इंगळी
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about इंगळी
- 16 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
चुलीतलं लाकूड तापून लालबुंद झालं होतं. निखारा तप्त होता. आग भडकली होती. छकुलीनं साडी वर करून पिंडरीला उगाचच एक चटका दिला. "आईSss गं.."
"काय झालं वैनी.." मास्तरानं भुरका भरत विचारलं.
"काय नाय जी... इस्तू लागला जरा.." चुलकांडातली लाकडं तिनं बाहेर काढली. "हिकडंच येत जावा की जेवायला... त्या डब्यातलं कसं खाव रोज.."
"सवय झालीय आता... परगावातली नोकरी म्हटलं की अडचणी या आल्याच..." मास्तरनं भातात अजून थोडं वरण ओतलं. अन पुन्हा एक भुरका भरला.
"मग बायकुच करावी की एकांदी.." छकुलीनं परातीत पाणी ओतलं. कंदिलाच्या अंधुक प्रकाशात मास्तर तिला लाजून गेल्यासारखा भासला.