मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रतिभा

मोनालीसा

कौस्तुभ ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
मोनालीसा तू उतरावीस माझ्या कवीतेत जशी मोनालीसा व्हिन्सीचा चित्रात टिपून घेता यावेत तुझा मनाचे सर्व बारकावे तुझा गुढ गुपीतांसकट माझा कवीतेत जे ताडता येणारही नाही कदाचीत तुझा शरीरावर हक्क असणर्यालाही अगदी मोनालीसासारखे... तू होऊ शकत नाहीस माझी मान्य पण दूर उभे राहूनही तुझा इतके जवळ जाता यावे माझा कवीतेतून की, पुढे इतीहासाने विस्मरावे तुझे आप्त,कुळ,गाव तुझा उगम तुझा अस्त ते सुरु व्हावे फक्त माझापासून अन संपावे माझाबरोबर अगदी मोनालीसासारखे... आता एक कर ,माझ्यासाठी रडू नकोस, मला तुला रडवे बघून कवीता नाही करता येणार दाब सारे अश्रू स्वस्थ हो तुझा संसारात आणि हास अगदी मोनालीसासारखे... हे शब

काय करावे कळत नव्हते

कौस्तुभ ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
काय करावे कळत नव्हते मागुनही मिळत नव्हते सरपटणार्या त्या आयुष्याला हक्काचे असे बिळच नव्हते -------------------------- काय करावे कळत नव्हते कुणी आपुले म्हणतच नव्हते शिवलेल्या त्या कावळ्याला जिवंतपणि जगणेच नव्हते -------------------------- काय करावे कळत नव्हते समोर असून दिसत नव्हते ती हाक ओठांवर पेलण्याला शब्द माझे धजत नव्हते ---------------------------- काय करावे कळत नव्हते रक्त व्यथेतून रुकत नव्हते ह्रुदयावर फिरलेल्या त्या मोरपीसांचे अरे घाव काय थोडे होते -- कौस्तुभ

कालची गळाली फुले रे

कौस्तुभ ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
कालची गळाली फुले रे, आज नविन आली त्यांची अपूर्ण स्वप्ने आज पूर्ण झाली सार्या सडक्या बिया त्या परसात फेकून दिल्या मी कशा सुरेख लोम्ब्या आल्या त्यातल्याच काही रूजुनी कालची रडकी दु:खे पहा आज सुखे व्याली त्यांची अपूर्ण... नभात तुटले तारे म्हणून कधी तारांगण रडते का रे आत्म्यास तयांचा शांती म्हणून कुणी श्राद्ध करते का रे अरे ,नव्या उमलत्या तार्यास त्याने फक्त जागा रीकामी केली त्यांची अपूर्ण... बंध रेषमी धरून उराशी झाडाने उगीच गलका केला म्हणे,फुलपाखरु हळुवार होता होता सुरवंट नाहीसा झाला अरे सुरवंट त्यातला संपला कधीचा फक्त उद्घोषणा आज झाली त्यांची अपूर्ण... अखंड फिरत्या चक्राची या तू एक गिर

ए मालिक तेरे बंदे हम! (रौशनी - अवांतर..!)

विसोबा खेचर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
राम राम मडळी, आज रौशनी -५ हा भाग शैलेन्द्र यांनी प्रतिसाद देऊन वर आणला आणि मी पुन्हा एकदा रौशनीच्या आठवणीत गुंतलो. दिवस थोडासा अपसेटच गेला. मंडळी, रौशनीचं लेखन बरंच म्हणजे बरंच लांबलं आहे हे अगदी कबूल! तसं माझं लेखन सुरू आहे, पूर्णही होत आलं आहे आणि मी ते वेळोवेळी सेव्हही करून ठेवलं आहे. आता लेखन जेव्हा पूर्ण होईल तेव्हाच ते प्रसिद्ध करीन म्हणजे वाचकांची गैरसोय होणार नाही. असो.. मंडळी, रौशनी हा माझ्या आयुष्यातील एक वेगळाच अनुभव. ही बया खूपच वेगळी होती.

बुद्धीबळ खेळणारे यंत्र!

चतुरंग ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आपल्या संपूर्ण बुद्धिबळ कारकीर्दीत फक्त ३६ डाव हरलेल्या आणि सातत्याने आठ वर्षे अपराजित राहिलेल्या माणसाला 'बुद्धिबळ खेळणारे यंत्र' असा किताब मिळाला नसता तरच नवल. बुद्धिबळातला चमत्कार असं ज्याचं वर्णन केलं जातं त्या होजे राऊल कॅपाब्लांका बद्दलच मी बोलतोय. १८८८ मधे दक्षिण अमेरिकेतल्या क्यूबा ह्या देशात जन्मलेल्या होजेचे बुद्धिबळाचे प्राथमिक शिक्षण घरातच वडिलांशी खेळताना झाले. चार वर्षाच्या कापाने वडिलांना घोड्याची एक अयोग्य खेळी करुन त्याला फसवताना पकडले आणि त्यांनी नेमका काय प्रकार केला ते त्यांना नीट समजावून सांगितले!

पं यशवंतबुवा महाले, एक आभाळाइतका मोठा माणूस!

विसोबा खेचर ·
लेखनविषय:
"अरे तू येणार होतास ना? कधी येणार आहेस? अरे किती रे वाट पाहयची तुझी! एकदा घरी येऊन माझ्या तंबोर्‍यांच्या जवारीचं काम तेवढं कर की रे जरा!" "हो महालेसाहेब. आता एकदा नक्की येतो, जमवतो!" महालेसाहेबांच्यात आणि माझ्यात फोनवर असा संवाद अनेकदा झाला आहे. त्यांचा फोन आला की मलाच अपराधी वाटतं आणि कामांची सगळी गडबड बाजूला सारून महालेसाहेबांकडे आता अगदी नक्की जायचंच, असं मी ठरवतो! पं यशवंतबुवा महाले. गाण्यातला एक मोठा माणूस! परंतु हे नांव अगदी सर्वांनाच माहिती नाही.

(येऊ कसा तुमच्यात मी)

चतुरंग ·
लेखनविषय:
योगेश वैद्य यांची 'येऊ कसा तुमच्यात मी' ही कैफियत ऐकली आणि एकदम वेगळीच तक्रार डोक्यात रुंजी घालून गेली! ;) घालू कसा शर्टास मी? चालू कसा रस्त्यात मी? तन भारी माझे मला, मावेन का प्यांटीत मी? आरशात मावे न मी जाऊ कुठे, जाऊ कसा? संपेचना हे दोंद, का एवढा बहरात मी? आवळून पट्ट्यास ह्या पोटास ना जावू दिले एवढे जमते मला, आहे तसा निष्णात मी वाटे किती, भेटू तुला, सांगू तुला, का मी असा? पोट येते आधी जरासे आणि त्या पश्चात मी 'काटे' जरी मी मोडले ना थांबले खाणे तरी भेट घ्याया येत होतो अडकलो 'केकात' मी चतुरंग

पर्जन्याष्टक

अविनाश ओगले ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
पर्जन्याष्टक १. खूप पाऊस आला आणि गारा पडायला लागल्या तसा मी खिडकी बंद करायला धावलो... तू दार उघडून थेट अंगणात गारा वेचायला! दोन चार हळव्या गारा माझ्यासाठी ओंजळीत घेऊन तू आलीस. पावसात भिजलेली तू तुझी आर्जवी ओंजळ ओंजळीत विरघळणा‍र्‍या गारा... मी पहातच राहिलो- पावसात भिजल्यावर कविता कशी दिसते ते! २. मी एकदाच तुला विचारलं_ “पावसाचं आणि तुझं नातं काय?” तू माझ्या मिठीत शिरत म्हणालीस, “बघ ना माझ्या डोळ्यात!” तेव्हा तुझ्या डोळ्यात बेभान पाऊस आणि श्वासात मृदगंध... ३. बाहेर खूप पाऊस कोसळत होता रात्री आणि मी आपला तुला पावसाच्या कविता वाचून दाखवत होतो. अचानक दिवे गेले, अंधार झाला. एक वीज