Skip to main content

चालू घडामोडी : डिसेंबर २०१९

लेखक धर्मराजमुटके यांनी रविवार, 01/12/2019 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिसळपावकर, मागील महिन्यात चालू घडामोडी हा धागा काढला नाही. राज्याच्या सत्ताकारणात इतक्या घडामोडी घडल्या आणी त्यावर मिसळपाव वरच इतके धागे निघाले की चालू घडामोडीमधे त्याची दखल घ्यावीशी वाटली नाही. सर्वप्रथम राज्याचे नवीन मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देऊया. सध्याच्या वातावरणात सरकार चालवण्यासाठी त्यांना शुभेच्छांची खुप गरज आहे असे वाटते. बर्‍याच लोकांना वाटते कि हे सरकार लवकर कोसळेल मात्र मला असे वाटते की हे सरकार कमीतकमी ४ आणि जास्तीत जास्त ५ वर्षे पुर्ण करु शकेल. शिवसेनेने मागील सत्तेत असताना ५ वर्ष भांडणे केली मात्र ते तरीही दुय्यम दर्जाच्या सत्तेला चिकटून राहिले.

चाळ तशीच आहे.

लेखक आदिजोशी यांनी शुक्रवार, 29/11/2019 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
चाळ तशीच आहे. आमच्या लहानपणापासून ते आत्तापर्यंत चाळ तशीच आहे. जुनीच. तिथे तरूणपणी रहायला येऊन वयोवॄद्ध झालेल्या अनेकांनाही चाळ अशीच आठवते. तुकतुकीत, तरणीताठी दिसणारी चाळ कुणीच बघितली नाही. कधी तरी ती तशी असेलही नक्कीच. १०० वर्ष सहज होऊन गेली चाळीला. कदचित १५० ही झाली असतील. आता त्या वयाचं चाळीशिवाय चाळीत कुणीच नसल्याने नक्की सांगता येत नाही. कधी कधी रंगरंगोटी केली जाते. पण ती म्हातारपणी कलप लावल्यासारखी वाटते. वय लपत नाही. पण चाळ तशीच आहे. पायर्‍या तेव्हाही वाजायच्या, आत्ताही वाजतात. दिवे त्यांच्या मूडनुसार दिवस-रात्र न बघता हवं तेव्हाच पेटतात. चाळीतले ते बोळ आणि जिनेही तसेच आहेत.

स्फुट : अनुभव

लेखक राघव यांनी शुक्रवार, 29/11/2019 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
बऱ्याच दिवसांपासून एखादे (कामाव्यतिरिक्त अवांतर असे) पुस्तक वाचायचे म्हणून ठरवत होतो. काल रात्री मोठ्या उत्साहाने (होय, ही एक अगदी खास सांगण्यासारखी गोष्ट आहे!) एक पुस्तक वाचायला बसलो. जेमतेम ५-६ पानं झाली असतील वाचून तर बाहेर आकाशातली वीज कडाडली अन् घरच्या वीजेने घाबरून अंधारात दडी मारली!! असला वैताग आला म्हणता की ज्याचं नाव ते! जातोय कुठे, बसलो अंधारात!! हे नेहमी (माझ्यासोबत!!) असेच का होते म्हणून जरा "स्वतःला सहानुभुती" देण्यापासून ते "माणसाला अंधारातही दिसले असते तर काय बहार झाली असती!" इथपर्यंत बरेच विचार मनात एकदम "फास्ट ट्रॅक"ने येऊन गेले.

सुखवार्ता

लेखक vcdatrange यांनी शुक्रवार, 22/11/2019 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
समाजात अनेक जण विविध क्षेत्रांत पारंगत असतात. काहीजण तर त्या कामातून कुठलाही आर्थिक वा अन्य लाभ मिळत नसतानाही ते मन लावून करीत असतात. अशा कार्याला कुणी समाजसेवा म्हणेल तर कुणी 'लष्कराच्या भाकऱ्या' म्हणेल. अश्याच काही हटके व्यक्तीमत्वांची दखल घेवून, या सुखवार्ता शेअर कराव्या असं ठरवलंय १. मिलिंद पगारे ---- नाशकातले मिलिंदकाका पगारे बहुराष्ट्रीय कंपनीतुन केमिकल इंजिनिअर पदाहुन रिटायर झाल्यावर केवळ हौशेपोटी प्लास्टिक प्रदुषणावर जनजागृती करतायेत.

दिलीप चित्रे व जॅकलिन - अधोविश्वातली {Underworld}एक प्रेमकथा

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 22/11/2019 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
दिलीप चित्रे व जॅकलिन - अधोविश्वातली {Underworld}एक प्रेमकथा ------------------------------------------- १}जान्हवी चा मृत्यू व हुस्न्या खाटीक * दिलीप चित्रे बार मध्ये बसला होता समोर हुसेन खाटीक त्याचा जुना शाळेतला मित्र होता शून्यात बघत दिलीप ने अर्धा चिकन टिक्का चा पीस उचलला व बिअर चा घोट घेत तोंडात टाकला भाय कितना दिन मातंग मनायेगा तू ? जान्हवी भाभी थोडी ना वापस आने वाली है ?

एक घटना

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 19/11/2019 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
एक घटना ................. दुपारची वेळ होती -मी पेपर वाचत होतो ते व्हढ्यात तिने माझी खोडी काढली एका सेन्सेटिव्ह विषया वर माझी खिल्ली उडवली मला संताप आला मी तिचा प्रिय फ्लॉवर पॉट जमिनीवर आपटत फोडून टाकाला माझ्या अनपेक्षित कृतीने ती चक्रावली व तरातरा आली अन माझ्या पाठीत चार पाच गुद्दे घातले मी काही बोललो नाही बराच वेळ आम्ही आतून धुमसत होतो मग मी शांत झालो व चपला घालून बाहेर पडलो कुठे निघालास ?? गप्प बस तुला काय करायचा ??? खर तर मला खूप वाईट वाटत होते खूप खुश असायची ती तो फ्लॉवर पॉट तिचा जीव कि प्राण होता ती त्या मध्ये आकर्षक फुले भरत असे असे करताना ती त्यात रंगून जात असे मी दुकानात आलो तसाच एक फ

दोघे जुळे भाऊ

लेखक mrcoolguynice यांनी मंगळवार, 05/11/2019 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
आटपाट नगर होतं. तिथं दोघे जुळे भाऊ, आपआपल्या बायकापोरांसोबत नांदत होते. म्हाताऱ्या बापाच्या निधनानंतर, वडिलोपार्जित संपत्तीचे समसमान वाटप होईल, असे ठरलं होतं. म्हाताऱ्याची एक दुध देणारी गाय, एवढीच काय ती तुटपुंजी संपत्ती होती. एक गाय दोघांत कशी वाटावी ?

मला भेटलेले रुग्ण - २०

लेखक डॉ श्रीहास यांनी शुक्रवार, 01/11/2019 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळीच पहीला फोन आला तो मोठ्या भावाचा , नुकताच श्रीलंका दौरा आटोपून आला होता आणि घरी परत आल्यावर कळलं की गेल्या चार दिवसांपासून कामानीमित्त ज्या व्यक्तीच्या संपर्कात होता त्याला टिबी झाल्याचं कळलं होतं !! हा मुळापासून हादरला होता .... मी सगळं ऐकून घेतलं आणि समजावलं की टिबी होण्याची शक्यता जरी असली तरी टिबी होईलच असं नाही ... कारण तुझी प्रतिकारशक्ती पुरेशी आहे जेणेकरून काळजीचं कारण नाही !! तरीसुद्धा पुढले काही महीने चांगला प्रथिनेयुक्त आहार व पुरेशी झोप एवढंच सांभाळलं तरी झालं ....

समस्त लोकप्रतिनिधींनो

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी शुक्रवार, 01/11/2019 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
समस्त लोकप्रतिनिधींनो, सत्ताधार्‍यांनो आणि विरोधकांनो... पांढरी दाढीवाल्यांनो आणि काळी मिशीवाल्यांनो चंदन टिळावाल्यांनो आणि काजळ सूरमावाल्यांनो.... जाणत्या राजांनो आणि प्रधान सेवकांनो तुमच्या संधीसाधूपणाची, हीन विचारांची आणि बेशरमपणाची आता आम्हाला किळस यायला लागली आहे | 'आमचं असंच ठरलं होतं' वाल्यांनो आणि 'असं काहीच ठरलं नव्हतं' वाल्यांनो 'लोकशाहीला कटिबद्द आहोत' वाल्यांनो आणि 'जातीयवादाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काहीही करायला तयार' असणार्‍यांनो तुमचा निर्लज्ज दांभिकपणा आमच्या लक्षात येत नाही असं वाटतंय तुम्हाला??? फेटावाल्यांनो आणि गोल टोपी वाल्यांनो.....

हस्तर एक्झीट पोल.

लेखक हस्तर यांनी बुधवार, 23/10/2019 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
मतदान तसे खुपच कमी झाले माझ्या मते काँग्रेस राष्ट्रवादी वाले लोक फिरकले नाहीत आणि पाऊस बाकी शुद्ध लेखनावरून ट्रॉल करणे वगैरे सोपे असते ,आज बघू किती मिपाकर ह्या धाग्यवर आपला अंदाज व्यक्त करतात माझे मत शिवसेना ५० वर किंचित भाजप स्पष्ट बहुमत राष्ट्रवादी काँग्रेस १० १२ वंचित नाही जर असाच निकाल लागला तर कारण मीमांसा पण सांगेन