कालची गळाली फुले रे
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
कालची गळाली फुले रे,
आज नविन आली
त्यांची अपूर्ण स्वप्ने
आज पूर्ण झाली
सार्या सडक्या बिया त्या
परसात फेकून दिल्या मी
कशा सुरेख लोम्ब्या आल्या
त्यातल्याच काही रूजुनी
कालची रडकी दु:खे
पहा आज सुखे व्याली
त्यांची अपूर्ण...
नभात तुटले तारे
म्हणून कधी तारांगण रडते का रे
आत्म्यास तयांचा शांती
म्हणून कुणी श्राद्ध करते का रे
अरे ,नव्या उमलत्या तार्यास त्याने
फक्त जागा रीकामी केली
त्यांची अपूर्ण...
बंध रेषमी धरून उराशी
झाडाने उगीच गलका केला
म्हणे,फुलपाखरु हळुवार होता होता
सुरवंट नाहीसा झाला
अरे सुरवंट त्यातला संपला कधीचा
फक्त उद्घोषणा आज झाली
त्यांची अपूर्ण...
अखंड फिरत्या चक्राची या
तू एक गिरकी आहेस
उत्तुंग उडत्या चिर स्वप्नांची
अपूर्ण फिरकी आहेस
म्हणून
ना शोक करा, ना लोभ धरा
फक्त या जन्माचे, त्या जन्माला
देणे करावे हवाली
त्यांची अपूर्ण...
-- कौस्तुभ आपटे
वाचने
3661
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
सुंदर
वा वा...
फार सुंदर!
सुंदर..
कविता आवडली.
In reply to कविता आवडली. by मुक्तसुनीत
असेच म्हणतो!
व्वा.....
आभार!!!
कविता आवडली.
आभारी