी माणसं सावलीतून उठून आपल्या आपल्या घरी जातात.
Subscribe to प्रतिभा