तुला खात्री आहे?
लेखनविषय:
भोवती बघ..
थोडं तु खाली बघ
इथे दिसणारे चेहरे बघ...
तुला खात्री आहे?तुला इथेच पोचायचं होतं?
हे तुझ्या भोवतीचे मित्र...
पण हे आहेत का "खरे" मित्र?
ते करतील का तुझ्यावर माझ्याइतकं प्रेम?
तुला खात्री आहे? तुला इथेच पोचायचं होतं?
तु "हे" आयुष्य जगायच्या इतक्या घाईत आहेस
त्यासाठी इतक्या वेदना दिल्यास.. दुखावलं आहेस
भोवती बघ.. अगदी नीट बघ
फक्त दोघे..तु आणि मी
तुला खात्री आहे? तुला इथेच पोचायचं होतं?
माझ्या अश्रुंमुळे मन वळवू नकोस, मी रडत नाहि...
हे अश्रु हल्ली माझा भाग झाल्यासारखे वाटतात
भोवती बघ.. अगदी नीट बघ
सगळ्या भोवतालच्या सवयीच्या लोकांना बघ
तुला खात्री आहे? तुला इथेच पोचायचं होतं?
हे एका इंग्रजी गाण्याचं शब्दशः भाषातंर आहे. (होय इथे हे स्वैर / मुक्तछंदात वाटणारी कविता असली तरी गाणंच आहे ;) )
बघा ओळखता येतंय का? मुळ गाणं फार प्रसिद्ध आहे की नाहि कल्पना नाहि पण मला खूप आवडतं. भाषांतर करताना गाण्याच्या आशयाचा दर्जा घसरला आहे याची पुरेपुर जाणीव आहे. पण एक शब्दशः भाषांतर करायचा प्रयत्न करायचं फार दिवस मनात होतं म्हणून हे!
उत्तर व्यनीतून कळवा... पुढच्या शनिवारी इथे उत्तर देईनच
वाचने
2641
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
व्वा!
In reply to व्वा! by पिवळा डांबिस
असेच..
In reply to असेच.. by स्वाती दिनेश
असेच म्हणतो !!!
सुंदर
आशय सुंदर आहे..
मुळ गाणं: