टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
चैन
शब्द हल्ली सारखे छळतात मजला
आणि ओळी चार मग सुचतात मजला
बोलली नाहीस तू काही तरीपण
अर्थ नजरेचे तुझ्या कळतात मजला
चांदण्यांना रोजची का रात्रपाळी?
प्रश्न हे आता असे पडतात मजला
कायदे काही शहाण्यांचे असू द्या
फायदे वेडात हे दिसतात मजला
मी भरवसा माणसांचा काय द्यावा?
सावल्याही जर अशा गिळतात मजला
देवळांची सर्व ह्या झाली दुकाने
भावभक्ती रोज ते विकतात मजला
एकदा घेईन म्हटले मी भरारी
पिंजरे छद्मीपणे हसतात मजला
चैन रडण्याची मला करता न आली
एवढी कोठे सुखे मिळतात मजला
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती

सुंदर जमली आहे!
काय छान रचना आहे, व्वा!
...एकदा घेईन म्हटले मी भरारी
पिंजरे छद्मीपणे हसतात मजला......
'छद्मीपणे'' शब्द काय चपखल बसलाय !
व्वा
'ती' निवृत्ती सार्थकी लागतेय म्हणायचे. सुरेख रचना. कोणत्याही द्विपदीचा वेगळा उल्लेख नकोच. पण -
एवढी कोठे सुखे मिळतात मजला
ही खास. रडणे आणि सुखे... दाद देतो.
माणसांचा भरवसा आणि सावल्या हेही खूप भावले.
वा!
>>चैन रडण्याची मला करता न आली
एवढी कोठे सुखे मिळतात मजला
सुंदर..
वा!
चैन रडण्याची मला करता न आली
एवढी कोठे सुखे मिळतात मजला
फार छान !
स्वाती
सुंदर !!!
मी भरवसा माणसांचा काय द्यावा?
सावल्याही जर अशा गिळतात मजला
देवळांची सर्व ह्या झाली दुकाने
भावभक्ती रोज ते विकतात मजला
एकदा घेईन म्हटले मी भरारी
पिंजरे छद्मीपणे हसतात मजला
चैन रडण्याची मला करता न आली
एवढी कोठे सुखे मिळतात मजला
माणसांवरील विश्वास हरवल्याची जाणीव सावल्यातून व्यक्त होतांना सावल्याही तशाच, सोपी झालेली देवभक्ती ( देव काही बाजारचा भाजीपाला नाही रे ची आठवण झाली. ) , आणि सुखाचे ठिकाण शोधता आलीच नाही ,असा वेगवेगळा आशय व्यक्त करणारी रचना आवडली !!!
फारच छान
फारच छान आहे कविता भयंकरराव!!!! अश्याच कविता लिहित जा. आमच्या मनापासून शुभेच्छा !!!!
पारिजातकाच आयुष्य लाभल तरी चालेल पण लयलूट करायची ती सुगंधाचीच !!!
भयंकरराव ??
का हो पारिजातक राव का आमच्या अभ्यंकररावांना भयंकरराव म्हणताय ?
अनिरुद्धा...
फारच सुंदर रचना...
चैन रडण्याची मला करता न आली
एवढी कोठे सुखे मिळतात मजला
या ओळी तर अप्रतिम...
'ती' निवृत्ती सार्थकी लागतेय म्हणायचे.
अगदी बरोबर
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
सर्वच कविता आवडली.
सुंदर काव्य रचना.

अप्रतिम...
देवळांची सर्व ह्या झाली दुकाने
भावभक्ती रोज ते विकतात मजला
हे खासच...
आवांतर : निलकांता, सुरेश भट . इन सारखे आता अनिरूद्ध अभ्यंकर .इन सुरू करण्याचे मनावर घे बाबा.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
+१
अनिरुद्ध ,
उत्तम , सुरेख रचना. आणि मार्मिक, भावसंपृक्त आशय. एकेक द्विपदी आस्वाद घेण्यासारखी.
तुमच्या काव्याच्या झाडाचा बहर असाच बारोमास टिकू दे.
अनिरुद्धा,
शब्दांचं तुला छळणं सार्थकी लागतंय रे बाबा! एकाहून एक सुरेख गजल देणारी तुझी प्रतिभा आता मुक्त संचार करते आहे.
अतिशय गोटीबंद रचना! फारच आवडली.
चतुरंग
सुंदर
गझल...
कायदे काही शहाण्यांचे असू द्या
फायदे वेडात हे दिसतात मजला
मी भरवसा माणसांचा काय द्यावा?
सावल्याही जर अशा गिळतात मजला .....खुप छान
फार आवडली
(निवृत्ती सार्थकी लागली.)
सर्वच अशआर अर्थगर्भ जमले आहेत.
हेच म्हणतो !
जियो अभ्यंकर शेठ !
- सर्किट
सहमत आहे
खणखणीत गझल. सगळेच शेर मस्त,गोळीबंद जमलेत.
(आनंदित)बेसनलाडू
सुरेख!
सुरेख!
+१
गजल आवडली
सुंदर...
अनिरुद्धा, सुंदर गझल रे!
छद्मीपणे
>>एकदा घेईन म्हटले मी भरारी
>>पिंजरे छद्मीपणे हसतात मजला
हे कडवे खुप खुप आवडले
सुरेख! अप्र
सुरेख!
अप्रतिम...
सुंदर कविता. सुदृढ रचना.
सुंदर कविता. सुदृढ रचना.
अप्रतिम
कविता खूप आवडली.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
बोलली
बोलली नाहीस तू काही तरीपण
अर्थ नजरेचे तुझ्या कळतात मजला
क्या बात है..
देवळांची सर्व ह्या झाली दुकाने
भावभक्ती रोज ते विकतात मजला
फारच सुंदर !!!!!
मदनबाण.....
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
धन्यवाद!
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी)अनिरुद्ध अभ्यंकर
छान
भावभक्ती रोज ते विकतात मजला
एकदा घेईन म्हटले मी भरारी
पिंजरे छद्मीपणे हसतात मजला
सुंदर!
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
मस्त!
उत्तम गझल!