Skip to main content

प्रकटन

सुखवार्ता

लेखक vcdatrange यांनी शुक्रवार, 22/11/2019 या दिवशी प्रकाशित केले.
समाजात अनेक जण विविध क्षेत्रांत पारंगत असतात. काहीजण तर त्या कामातून कुठलाही आर्थिक वा अन्य लाभ मिळत नसतानाही ते मन लावून करीत असतात. अशा कार्याला कुणी समाजसेवा म्हणेल तर कुणी 'लष्कराच्या भाकऱ्या' म्हणेल. अश्याच काही हटके व्यक्तीमत्वांची दखल घेवून, या सुखवार्ता शेअर कराव्या असं ठरवलंय १. मिलिंद पगारे ---- नाशकातले मिलिंदकाका पगारे बहुराष्ट्रीय कंपनीतुन केमिकल इंजिनिअर पदाहुन रिटायर झाल्यावर केवळ हौशेपोटी प्लास्टिक प्रदुषणावर जनजागृती करतायेत.

दिलीप चित्रे व जॅकलिन - अधोविश्वातली {Underworld}एक प्रेमकथा

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 22/11/2019 या दिवशी प्रकाशित केले.
दिलीप चित्रे व जॅकलिन - अधोविश्वातली {Underworld}एक प्रेमकथा ------------------------------------------- १}जान्हवी चा मृत्यू व हुस्न्या खाटीक * दिलीप चित्रे बार मध्ये बसला होता समोर हुसेन खाटीक त्याचा जुना शाळेतला मित्र होता शून्यात बघत दिलीप ने अर्धा चिकन टिक्का चा पीस उचलला व बिअर चा घोट घेत तोंडात टाकला भाय कितना दिन मातंग मनायेगा तू ? जान्हवी भाभी थोडी ना वापस आने वाली है ?

एक घटना

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 19/11/2019 या दिवशी प्रकाशित केले.
एक घटना ................. दुपारची वेळ होती -मी पेपर वाचत होतो ते व्हढ्यात तिने माझी खोडी काढली एका सेन्सेटिव्ह विषया वर माझी खिल्ली उडवली मला संताप आला मी तिचा प्रिय फ्लॉवर पॉट जमिनीवर आपटत फोडून टाकाला माझ्या अनपेक्षित कृतीने ती चक्रावली व तरातरा आली अन माझ्या पाठीत चार पाच गुद्दे घातले मी काही बोललो नाही बराच वेळ आम्ही आतून धुमसत होतो मग मी शांत झालो व चपला घालून बाहेर पडलो कुठे निघालास ?? गप्प बस तुला काय करायचा ??? खर तर मला खूप वाईट वाटत होते खूप खुश असायची ती तो फ्लॉवर पॉट तिचा जीव कि प्राण होता ती त्या मध्ये आकर्षक फुले भरत असे असे करताना ती त्यात रंगून जात असे मी दुकानात आलो तसाच एक फ

मला भेटलेले रुग्ण - २०

लेखक डॉ श्रीहास यांनी शुक्रवार, 01/11/2019 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळीच पहीला फोन आला तो मोठ्या भावाचा , नुकताच श्रीलंका दौरा आटोपून आला होता आणि घरी परत आल्यावर कळलं की गेल्या चार दिवसांपासून कामानीमित्त ज्या व्यक्तीच्या संपर्कात होता त्याला टिबी झाल्याचं कळलं होतं !! हा मुळापासून हादरला होता .... मी सगळं ऐकून घेतलं आणि समजावलं की टिबी होण्याची शक्यता जरी असली तरी टिबी होईलच असं नाही ... कारण तुझी प्रतिकारशक्ती पुरेशी आहे जेणेकरून काळजीचं कारण नाही !! तरीसुद्धा पुढले काही महीने चांगला प्रथिनेयुक्त आहार व पुरेशी झोप एवढंच सांभाळलं तरी झालं ....

समस्त लोकप्रतिनिधींनो

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी शुक्रवार, 01/11/2019 या दिवशी प्रकाशित केले.
समस्त लोकप्रतिनिधींनो, सत्ताधार्‍यांनो आणि विरोधकांनो... पांढरी दाढीवाल्यांनो आणि काळी मिशीवाल्यांनो चंदन टिळावाल्यांनो आणि काजळ सूरमावाल्यांनो.... जाणत्या राजांनो आणि प्रधान सेवकांनो तुमच्या संधीसाधूपणाची, हीन विचारांची आणि बेशरमपणाची आता आम्हाला किळस यायला लागली आहे | 'आमचं असंच ठरलं होतं' वाल्यांनो आणि 'असं काहीच ठरलं नव्हतं' वाल्यांनो 'लोकशाहीला कटिबद्द आहोत' वाल्यांनो आणि 'जातीयवादाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काहीही करायला तयार' असणार्‍यांनो तुमचा निर्लज्ज दांभिकपणा आमच्या लक्षात येत नाही असं वाटतंय तुम्हाला??? फेटावाल्यांनो आणि गोल टोपी वाल्यांनो.....

हस्तर एक्झीट पोल.

लेखक हस्तर यांनी बुधवार, 23/10/2019 या दिवशी प्रकाशित केले.
मतदान तसे खुपच कमी झाले माझ्या मते काँग्रेस राष्ट्रवादी वाले लोक फिरकले नाहीत आणि पाऊस बाकी शुद्ध लेखनावरून ट्रॉल करणे वगैरे सोपे असते ,आज बघू किती मिपाकर ह्या धाग्यवर आपला अंदाज व्यक्त करतात माझे मत शिवसेना ५० वर किंचित भाजप स्पष्ट बहुमत राष्ट्रवादी काँग्रेस १० १२ वंचित नाही जर असाच निकाल लागला तर कारण मीमांसा पण सांगेन

गुण्या-गोविंदा

लेखक दिनेश५७ यांनी सोमवार, 14/10/2019 या दिवशी प्रकाशित केले.
दोन भाऊ होते. एक मोठा होता, आणि दुसरा धाकटा होता. कारण ते जुळे नव्हते. अगोदर जन्माला आलेला भाऊ सुरुवातीला काही दिवस मोठा भाऊ होता. नंतर धाकटा भाऊ म्हणाला, आता मी मोठा भाऊ! मोठा म्हणाला, ठीक आहे. मग या वेळी मी धाकटा!... अशा रीतीने दोघे भाऊ गुण्यागोविंदाने रहात होते. पुढे काही वर्षे गेली आणि पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून काहीतरी करावयास हवे असे दोघांनाही वाटू लागले. पण दोघेही स्वतंत्र विचाराचे आणि स्वाभिमानी बाण्याचे असल्याने, आपला निर्णय आपणच घ्यायचा हे दोघांनीही ठरविले होते.

नवता आणि परंपरा...

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 29/09/2019 या दिवशी प्रकाशित केले.
इंद्रधनूच्या जवळपास सगळ्या रंगांचा सुरेख संगम साधत रंगविलेला केशसंभार, आधुनिक वेषभूषातत्वानुसार अंगाचा आवश्यकतेपुरता भाग झाकला जाईल एवढाच वस्त्रसंभार, हातात इंपोर्टेड पर्स आणि पायात हायहिल सॅंडल अशा मादक वेषातली ती सुंदरी आपल्या गाडीतून उतरली आणि पन्नासेक पावलांवर असलेल्या ब्यूटी पार्लरच्या दिशेने चालू लागली. आसपासचा रस्ता, काही क्षण थबकला! तिकडे कुठेच लक्ष न देता ती रूपगर्विता आपल्याच तोऱ्यात मादक पदन्यास टाकत रस्ता कापत होती... ...अन् अचानक तिच्यासमोरून एक भेदरलेलं मांजर रस्ता आडवा कापून पलीकडच्या बांधाआड गायब झालं! क्षणात तिच्या चालीची लय थबकली. ती जागच्या जागी उभी राहिली.

या पसाऱ्याचं काय करावं?

लेखक राजे १०७ यांनी शुक्रवार, 27/09/2019 या दिवशी प्रकाशित केले.
मी एक खरेदी वेडा माणूस आहे. खरेदीची ओसीडी झाल्यासारखं नुसती खरेदी करत असतो. फ्लिपकार्ट, अॅमेझॉन सारख्या कंपन्या निघाल्या पासून लाखो रुपयांची खरेदी केली आहे. अगोदर मॉलमध्ये फेरफटका मारुन शेपाचशेची खरेदी दिवसाआड ठरलेली. दारात चार मोटार सायकली, एक कार उभ्या आहेत, तीन सायकली, वीस पंचवीस चपला बुटांचे जोड, चांगले असलेले पंखे, भांडीकुंडी, कुकर अडगळीत पडलेले आहेत. दोन ओव्हन नवेच्या नवे, गॅस शेगड्या, मिक्सर लॉफ्टवर जागा अडवून बसले आहेत. विजेऱ्या, घड्याळं, दोन-तीन इस्र्या, जूनं कपाट, हिटर, कुलपं, जूने सिआरटी मॉनीटर, टिव्ही, कॅमेरे आणि शेकडो पुस्तकं एकदम चांगल्या स्थितीत आहेत.

उंदरांची शर्यत -२

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 25/09/2019 या दिवशी प्रकाशित केले.
उंदरांची शर्यत (RAT RACE) -२ उंदरांची शर्यत -२ मी विक्रांत वर असताना (१९९०) माझा एक मित्र लेफ्टनंट कमांडर नरेश राणा (हा हॅरियर या लढाऊ विमानाचा वरिष्ठ वैमानिक आणि प्रशिक्षक होता.) याने मला एक प्रकाशचित्र दाखवले. त्यात एकाच फ्रेम मध्ये तीन विमाने होती. सर्वात पुढे मिराज २०००, मध्ये हॅरियर ( ज्यात हा स्वतः होता) आणि सर्वात शेवटी HPT ३२ हे पुढे पंखा असलेले (प्रोपेलर) विमान होते. हा फोटो पाहून मी त्याला आश्चर्याने विचारले कि हा फोटो कसा काढला ( तेंव्हा फोटोशॉप हा शब्द फारच क्वचित कुणी ऐकला असेल).