Skip to main content

प्रकटन

मन कातर कातर...

लेखक मृगनयनी यांनी बुधवार, 06/08/2008 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
मन कातर कातर... फार जपलं जपलं... पाणी गढूळ गढूळ... उडे चिखल चिखल... एक बोचला कातळ... वाहे रक्त भळभळ.... मनी उठले काहूर... एक वेदनेची लहर... परत लाटांचा कल्लोळ... पण जल निर्मळ निर्मळ... मनी आशेचा मोहोर... वाहू थांबले रुधिर.... मन कातर कातर... झाले नितळ नितळ...
Taxonomy upgrade extras

मी डेटिंग केले नाही..!

लेखक उपटसुंभ यांनी बुधवार, 06/08/2008 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
मी डेटिंग केले नाही, मी सेटिंग केले नाही. मी निरोप सुद्धा साधा कधी पाठवलेला नाही. भवताली चॅटिंग चाले, ते विस्फारुन बघताना, कुणी दोस्ती वाढवताना, कुणी गर्लफ्रेंड मिळवताना. मी लॉग इन होऊन बसलो मेसेंजरवरती जेव्हा. मज हाय करायला देखिल कुणीही पिंग केले नाही. मी डेटिंग केले नाही.. बुजलेला यांत्रिक चेहरा, सुटलेली घाबरगुंडी. सुंदर पोरी बघताना भर उन्हात वाजे थंडी त्यांच्या बापाला भ्यालो अन भावालाही भ्यालो. मी स्वप्नात सुद्धा माझ्या कधी "लफडा" केला नाही. मी डेटिंग केले नाही अव्यक्त फार मी आहे मूळ मुद्द जिथल्या तेथे.
Taxonomy upgrade extras

आंबट-गोड नाती

लेखक स्वाती फडणीस यांनी मंगळवार, 05/08/2008 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
आंबट-गोड नाती . चिंचेचा आकडा गं.. शेपटावाणी वाकडा गं.. चिंचेचा आकडा.. वाकडा गं.. पेरा-पेरात गाठी गं.. चिंचोक्या बाटी गं.. पेरा-पेरात गाठी.. बाटी गं.. आकड्याची गोडी गं.. पोरं यडी-खुळी गं.. आकड्याची गोडी.. खुळी गं.. जिभेला हुळहूळ गं.. खाताना कळ गं.. जिभेला हुळहूळ.. कळ गं.. चिंच आंबट-गोड गं.. भली-बुरी चव गं.. चिंच आंबट-गोड.. चवीला गं.. चिंचेचा आकडा.. वाकडा गं.. पेरा-पेरात गाठी.. बाटी गं.. चिंचजशी आंबट-गोड नाती गं.. ===================== स्वाती फडणीस............. ०५-०८-२००८

जत्रा..!

लेखक उपटसुंभ यांनी मंगळवार, 05/08/2008 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
अविनाश ओगले यांच्या "जत्रा" या सुंदर गझलेचे विडंबन... ओगले साहेब क्षमा असावी..! ("वधूवर मेळावा" नावाच्या जत्रेला) उपवर वधू वरांच्या करतात येथ जत्रा. दोनास चार करण्या भरतात येथ जत्रा. नजरा कुमारिकांच्या ठरतात जीवघेण्या, वेठीस बिज्वरांना धरतात येथ जत्रा. झाले ठिकाण जत्रा चेहरे न्याहाळण्याचे. चिरडून सर्व हृदये सरतात येथ जत्रा. वरबाप ना दयाळू हुंड्यास का कठोर, प्रश्नांसमोर असल्या हरतात येथ जत्रा. आता पुढील वर्षी पुन्हा नवीन आशा. स्वर्गातल्याच गाठी स्मरतात येथ जत्रा ? -- अभिजीत दाते
Taxonomy upgrade extras

ते राहूनच गेलं...

लेखक दिनेश५७ यांनी सोमवार, 04/08/2008 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
एक वाईट बातमी आहे. अरूण गेला. मागं मी अरूणनं सांगितलेली, त्या लेलेंची- सिद्धिविनायकाच्या शेजा-याची - गोष्ट तुम्हाला सांगितली, त्या लेल्यांना भेटायचं आमचं ठरलं होतं. नेहेमी आम्ही भेटलो, की त्या लेलेंची आठवण यायची, आणि, कधीतरी नक्की त्यांच्याकडे जाऊ असं अरुण म्हणायचा... गेल्या आठवड्यात, तो अचानक, अगदी अकल्पितपणे, निघून गेला... गुजरातेतल्या गावी वृद्ध आईला भेटायला गेला होता, तिथेच त्याला हार्ट ऍटॆक आला... ...त्या दिवशी सकाळीसकाळी, माझ्या एका सहकार्‍याचा फोन आला, आणि माझ्या मनात कसलीतरी पाल चुकचुकली...

एक क्षण निसटू गेला..

लेखक स्वाती फडणीस यांनी सोमवार, 04/08/2008 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
एक क्षण निसटू गेला.. . हिरव्यागार पानाच्या टोकाशी.. थांबून राहिलेला थेंब, पांढर्‍या शुभ्र स्पार्टेक्सवर.. साचलेल्या पसाभर पाण्यात, टप्पकन पडला... एक लाट उंच उसळली.. पाण्यात आणि मनात! एकाच वेळी!! क्लिक!!! अल्बम मध्ये लावण्याजोगी, अजून एक आठवण.. लगोलग आत गेले.. वाट बघत बसलेले रंग गोंजारले.. हळूच कुंचले मोकळे केले.. आणि गेले.. रंग ओले करण्यापुरतं पाणी आणायला.. तो थेंब तो क्षण!!! तेव्हड्यात वाहून गेला.. छ्या!!! जाऊदे! मूड नाही आज! म्हणताच कागद कोरा राहिला... एक क्षण निसटू गेला.. ====================== स्वाती फडणीस.............. २९-०७-२००८

नेहमीच ... तुझ्यामुळे

लेखक बेसनलाडू यांनी सोमवार, 04/08/2008 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
तिन्ही त्रिकाळ संध्याकाळ नेहमीच ... तुझ्यामुळे मेंदूतले घोळ पांजरपोळ नेहमीच ... तुझ्यामुळे ओठांत धूर डोळ्यांत पूर नेहमीच ... तुझ्यामुळे ओले घसे (होते हसे!) नेहमीच ... तुझ्यामुळे शब्दांचा जाच शब्दांना जाच नेहमीच ... तुझ्यामुळे ओळींना धार ओळींचे वार नेहमीच ... तुझ्यामुळे जगायचा वीट जगतोय धीट नेहमीच ... तुझ्यामुळे मरणाशी भेट कविताच थेट नेहमीच ... तुझ्यामुळे

स्वार्थ: काहि सैल/स्वैर विचार

लेखक ऋषिकेश यांनी रविवार, 03/08/2008 01:28 या दिवशी प्रकाशित केले.
"अख्खा समाजच स्वार्थी झालाय.. " मी एकदम चमकून पाहिले. ट्रेनच्या डब्यात मागे बसलेल्या दोन व्यक्तींमध्ये हे संभाषण चालू होते.. अख्ख्या डब्याला ऐकू जाईल इतक्या मोठ्याने म्हणणारा अजूनही लेक्चर झोडतच होता "जरा भारतात बघ एकेक व्यक्तींनी सगळ्यांसाठी आयुष्य पणाला लावलं.. रामापासून ते बुद्ध, गांधी अश्या व्यक्तीच्या समाजात स्वार्थीपणा अजून टिकला हेच नवल... " मी यापुढचेही संभाषण ऐकत होतो.. पण आता कानावर शब्द पडत होते पण कळत नव्हते कारण डोक्यात अचानक विचार चमकला "खरंच आपण स्वार्थी आहोत का?.. मी स्वार्थी आहे का? स्वार्थी असावं का? " "स्वार्थी कोणाला म्हणावे? " मनाच्या एका कोपऱ्यातून प्रश्न..

शुभेच्छा!!

लेखक प्राजु यांनी शनिवार, 02/08/2008 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या सगळ्या मिपा कुटुंबातील मित्र आणि मैत्रीणींना मैत्रीदिनाच्या हार्दीक शुभेच्छा! आपली मैत्री अशीच वृद्धींगत होत राहो हीच ईशचरणी प्रार्थना!!! गंध अलौकिक याचा क्षणभंगूर जीवन जरी शुभ्र पाकळ्या कोमल नाजूक नाभी शेंदरी छंद समर्पाणाचा आगळा वेड्याने त्या जोपासताना मातीलाही गंध दिला फांदीवरूनी ओघळताना मैत्री व्हावी ऐसी जिवाला जीव देणारी जीवन ऐसे सार्थ व्हावे पारिजात फुला परी... - प्राजु