Skip to main content

प्रकटन

नकटीच्या लग्नाला...

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 01/09/2008 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस झाले तरी नकटीचं लग्न ठरत नव्हतं. वधूपित्यानं संभाव्य वर शोधून ठेवले होते. आपणच मुलीचा सांभाळ केलाय, असं म्हणविणारे काके-मामेही प्रयत्न करून थकले होते. पण "कुलस्वामिनी' कौल देत नव्हती. काही ना काही अडचण सतत येत होती. नकटीच्या लग्नापायी बऱ्याच जणांचं घोडं अडलं होतं. त्यांच्या सामाजिक कार्याच्या लालसेत अडथळा येत होता. समाजाच्या सेवेसाठी आयुष्य वाहून घेणाऱ्या त्या बिचाऱ्या प्रामाणिक गांधीवाद्यांचं, राष्ट्रवाद्यांचं सगळं अवसानच गळाल्यासारखं झालं होतं. इच्छा असूनही संधी न मिळाल्यानं समाजासाठी काही करता येत नव्हतं.

आठवणी

लेखक मनीषा यांनी रविवार, 31/08/2008 01:00 या दिवशी प्रकाशित केले.
(हे पद्य नाही... तरीही मी ते असे लिहिले आहे कारण , ते असे वाचले असता जास्तं परिणामकारक वाटेल असे मला वाटते )
ओथंबलेलं आकाश बरसतच नाही कधीचं मनात दाटलेलं मळभ पसरत राहतं आभाळावर संध्याकाळच्या कृष्णछाया पसरतात घरावर घराच्या या भिंती माझ्या एकांताच्या साक्षी सारे भोग ..... सा-या वेदना जपल्या आहेत त्यांनीच हळुवार होणारं मन सावरलं आहे त्यांनीच कसं सांगु?

सप्तर्षि

लेखक सौरभ वैशंपायन यांनी शनिवार, 30/08/2008 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
सरनौबत प्रतापराव गुजरांनी शरण आलेल्या बहलोलखान पठाणाला धर्मवाट दिली. महाराजांना ही बातमी समजताच. त्यांनी टाकोटाक सरनौबतांना पत्र लिहीले - "स्वत:ला सरनौबत म्हणवता? तुम्ही तो केवळ शिपाईगिरीच केली! बहलोल इतुका बहुत वळवळ करीत आहे, त्यांस मारुनी फ़त्ते करणे अन्यथा आम्हांस तोंड न दाखविणे!". तीच चिड मस्तकात घेउन सरनौबत प्रतापराव गुजरांनी नेसरी येथे अवघ्या सहा अंगरक्षकांसहीत बहलोलखान पठाणाच्या फ़ौजेवर हल्ला चढवला आणि अजुन एक खिंड पावन झाली --------------------------------------------------- काय घडविले? कसे म्हणावे सेनापती सुजाण? कुणा विचरुनी दिला सोडुनि, खासा बहलोल पठाण?
Taxonomy upgrade extras

फांसे

लेखक हेरंब यांनी शनिवार, 30/08/2008 06:40 या दिवशी प्रकाशित केले.
सापशिडीच्या खेळात '९८' च्या सापाला चुकवायचं आहे कवड्यांच्या खेळात 'तीन पाय कुत्रं' टाळायचं आहे 'पांच, तीन दोन' मध्ये कुणाचेतरी हात ओढायचे आहेत 'नाठेठोम' मध्ये अजुन, सगळ्या जोड्या जिंकायच्या आहेत कॅरम मध्ये कधीतरी, क्वीनचे 'कव्हर' घ्यायचे आहे आयुष्याच्या 'ल्युडोत' अजून सहाचे 'दान' पडायचे आहे !
Taxonomy upgrade extras

कधी सांगु शकलो नाही तुम्हाला......

लेखक चिंतामणराव यांनी गुरुवार, 28/08/2008 09:07 या दिवशी प्रकाशित केले.
कधी सांगु शकलो नाही तुम्हाला जाणीवा रुंदावत जातांना तुम्हीच प्राम्टिंग करत होता मी मिजाशित टाळ्या घेत होतो विंगेत तुम्ही आनंदाश्रु पुशीत होता कधी बोललो नाही तुम्हाला तुम्हीच तर दिलंत मला स्रुजन सारस्व्ताच भान तुम्हीच ऍकवलंत मला नव्या युगगीतांच उदगान कधी सांगीतल नाही तुम्हाला जीवन म्हणजे अपार श्रद्धा प्रेम, सेवा, कर्तव्य आणि निश्ट्टा खोचलेला पदर आणि यज्ञमग्न हात तुमच जीवन हाच मुर्तिमंत पाट्ट सांगायच राहिलंच तुम्हाला तुम्हीच शिकवलंत, भिमसेनी धबधब्याखाली सोबती गोळा करुन रंगवाव्यात मॅफली झेलाव्यांत सुर तालांच्या आशाडी बरसाती रंग्-रस-गंधांनी भिजवावी मनाची माती कधी कसा आट्टवत नाही पण तुम्हीच
Taxonomy upgrade extras

राष्ट्राय स्वाहा: इदं न मम!!!!

लेखक सौरभ वैशंपायन यांनी बुधवार, 27/08/2008 18:28 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात अनेक अश्या व्यक्ती झाल्या कि ज्यांचे कर्तृत्व असामान्य आहे. त्या ज्या क्षेत्रात काम केले ते मैलाचा दगड ठरले. आजही त्या हजारो व्यक्तींना १०० करोड व्यक्ती आदर्श मानत आहेत आणि राहतील. थोडक्यात भारतभूचे सुपूत्र या सदरात ते येतात. मात्र भारतभूचे सुपूत्र होणे इतके सोपे आहे का? प्रचंड उलथापालथी नंतर भारताच्या सुपूत्रांपैकी ४ जण माझ्या डोळ्यांसमोर रात्रं-दिवस येत आहेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या आधी आणि त्यांच्या नंतर भारतात किंवा भारता बाहेर हजारो आदरणीय व्यक्ती झाल्या वा होतील पण या चौघांचे स्थान एकमेवाद्वितीय आहे. या चौघांचाहि कालखंड भिन्न आहे.

मसाज ... एकपात्री शब्दखेळ

लेखक भडकमकर मास्तर यांनी बुधवार, 27/08/2008 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
मसाज ...विजय तेंडुलकरांचं हे नाटक.. रूढार्थानं हे नाटक नाही, किंवा एकपात्री प्रयोग म्हणावं तर तसाही नाही हा... ( याला एकपात्री शब्दखेळ असे नाव दिले आहे) हे नाटक पहायचा योग नाही आला, पण पुस्तक सापडलं म्हणून घेऊन आलो.... ज्या माणसाची ही कैफ़ियत तेंडुलकर मांडतात तो त्यांना खरंच भेटला होता आणि त्याचं आयुष्य पाहून त्यांना हे लिहावेसे वाटले....

माझा निबंध ते अनुदिनीपर्यंतचा प्रवास

लेखक देवदत्त यांनी सोमवार, 25/08/2008 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
निबंध लिहा: माझा आवडता प्राणी, शाळेचे आत्मचरित्र, वाचनाचे महत्व. शाळेत असा प्रश्न असायचा सहामाही व वार्षिक परिक्षेला. किंवा मग पत्रलेखन. गुण १० ते १५. त्यावेळेला नेमके काय लिहावे ते माहित नसायचेच. मित्रांसोबत जास्त वेळ शाळेतील अभ्यासाचेच जास्त बोलणे व्हायचे किंवा मग खेळ , दूरदर्शनवरील कार्यक्रम, सिनेमे ह्यांच्यावर चर्चा व्हायची. पण त्यावर लिहायला कधी कोणी नाही सांगितले. त्यामुळे निबंध लिहायला मदत व्हायची निबंधावरील पुस्तकाची किंवा मार्गदर्शकाची(हो, तेव्हा मार्गदर्शक वापरणे म्हणजे थोडेफार कमीपणाचे मानले जायचे) तेही वापरावयास सुरुवात केली होती.

फाळणी

लेखक सौरभ वैशंपायन यांनी सोमवार, 25/08/2008 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
११ जुलै रोजी मुंबईत रेल्वेमध्ये जे स्फोट होऊन २०० पेक्षा जास्त माणसं मारली गेली होती त्या नंतर दोन दिवसांनी मला ही कविता सुचली आहे. शक्य तितकं वास्तव मांडण्याचा प्रयत्न केलाय. दुर्दैवाने गेल्या २०-२५ दिवसांत अश्या घटाना घडात आहेत कि सुभाषबाबुंचे ३रे कडवे आपण खरच खुप सिरीअसली घ्यायला हवे. ----------------------------------------------- परवाच एका स्फोटात मेलो, पहिल्याच झटक्यात स्वर्गात गेलो, स्वर्गात जाण्याचा एकच कायदा होता, सरळ जगण्याचा हाच एक फायदा होता.

गाणी : खणखणीत नाणी

लेखक आपला अभिजित यांनी रविवार, 24/08/2008 00:27 या दिवशी प्रकाशित केले.
काही गाणी हृदयाचा ठाव घेतात. काही सतत गुणगुणावीशी वाटतात. काही नकळत पाठ होतात. काहींचा ठेका आपल्याला भारून टाकतो. काय असतं त्यामागचं गौडबंगाल? का करतात ही गाणी मनावर गारूड? पूर्वी नव्या सिनेमांतली गाणी सिनेमा आल्यानंतरच ऐकायला मिळायची. किंवा आकाशवाणीवरून. नंतर "छायागीत' वगैरे प्रकार सुरू झाले. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी "झी'वर "टॉप टेन' आलं. नवीन गाणी ऐकण्यासाठी मी अक्षरशः अशा कार्यक्रमांवर झडप घालायचो. "छायागीत'मध्ये आता कुठलं गाणं लागणार, याची कोण उत्सुकता असायची! "मटा'वगैरे मधल्या जाहिरातींतून "आज या चित्रपटातील गाणे "छायागीत'मध्ये पाहा' असा उल्लेख असायचा.