Skip to main content

प्रकटन

वो शाम...

लेखक प्राची अश्विनी यांनी सोमवार, 02/03/2020 या दिवशी प्रकाशित केले.
1 तू म्हणालास, खुर्चीपेक्षा खालीच बसू आरामात.. मी आपली बसले, तुझ्याशी काटकोन करून कोप-यात! पण तो काटकोन सांभाळताना मन कित्ती आवरावं लागलं माहितीय तुला?? आणि म्हणे "आरामात बसू"! 2 पाणीचं होतं की अजून काही?

शुभ सकाळ!

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 01/03/2020 या दिवशी प्रकाशित केले.
एक सुंदर सकाळ पुन्हा उगवल्याच्या आनंदाने असंख्य पक्ष्यांचा मंजुळ प्रभातराग वातावरणाला संगीतसाज चढवतो आहे. निरभ्र, निळ्याशार आभाळाच्या क्षितिजाशेजारच्या टोकावर धुक्याच्या पांढुरक्या रेघेने सीमारेख आखली आहे. पूर्वेकडचं तांबुडकं हळुहळू रुपेरी झाक घेऊ लागलंय, आणि डोंगरांच्या निळ्या रांगा आपल्या मूळ रंगानिशी जाग्या होऊ लागल्या आहेत... ही वेळ मोठी वेगळीच असते. खरं तर ही जीवनासाठी घेऊन येणारा नवा दिवस साजरा करण्याची वेळ! पण त्या साजरेपणासाठी वेळ काढण्याएवढा निवांतपणा सगळ्यांकडे नसतो.

कृतघ्न -2

लेखक बाप्पू यांनी शुक्रवार, 28/02/2020 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला भाग - https://www.misalpav.com/node/46154 आता पुढे. - रामदास ने मागे वळून पहिले. साडेपाच फूट उंच, अंगात खाकी वर्दी, खांद्यावर 2 स्टार आणि शिट्टी, हातात एक फाईल घेऊन कोणातरी अधिकारी उभा होता. प्रत्येक खाकी वर्दीतला माणूस म्हणजे पोलीसच अशी त्याची समजूत होती. घाबरलेल्या नजरेने त्याने त्याच्या हाकेला ओ दिली. जनाबाई आणि दोन्ही पोरे देखील घाबरली. एकतर दोन तीन दिवस सर्वजण अर्धपोटी, खिशात पुरेसे पैसे नाहीत आणि आता हे पोलिसांचे लफडे मागे लागले म्हणून त्याला घाम फुटला.

मतदार हुशार झालेत का ?

लेखक विवेक9420 यांनी शुक्रवार, 28/02/2020 या दिवशी प्रकाशित केले.
मतदार हुशार झालेत ? दिल्ली मध्ये नुकत्याच झालेले राज्याचे ईलेक्शन व त्यानंतर आलेले निकाल पाहता आम आदमी पार्टी ने दणदणीत विजय मिळवला व तोही स्वबळावर. आप पक्षाने हा मिळवलेला विजय नक्कीच कौतुकास्पद आहे. असो, पन काही जन मात्र ह्या निकालाचे वृत्त करताना जणु हा निकाल आता भाजप संपवत आहे किंवा भाजप साठी फार मोठी धोक्याची घंटा आहे असा काही बोलत आहेत किंवा बोवत होते . आता असे वृत्तकथन करणारे लोकांवर हसावे कि त्यांचा बुद्धी वर किव करावी हा मोठा प्रश्न आहे. कारण वृत्त कथन करणारेंना मतदार किती कळाला? ह्याचे फार मोठे रहस्य आहे.

मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा

लेखक महासंग्राम यांनी गुरुवार, 27/02/2020 या दिवशी प्रकाशित केले.
तारांमध्ये बारा राशी सप्तवारामध्ये रविससी यादिमिचेआं भासांमध्ये.. मराठिया.. मिसळपाव परिवारातल्या समस्त मराठी जनांना मराठी राजभाषा दिनाच्या मऱ्हाटमोळ्या शुभेच्छा ! मराठी बोलूया, मराठी जपूया, मराठी वाढवूया ! हे आपलं मिसळपावडॉटकॉम चं ट्विटर खातं ज्यांना शक्य असेल त्यांनी लाईक आणि रिट्विट करा. आणि #मिसळपावडॉटकॉम हा हॅशटॅग वापरायला विसरू नका.

सरकारी कार्यसंस्कृती!

लेखक दिनेश५७ यांनी शुक्रवार, 21/02/2020 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रातील एक तडफदार आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कार्यालयीन शिस्तीच्या कठोर कथांचे शूटिंग सध्या वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवरूनही भरपूर प्रसारित होत आहे हे पाहून गंमत वाटते. मुंढे यांच्या कार्यशैलीमुळे आता वाहिन्यांना आपला एक कॅमेरामन आणि एक रिपोर्टर ‘मुंढे बीट’वर पर्मनंटली असाईन करावा लागणार आणि नागपूर महापालिकेत स्टुडिओ उभारावे लागणार असे दिसत आहे. परवा शिवजयंतीदिनी मुंढे यांनी कार्यालयीन कर्मचाऱ्यांना समजावून सांगितलेले कार्यसंस्कृतीविषयक भाषण अनेक वाहिन्यांनी लाईव्ह दाखविले. ते चांगले होते, पण एक मुद्दा मागे राहातो. कार्यालयीन कामकाजाच्या कोणत्याही भागाचे रेकाॅर्डिंग, शूटिंग वा प

किल्ले आणि त्यांचा इतिहास

लेखक युरेका यांनी गुरुवार, 20/02/2020 या दिवशी प्रकाशित केले.
https://chat.whatsapp.com/FLZ3AwHYIdRIdqsp9M4bsv किल्ले आणि त्यांचा इतिहास हरवून जा भारतातील गड किल्ल्यांच्या इतिहासात, जाणून घेऊया पूर्वजांच्या पराक्रमाचा इतिहास तोही निष्णात मंडळींकडून लवकर जॉईन व्हा व्हाट्सअप्प ग्रुपमध्ये ! ज्यात मिळेल ,इतिहासात डोकावण्याची सुवर्णसंधी तेही इतिहासप्रेमी मंडळींसोबत !!!

प्रेम दिवस

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 14/02/2020 या दिवशी प्रकाशित केले.
उधळून दे तुफान सारं काळजामध्ये साचलेलं. ओठात त्याची गीते,देहात मदन वारे तोड बंधने सारी, चुकव सारे पहारे व्यक्त होऊ देत सारे मनात साचलेले टाक उधळून सारे त्याच्यावर त्याच्या साठी राखलेले उधळून दे तुफान सारं काळजामध्ये साचलेलं हो व्यक्त -आज प्रेम दिवस सर्व मित्र मैत्रिणी ना ह्याप्पी व्ह्यालेनटाइन

पाच दिवसांचा आठवडा!

लेखक दिनेश५७ यांनी गुरुवार, 13/02/2020 या दिवशी प्रकाशित केले.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आठवड्यातील पाच दिवस कामकाजाचे करण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयामुळे तमाम कर्मचारीवर्ग कमालीचा खुश झालाही असेल, पण सर्वसामान्य माणसावर मात्र धास्तावण्याचीच वेळ येणार आहे. सध्या दुसरा व चौथा शनिवार-रविवार पूर्ण सुट्टीचा असतो, त्यामुळे अन्य रविवार वगळता आठवड्यातील इतर दिवस पूर्ण कामकाजाचे असतात अशी जनतेची एक अंधश्रद्धा असल्याने कामकाजाच्या दिवशी सरकारी कार्यालयांत खेटे घालणाऱ्यांना सरकारी कामाच्या गतिमानतेची पूरण कल्पना अगोदरपासूनच आहे.

प्रतिमांचे शिकार

लेखक सर टोबी यांनी सोमवार, 10/02/2020 या दिवशी प्रकाशित केले.
आपण वेगवेगळ्या प्रतिमांचे नकळतपणे शिकार होत असतो. कुठले तरी ठिकाण, एखादा सिनेमा, एखादं हॉटेल खूप छान आहे अशी प्रसिध्धी असते. त्या ठिकाणी आपण जातो परंतु कित्येक वेळेला येणार अनुभव जे काही ग्रेट वगैरे ऐकलेले असते त्याच्या जवळपास तर सोडाच पण भिकार म्हणावा इतका वाईट असतो. आपण किती भिडस्त किंवा फटकळ आहोत त्यानुसार आपण जमेल तसा आपला अनुभव व्यक्त करतो. पण काही प्रतिमा तर त्याहून बळकट असतात. म्हणजे इतक्या कि जर आपल्याला सर्वमान्य अनुभव आला नाही तर आपल्यातच काही तरी उणीव आहे म्हणून आपण स्वतःला दोष देतो.