माझीही काही रेखाटने - लहान बाळे
नमस्कार मिपाकर ,
मी सैरंध्री. मिपाचे नुकतेच सदस्यत्व घेतले आहे.
मराठी संकेतस्थळांमधले मिपा हे एक छान संकेतस्थळ आहे. मिपावर वाचण्यासारखे खूप काही आहे पण सध्या मी तेवढा वेळ देऊ शकत नाहीये. पण कोणी चित्रे , रेखाटने टाकली तर आवर्जून बघते.
चित्रकला माझा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. मी पेन्सिल स्केचेस काढते आणि २००४ पासून ऑईल पेंटिंग ही करत आहे.
येथे बर्याच जणांनी काढलेली चित्रे बघून मलाही माझी रेखाटने मिपाकरांबरोबर शेअर करावीत असे वाटले.
सुरवात लहान बाळांच्या रेखाटनापासून करते.
लहान बाळे किती निरागस, निष्पाप आणि निर्मल मनाची असतात. त्यांच्या बाळलीला बघणे कोणाला आवडत नाही?
मिसळपाव