Skip to main content

एक तरी खड्डा अनुभवावा...।

लेखक मायमराठी यांनी सोमवार, 09/09/2019 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
'एक तरी खड्डा अनुभवावा' वास्तविक हे शीर्षक उगाचच मिरवतंय. ह्याच धर्तीवर १६८ कोटी चकचकीत शीर्षके हात जोडून समोर उभी आहेत. त्या प्रत्येकाने आपला काळजाचा ठाव घ्यावा इतपत तपश्चर्या केलेली आहे. २ अकतुबरला गांधीजींच्या छायाचित्राला मनोमन नमन करत असताना एक प्रश्न पडतो की ते नक्की ' खेड्याकडे चला' असे म्हणाले का ' खड्ड्यांकडे चला' असे म्हणाले. सर्व विश्वात बापूंची वचनं वाचली / अवलंबली जातात, तर आपण कसे मागे असणार? आपल्या सभोवताली अशी एकही भिंत नाही, जिच्यावर बापू नाहीत आणि जिच्या साक्षीने 'प्रामाणिक' व ' सत्य ' व्यवहार होत नाहीत.

बिगरी ते डिगरी‘...

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 07/09/2019 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
तर, आपल्या बोटाला धरून बिगरीपासून डिगरीपर्यंतचा प्रवास घडवून आणणाऱ्या गुरुजनांच्या अनेक आठवणी काल मनात अचानक, आणि नकळतही, उचंबळून आल्या. अशा आठवणींना वयाचा क्रम नसतो.

नाचणाऱ्या गाणाऱ्यांचा देश

लेखक सर टोबी यांनी शनिवार, 07/09/2019 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
एक समाज म्हणून आपण बरीच प्रगती केली आहे. मुलांवर संस्कार करताना छडी लगे छमछम असा सब घोडे बारटक्के पासून सुरु झालेला प्रवास आता मुलांचा कल बघून ऐच्छिक विषय शिकविण्यापर्यंत येऊन ठेपला आहे. आता मुलांना 'मोठेपणी कोण होणार' हा प्रश्न विचारणे शिष्टसंम्मत राहिलेला नाही. मुलांना पॉकेटमनी देणे थोडेफार सर्वमान्य झाले असावे. 'आम्ही म्युनिसिपालिटीच्या दिव्याखाली अभ्यास केला, जुनी पुस्तकं वापरली, सायकलवर शाळा कॉलेजचे शिक्षण घेतले' असे सुनावणे बंद झाले असावे.

मला भेटलेले रुग्ण - १९

लेखक डॉ श्रीहास यांनी शुक्रवार, 06/09/2019 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
‘डॉक्टर कभी भी कुछ लगे तो याद किजीये ‘ असं म्हणत पेशंटच्या बापानी हात जोडून नमस्कार केला ..... ६ महीन्यांपुर्वी टिबीचं निदान झालं आणि सेकंड ओपिनीयनसाठी माझ्याकडे आले होते.... मग औषधं लिहीणं, टिबीची माहिती देणं आणि आहारासंबंधी बोलून झाल्यावर धीर देणं हा माझा नियमीत प्रोटोकाॅल ! प्रत्येक व्हिसीट वेळेवर किंवा वेळेआधीच आणि शेवटी पेशंट आजारातून बाहेर असा सगळा काळ गेला परंतू डोळ्यात अश्रु घेऊन धन्यवाद देतांना त्यांनी अदृश्य आर्शिवाद दिलेला मला दिसला .... मी असं काय जगावेगळं केलं की त्यांच्या डोळ्यात पाणी यावं ? मी ईतका महान आहे का ?

शं नो वरुण: । एक अनावृत्त पत्र

लेखक मायमराठी यांनी गुरुवार, 05/09/2019 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
शं नो वरुण: । प्रिय विश्वव्यापीजनमुदितेश्वरा, तुझ्या सुयोग्य असा मायना नाही शिकलो. उगाच औपचारिकता कशाला? जन्मापासून नातं आहे तुझ्याशी. आई सांगते की कंबरेएवढ्या पाण्यातून मामा डबा घेऊन यायचा तिला माझ्या वेळेला. फक्त मीच कशाला? या वसुंधरेवर कोणाच्या जन्माला तू साक्षी नव्हतास? पंचमहाभूतांच्या खेळांत भाग घ्यायला खूप आधीपासूनच तू भूत होऊन तयार होतास, तेव्हापासून आजतागायत तसाच आहेस. मी तेव्हा नव्हतो असं तुझ्या मनांत तरी कसं आलं? जेव्हा सगळी भूतं रचली जात होती तेच तर आमच्या सर्वांचे बेगडी जन्माचे क्षण.

दोन आण्याची ( पैशाची ) गोष्ट

लेखक तमराज किल्विष यांनी गुरुवार, 05/09/2019 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या लहानपणी ही गोष्ट माझा आजा मला रोजच सांगायचा. बाबा म्हणजे माझा आजा विड्या वळायचं काम करायचा. बाबा विड्या वळत असायचा, अन् कोठूनही माझी स्वारी आली की लगेच " बाबा गोष्ट सांग" ऑर्डर सुटायची. बाबा म्हणायचा. " थांब, सांगतो." मी " नाही, आता लगेच सांग". मग बाबाची गोष्ट सुरू व्हायची. एक होती म्हातारी. ती चालली कुपाटी कुपाटीना. तिला सापडले दोन पैसे. दोन पैशाचं तिनं दूध आणलं. ते ठेवलं तापायला. ते गेलं उतू. म्हातारी गेली उतरायला. हाताला आले तीन फोड. फोड फुटले. एकात निघली सकू. एकात निघली बकू. एकात निघला डिंगऱ्या. सकू पाणी आनती का? मी नाही आनीत जा. बकू पाणी आनते का? मी नाही आनीत जा.

प्रस्थापितांचे सामाजिक भान: भाग ३

लेखक सर टोबी यांनी बुधवार, 04/09/2019 17:19 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दोन भागात आपण पहिले तर असे दिसते कि प्रस्थापित त्यांच्या क्षमतेनुसार जितके समाजासाठी उपयोगी पडायला हवे तितके ते पडत नाहीत. असे खरंतर इतरत्रही म्हणजे इतर देशांमध्येही होत असते. समाजकारण काही प्रत्येक जण करीत नाही आणि त्याची गरजही असतेच असे नाही. भारतात मात्र आपले आयुष्य इतके सत्ताकेंद्रांमुळे प्रभावित असते कि प्रस्थापितांनी जमेल तेव्हडी मदत (जातपात, पूर्वग्रह, राजकीय मतं यापलीकडे जाणारी) करणे आवश्यक असते. दुर्दैवाने असे होताना दिसत नाही. या उलट प्रस्थापित त्यांच्या क्षमतेनुसार सामाजिक दुही, निसर्ग ओरबाडणे या आणि अशा इतर गोष्टींमध्ये मश्गुल असतो.

दर्शनमात्रे मनकामना पूर्ती

लेखक nishapari यांनी मंगळवार, 03/09/2019 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
गणपती आलेले आहेत , घरोघरी आरत्या ऐकू येत आहेत ... वेळेनुसार देवांकडे काही मागणी करणे हा आस्तिकांचा स्वभाव आहे , काही गोष्टी मिळतात , काही नाही ... त्यात देवाचा किती सहभाग असतो हे तोच जाणे .... पण एकूणच देवाकडे विशेषतः घरी आणलेल्या गणपती कडे एखादी गोष्ट मनापासून मागावी आणि ती मिळू नये असं झाल्यावर देवाकडे काही मागण्यावरून लोकांचं मन उडतं असं होतं का ? आरत्या किती लोक शब्दांकडे लक्ष देऊन म्हणतात , त्यावर विचार करतात माहीत नाही त्यामुळे दर्शनमात्रे मनकामना पूर्ती ह्याचा विचार नसेलही केला कुणी .....

आर्टिकल 15

लेखक nishapari यांनी सोमवार, 02/09/2019 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
आर्टिकल 15 चा प्लॉट 2014 साली उत्तरप्रदेशातल्या एका गावात झालेल्या तीन मुलींच्या गॅंग रेपवर आधारित आहे. डेली लेबरवर काम करणाऱ्या तीन 15 वर्षांच्या मुली मालकाकडे तीन रुपये वाढवून मागतात आणि त्याने नकार दिल्यावरही अडून बसतात. गँगरेप करून ´त्यांच्या´ समाजाला धडा मिळावा म्हणून त्या मुलींपैकी दोन मुलींचा बलात्कार करून त्यांना जीवे मारून झाडाला लटकावलं जातं , तिसरी निसटण्यात यशस्वी होते . केस बंद करण्यासाठी त्या मुलींच्या वडिलांनाच त्यात गोवण्याचा प्रयत्न सुरू असतो .

मनिषा (भाग ३)

लेखक तमराज किल्विष यांनी सोमवार, 02/09/2019 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
मनिषा आता तिकडे सासरी नांदत होती. इकडे माझ्यावर एक संकट कोसळलं. मी कामानिमित्त बाहेरगावी गेलो होतो आणि माझ्या बायकोने माझी पुस्तकं, व इतर गोष्टी ठेवलेलं कपाट उघडून पाहिले. त्यात मनिषाने लिहिलेले पत्रं तिला सापडली. तिने ती वाचली. मी घरी आलो तर माझी बायको एक शब्दही बोलेना. रुसून बसली. समजूत काढायला गेलो तर तीने "आधी ती पत्रं जाळून टाका. मला तुम्ही फसवलं आहे, लग्नाआधी प्रेमप्रकरण करायची लाज वाटली नाही का, तुम्ही मला व तिलासुध्दा फसवलं आहे." असं बोलून भांडायला लागली. "अजून पत्रं जपून ठेवलीय म्हणजे तीच तुमच्या मनात आहे" असं म्हणून ती तुटक वागायला लागली. तिच्या माहेरी सुध्दा तिनं सांगितलं.