Skip to main content

प्रतिभा

माझंही एक चित्रं..

लेखक स्मिता यांनी मंगळवार, 12/08/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर मंडळी..नमस्कार! ईथे बरीच चित्र बघितली, माझंही एक चित्रं टाकत आहे.. (नविन "कलादालन" काही सापडलं नाही बुवा) या चित्राचं एक मोठ्ठं पेंटिंग बघितलं आणि बसल्या जागी पेनने हे चित्र काढलेलं आहे. घरच्यांकडुन नेहामीच खरपुस समिक्षा व्ह्यायची चित्रांची, तेव्हा तुमच्याकडुन पण खरया आणि सुचक समिक्षेची अपेक्षा करते. :)

तुला खात्री आहे?

लेखक ऋषिकेश यांनी शनिवार, 09/08/2008 या दिवशी प्रकाशित केले.
भोवती बघ.. थोडं तु खाली बघ इथे दिसणारे चेहरे बघ... तुला खात्री आहे?तुला इथेच पोचायचं होतं? हे तुझ्या भोवतीचे मित्र... पण हे आहेत का "खरे" मित्र? ते करतील का तुझ्यावर माझ्याइतकं प्रेम? तुला खात्री आहे? तुला इथेच पोचायचं होतं? तु "हे" आयुष्य जगायच्या इतक्या घाईत आहेस त्यासाठी इतक्या वेदना दिल्यास.. दुखावलं आहेस भोवती बघ.. अगदी नीट बघ फक्त दोघे..तु आणि मी तुला खात्री आहे? तुला इथेच पोचायचं होतं? माझ्या अश्रुंमुळे मन वळवू नकोस, मी रडत नाहि... हे अश्रु हल्ली माझा भाग झाल्यासारखे वाटतात भोवती बघ.. अगदी नीट बघ सगळ्या भोवतालच्या सवयीच्या लोकांना बघ तुला खात्री आहे?

प्रतिसाद विजूभै का असा लिहिलात!

लेखक केसुरंगा यांनी शनिवार, 09/08/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या चमत्काराने चक्क जुलै-आगष्टात देखील एप्रिल फळे क्रमशः चाखायला देणारे आणि आपल्या स्वप्नांच्या चमत्कारी(क) दुनियेतून क्रमशः फिरवून आणणारे आमचे परमजालस्नेही विजूभाऊ यांनी आज एका विडंबनाला प्रतिसाद देताना टीका करण्याच्या जोषात 'वेडात मराठे वीर दौडले सात' चे विडंबन करुन दाखवा पाहू आणि स्वतःला धन्य समजा, असे उद्गार काढले मात्र! डोक्यातुनी उठली एक वीज जोरात प्रतिसाद विजूभै का असा लिहिलात! हे लिहिले कुचकट थोडे किंचित वेले सरदार आम्ही सरसावुन उठलो शेले आव्हान देऊनी आज, तुम्ही हो फसले करणार विडंबन पाहा आता, फटक्
Taxonomy upgrade extras

एका तळ्यात होती बदके पिले अनेक...

लेखक मृगनयनी यांनी शुक्रवार, 08/08/2008 या दिवशी प्रकाशित केले.
एका तळयात होती बदके पिले अनेक.... मी एक रानफूल.. नि तो राजहंस एक... संगणक शिकण्यासाठी जॉईन केलं 'अपटेक'... होती सुट्टी क्लासला.. म्हणून गुंफिला गजरा सुरेख... सुटे पैसे नव्हते, म्हणून भाजीवाल्याला दिला चेक... पण त्या अडाण्याला, तो वटवण्याची कळली नाही मेख... कशी कळणार त्याला, तो भाजीवालाच होता फेक... जेवायचा नव्हता मूड, म्हणून घेतलं नुसतं मिल्कशेक... सर्विसिंगला गाडी टाकली, कारण फेल होते ब्रेक... आईने दिले देवाचे निर्माल्य, म्हणाली पाण्यात टाक... सापडले एक तळे मजला, म्हणजे विंग्रजी तला लेक... त्याच, एका तळ्यात होती बदके पिले अनेक.... ( 'प्राची' ला 'गच्ची 'जोडण्याचा...एक अंमळ अट्टाहास...) :)
Taxonomy upgrade extras

आंबट-गोड नाती

लेखक स्वाती फडणीस यांनी मंगळवार, 05/08/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आंबट-गोड नाती . चिंचेचा आकडा गं.. शेपटावाणी वाकडा गं.. चिंचेचा आकडा.. वाकडा गं.. पेरा-पेरात गाठी गं.. चिंचोक्या बाटी गं.. पेरा-पेरात गाठी.. बाटी गं.. आकड्याची गोडी गं.. पोरं यडी-खुळी गं.. आकड्याची गोडी.. खुळी गं.. जिभेला हुळहूळ गं.. खाताना कळ गं.. जिभेला हुळहूळ.. कळ गं.. चिंच आंबट-गोड गं.. भली-बुरी चव गं.. चिंच आंबट-गोड.. चवीला गं.. चिंचेचा आकडा.. वाकडा गं.. पेरा-पेरात गाठी.. बाटी गं.. चिंचजशी आंबट-गोड नाती गं.. ===================== स्वाती फडणीस............. ०५-०८-२००८

नेहमीच ... तुझ्यामुळे

लेखक बेसनलाडू यांनी सोमवार, 04/08/2008 या दिवशी प्रकाशित केले.
तिन्ही त्रिकाळ संध्याकाळ नेहमीच ... तुझ्यामुळे मेंदूतले घोळ पांजरपोळ नेहमीच ... तुझ्यामुळे ओठांत धूर डोळ्यांत पूर नेहमीच ... तुझ्यामुळे ओले घसे (होते हसे!) नेहमीच ... तुझ्यामुळे शब्दांचा जाच शब्दांना जाच नेहमीच ... तुझ्यामुळे ओळींना धार ओळींचे वार नेहमीच ... तुझ्यामुळे जगायचा वीट जगतोय धीट नेहमीच ... तुझ्यामुळे मरणाशी भेट कविताच थेट नेहमीच ... तुझ्यामुळे

(नूर)

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 04/08/2008 या दिवशी प्रकाशित केले.
कुमार जावडेकरांची 'नूर' गजल पाहून कोणे एके काळी आमचा बदललेला 'नूर' पुन्हा एकदा आमच्या आठवणीत आला! दारावरुन गेली, पाहून हूर आलो आता इथेच होती, शोधीत दूर आलो! जाऊन बारमध्ये ना घेतली कशी मी (पाहून तेथला मी आनंद-पूर आलो) ही फौज बेवड्यांची, पाहू कशास आता भेटीस 'पेजथ्रीं'च्या येथे चतूर आलो... 'तो भाग' शेकला पण ना बोललो कुणाला घालून शेपटी मी काढून धूर आलो थोडाच वेळ होतो, मी थांबलो तिथे, पण- भलताच मैफिलीचा पाहून 'नूर' आलो चतुरंग

खरचं तु हवी होतीस ..

लेखक पंचम यांनी रविवार, 03/08/2008 या दिवशी प्रकाशित केले.
खरचं तु हवी होतीस ..
वाळुतल्या त्या शिंपल्यांना नवे साज देण्या तु हवी होतीस .. वाळुतल्या पावलांना घुंगरांचा आवाज देण्या तु हवी होतीस .. किती लाटा किना-यांवरुन, परत फिरुन उदास गेल्या.... त्या लाटांना पावलाचा, स्पर्श देण्या तु हवी होतीस .. प्रकाशाने आस सोडली, तु परत येण्याची, अंधारल्या त्या किना-याला कवडसा देण्या तु हवी होतीस .. विखुरलेले शब्द सारे, त्यांना पाश देण्या तु हवी होतीस .. अर्थ हरविलेल्या शब्दांचे काही आभास देण्या तु
Taxonomy upgrade extras

(बेचैन)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 30/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
अनिरुद्ध अभ्यंकरांची सुंदर गजल'चैन' आम्हाला चांगलीच हलवून गेली आणि आम्ही बेचैन झालो!;) गजल वाचुन हालतो 'वरचाच मजला' काय मी आता करु?