मास्तरांची जिरवली!
मी सातवीत होतो. माझं हायस्कूल तालुक्यातील उत्तम नावाजलेले होते. अतिशय शिस्तप्रिय आणि मुलांच्या प्रगतीसाठी झटणारे प्राचार्य आम्हाला लाभले होते. सहकार सम्राट, साखर सम्राटाची संस्था असली तरी भ्रष्टाचार, पैसे घेऊन शिक्षकांच्या नेमणुका करणं वगैरे गोष्टी तेव्हा अजिबात नव्हत्या. केवळ गुणवत्ता हाच निकष होता. प्राचार्यांच्या कावळ्याच्या नजरेतून एकही चूकीची गोष्ट सुटत नव्हती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून सर्व शिक्षक वर्ग तळमळीने काम करत होते.
अशातच एक नवीन शिक्षक आम्हाला चित्रकलेला आले. त्यांचं नाव भैलुमे असे होते. ठेंगणी मुर्ती. आडवं पसरलेलं शरीर.
मिसळपाव