Skip to main content

मनिषा (भाग २)

लेखक तमराज किल्विष यांनी सोमवार, 02/09/2019 07:52 या दिवशी प्रकाशित केले.
मी पत्र तर पाठवलं, पण पुढं काय होणार हे कळणार कसं याच विचारात होतो. योगायोगाने एका आठवड्यानंतर मनिषाच आमच्या घरी आली. काहीतरी काम होते. सायकलवरून आली होती. आईकडे तिचं काम होते. ती काहीच बोलली नाही पण डोळ्यांनी खूप काही बोलली. माझी धडधड एकदाची थांबली. तिच्या कडून ग्रीन सिग्नल मिळाला यात मी खूपच खुश झालो होतो. परत एक पत्र पाठवले. दरम्यान माझं कॉलेज संपून एका कंपनीत जॉईन झालो होतो. आता मी माझा पत्ता दिला होता. नंतर मला तिने पत्राचं उत्तर दिले. एक ग्रिटींग कार्ड व चार पाच ओळींचं पत्र त्यात होतं. ' मला तुमची खूप आठवण येते' असं लिहिलं होतं. मग पत्रातून बोलणं सुरु झालं.

पोळ्यानिमित्त...

लेखक फुटूवाला यांनी शनिवार, 31/08/2019 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
खरंतर कालच या आठवणींना उजाळा आलेला पण इथं लिहायचं राहून गेलं. लहानपणी म्हणजे ४त असताना आमच्या घरी जानी गाय होती. माझ्या गावापासून ११ किमीवर बहिणीचे गाव होते. त्यांच्याकडे दुभते जनावर नसल्याने वडिलांनी त्यांना दिलेली. पण गाय इतकी खतरनाक होती की चुकून जरी सुटली तर थेट माझ्या घरी पोहोचून जायची. तीच वासरू नसताना सुद्धा. तीनचार वेळा असं झाल्यावर राहूदे म्हणून नंतर तिकडे पाठवलीच नाही. नंतर तिने एका खोंडाला जन्म दिला. आम्ही त्याच नाव दगड्या ठेवलं. शाळेत दुपारी १२ वाजता १५ मिनिटाची सुट्टी असायची तेव्हा मी येऊन त्याला वैरण हिबाळून पळायचो. दुपारी जेवायच्या सुट्टीत त्याला वैरण+पाणी.

मनिषा

लेखक तमराज किल्विष यांनी शनिवार, 31/08/2019 04:48 या दिवशी प्रकाशित केले.
मनिषा मनिषा म्हणजे मनी माझ्या जवळच्या नात्यातील मुलगी. गोरीपान, हसली की गालावरची खळी फार सुंदर दिसायची. त्यात तिच्या दातावर एक दात आलेला आणि वरच्या ओठावर उजव्या बाजूला मोठासा तिळासारखा ठिपका. काळेभोर डोळे नि काळेभोर लांबसडक केस. माझ्या पेक्षा वयाने सहा-सात वर्षे लहान. असेच एकदा कोणीतरी वडीलधारे म्हणाले यांची जोडी छान दिसेल. हे ऐकून ती इतकी सुंदर लाजली की बस. मलाही ती आवडत होतीच, पण आता मनोमन मीही तिला आयुष्याचा जोडीदार मानायला लागलो. कधी तिच्या घरी जाणं झालं तर लाजून हसायची , पण बोलायची मात्र मुळीच नाही. माझ्या वाऱ्यालाही थांबायची नाही. ती जवळ येताच माझ्या हृदयात धडधड वाढायची.

मंदीतली पौर्णिमा...।

लेखक मायमराठी यांनी शुक्रवार, 30/08/2019 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
पश्चिमेला पौर्णिमेचा चंद्र शाळेत पाय घासत जाणाऱ्या उत्साही मुलांसारखा रेंगाळत होता. समोरून पूर्वेकडे भास्करजी वेळेआधी हजर राहणाऱ्या , डोळ्यांनी सकाळपासूनच आग ओकणाऱ्या मुख्याध्यापकांसारखे घाईघाईने उगवत होते. चंद्राला अजून आभाळातच ढगांवर लोळायचे होते. एखाद्या समारंभाकरता शाळेत रंगीत कपडे घालून येण्याची परवानगी असते तो दिवस मुलांमुलींकरता फारच संस्मरणीय असतो तशीच काहीशी मनःस्थिती महिन्यात एकदाच संपूर्ण कलांनी झळकणाऱ्या चंद्राची होती.

पुस्तक

लेखक दिनेश५७ यांनी गुरुवार, 29/08/2019 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
अलीकडेच माझ्या मनात एक विचार आला. पुस्तक लिहायचा. या पुस्तकाची संकल्पना मी तुम्हाला सांगणार नाही. पण हे नक्कीच वेगळ्या धाटणीचे पुस्तक ठरावे असा माझा प्रयत्न होता. कधीकधी पुस्तकाचे नावच त्याचा गाभा उलगडून दाखविते. म्हणून पुस्तकातील पहिल्या लेखाचे पहिले अक्षर लिहिण्याआधी मी पुस्तकाचे नाव निश्चित केले... ‘युद्ध आमुचे सुरू!’... ज्या डायरीत माझे हे संकल्पित पुस्तक हस्तलिखित स्वरूपात संपन्न होणार आहे, त्या डायरीच्या पहिल्या पानावर मी झोकदार अक्षरात हा मथळा लिहून टाकला आहे. ‘युद्ध आमुचे सुरू!’ ...

दुनिया

लेखक तमराज किल्विष यांनी रविवार, 25/08/2019 08:57 या दिवशी प्रकाशित केले.
माझी आजी नेहमी अनेक म्हणी रोजच्या बोलण्यात सहजच बोलून जायची. " दुन्या ही दिल्या घेतल्या ची आहे " , "उसनं मांडं नी उसनं दांडं ", "दिलं तर गोड नाहीतर दोड" अश्या अनेक म्हणी आपोआप तिच्या बोलण्यात यायच्या. लहानपणी मला तिच्या बऱ्याच म्हणींचा अर्थ लागायचा नाही. माझं बालपण खेड्यात गेले. कोणत्याही सुविधा त्या काळात नव्हत्या. तंगडतोड करतच तालुक्याच्या गावाला जाऊन दवाखाना, भाजीपाला बाजार, म्हटलंच तर सिनेमा बघणे या गोष्टी कराव्या लागायच्या. माझ्या प्राथमिक शाळेतील वर्गमित्र व मी सर्वच शेतकऱ्याची मुले होतो. काही शेतमजुरी करणारांची होती. सगळ्यांची घट्ट अशी मैत्री होती.

पत्राद्वारे दासबोध अभ्यास उपक्रम - चाळीशीत

लेखक विटेकर यांनी रविवार, 25/08/2019 06:48 या दिवशी प्रकाशित केले.
घरा-घरातून श्री समर्थांचे भव्य दिव्य विचार पोचवावे, समाजात समर्थांची विचारधारा रुजवावी, परत एकदा शिवराज्य-रामराज्य यावे, गर्तेकडे चाललेल्या भोगवादी चंगळवादी समाजाला सावरावे, समर्थांच्या वाणीत सांगायचे तर ‘शहाणे करून सोडावे सकळ जन!’ अशी समाजप्रबोधनाची आस मनी धरून कै.स.भ.द्वा. वा. केळकर व गीताताई  केळकर यांनी  "पत्रद्वारा दासबोध अभ्यास" हा  उपक्रम सुरू केला. कितीतरी उपक्रम येतात व जातात, नंतर त्यांची आठवणही नसते . पण पत्रद्वारा दासबोध अभ्यास हा उपक्रम निरंतर राहिला व सातत्याने वाढला. *क्रिया करून करवावी* या समर्थ उक्तीप्रमाणे ती.

पत्राद्वारे दासबोध अभ्यास उपक्रम - चाळीशीत

लेखक विटेकर यांनी रविवार, 25/08/2019 06:47 या दिवशी प्रकाशित केले.
घरा-घरातून श्री समर्थांचे भव्य दिव्य विचार पोचवावे, समाजात समर्थांची विचारधारा रुजवावी, परत एकदा शिवराज्य-रामराज्य यावे, गर्तेकडे चाललेल्या भोगवादी चंगळवादी समाजाला सावरावे, समर्थांच्या वाणीत सांगायचे तर ‘शहाणे करून सोडावे सकळ जन!’ अशी समाजप्रबोधनाची आस मनी धरून कै.स.भ.द्वा. वा. केळकर व गीताताई  केळकर यांनी  "पत्रद्वारा दासबोध अभ्यास" हा  उपक्रम सुरू केला. कितीतरी उपक्रम येतात व जातात, नंतर त्यांची आठवणही नसते . पण पत्रद्वारा दासबोध अभ्यास हा उपक्रम निरंतर राहिला व सातत्याने वाढला. *क्रिया करून करवावी* या समर्थ उक्तीप्रमाणे ती.

नेनचिम - विज्ञान कादंबरी

लेखक nishapari यांनी शनिवार, 24/08/2019 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
नारायण धारपांच्या " नेनचिम " ही विज्ञान काल्पनिका कादंबरीत अतिप्राचीन काळात चंद्रावर मनुष्यसदृश्य जातीची वसाहत होती अशा विषयावर आधारित आहे ... त्या जातीची खूप वैज्ञानिक प्रगतीही झाली होती .. त्यातच त्यांचा ग्रह कालांतराने जीवनासाठी अयोग्य होणार , सर्व जीवित नष्ट होणार असा शोध तिथल्या शास्त्रज्ञांना लागतो आणि तिथे हलकल्लोळ माजतो ... हळूहळू परिस्थिती नियंत्रणाखाली येते आणि या प्रश्नावर उपाय शोधण्यासाठी एक मोठी शास्त्रज्ञांची संघटना उभारली जाते ... वसतीयोग्य असा दुसरा ग्रह शोधणं त्यांना शक्य होत नाही ...

सूर

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 24/08/2019 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
सूर अष्टमीच्या अंधाऱ्या रात्री कारागृहात जन्मलेल्या बाळाला डोईवरल्या टोपलीत टाकून वसुदेवानं यमुना पार केली आणि गोकुळातल्या नंदाच्या राजवाड्यात यशोदेच्या झोळीत आपलं बाळ टाकून डोळे पुसत त्या बालिकेला घेऊन तो कारागृहात परतला. ...सारं काही ठरल्यासारखं पार पडताच काळोख मिटवून उगवलेल्या सूर्याच्या पहिल्या किरणांनी कारागृहाच्या झरोक्‍यातून कोठडीतल्या त्या ‘देवकीच्या बाळा’चं पहिलं दर्शन घेतलं, आणि ‘अवतारकार्य’ सुरू करण्याचा इशारा केला. त्या किरणांकडे पाहात त्या नवजात बालिकेनं पहिलं "ट्यॅऽहां' केलं... पहारेकऱ्यांना जाग आली.