मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आज

क्रान्ति · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
नक्कीच काहीतरी चुकतय आज कशान हे मन वेड दुखतय आज? कधीच्या सुचलेल्या दोनच ओळी पिंगा घालतात भलत्याच वेळी अनावर रात्री चांदण्याची खेळी सृजनाच सुख सुद्धा खुपतय आज! मनातल गाणही ओठांवर नाही सुरांच गाव कुठे दूरवर राही उजाड माळ का वाट माझी पाही? आभाळही पापण्यांत झुकतय आज! उदास झाडांची गळतात पानं निस्तेज चंद्राच वितळून जाणं धुक, जस दुखणं जुनं-पुराणं उफाळून पुन्हा का सलतय आज?

वाचने 4115 वाचनखूण प्रतिक्रिया 14

प्राजु 12/03/2009 - 23:24
फार फार फारच सुंदर...! उजाड माळ का वाट माझी पाही? आभाळही पापण्यांत झुकतय आज! अप्रतिम..! उदास झाडांची गळतात पानं निस्तेज चंद्राच वितळून जाणं धुक, जस दुखणं जुनं-पुराणं उफाळून पुन्हा का सलतय आज? जबरदस्त!!!!!! हॅट्स ऑफ! काय बाय सांगू? कसं गं सांगू... काही तरी होऊन गेलंय आज.. याची आठवण झाली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

बिपिन कार्यकर्ते 12/03/2009 - 23:36
क्रांतिबै, झक्कास लिहिता तुम्ही. मस्त. कधीच्या सुचलेल्या दोनच ओळी पिंगा घालतात भलत्याच वेळी बिपिन कार्यकर्ते

चतुरंग 12/03/2009 - 23:38
सुंदर कविता! कधीच्या सुचलेल्या दोनच ओळी पिंगा घालतात भलत्याच वेळी अनावर रात्री चांदण्याची खेळी सृजनाच सुख सुद्धा खुपतय आज! क्या बात है!! केव्हापासूनचं मनात पडलेलं कल्पनेचं बीज हे कोणत्यातरी बेसावध क्षणी असं कवितेच्या रुपानं उगवतं. निर्मितीचं गुपितच एकप्रकारे सांगणार्‍या ह्या ओळी फार भावल्या! तुमच्या साध्या शब्दातल्या कविता थेट भिडतात!! जियो!!! चतुरंग

In reply to by चतुरंग

बिपिन कार्यकर्ते 12/03/2009 - 23:42
एकदम करेक्ट रंगासेठ... खूपच भावल्या त्या ओळी. बिपिन कार्यकर्ते

जयवी 13/03/2009 - 00:48
सृजनाच सुख सुद्धा खुपतय आज ....... अगदी अगदी :) आज काय बाई होतंय आमच्या क्रांतिला........;)

प्रमोद देव 13/03/2009 - 08:14
:) आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

क्रान्ति 13/03/2009 - 21:33
आज खरच खूप छान वाटतय. इतक्या सगळ्या रसिक आणि गुणग्राही मित्रांक्डून माझ्या वेड्यावाकुड्या अक्षरांच इतक कौतुक होतय! माझे जुने दिवस परत आलेत! सगळ्यांना धन्यवाद देण्यापेक्षा या ॠणात रहाण मला जास्त आवडेल. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

शिवापा 13/03/2009 - 21:48
अप्रतिम! शामसे आंख मे नमीसी है आठवले.