मस्त पाऊस पडतोय,विचार येतो मनात की हे धुंद वातावरण एन्जॉय करावं, अनेक पर्याय आहेत की समोर, छानशी गझल ऐकत वाईनचे घोट घेत बसावं की अपूर्ण राहिलेल्या पुस्तकात गुडूप होऊन जावं, मैत्रीणीशी चॅट करत मनसोक्त वेळ घालवावा की एखादा गरमागरम पदार्थ चाखत जिव्हेला तृप्त करावं ?? यातलं काही करून मानवरची मरगळ जाईल अस वाटत नाही, आयुष्यात एका क्षणी एकही पुस्तक जवळच वाटत नाही की एखाद्या गोष्टीचा मनसोक्त आस्वाद घेऊन मन रमेल असंही वाटत नाही.सगळा रंगमंच सजलेला असताना आतली अस्वस्थता स्टेजवर पाय ठेऊच देईना.या मन नावाच्या अवयवाच काही कळत नाही,भवताल मस्त धुंद तर हे आपलं अस्वस्थ ,काय हवं असत मनाला??