समज-गैरसमज
"लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा' असं म्हटलं जातं. (म्हणजे काय, कुणास ठाऊक!) लहानपण हा आयुष्यातला सगळ्यात मोलाचा, महत्त्वाचा टप्पा असतो, एवढंच त्यातून घेण्यासारखं. अर्थात, हे कळतं लहानपण सरल्यावर आणि जास्त अक्कल आल्यावरच. लहानपणात मात्र आपणच हुशार, असं वाटत असतं. त्या वयात मनात काही संकल्पना, व्याख्या, तत्त्वं घट्ट बसलेली असतात. मोठ्ठं झाल्यानंतरही त्या प्रतिमांचं, संकल्पनांचं भूत मानगुटीवरून उतरायला बराच वेळ द्यावा लागतो.
माझ्याही लहानपणी अशा अनेक कल्पना, गृहीतकं मनात घट्ट बसली होती. आपल्याकडे लहान मुलाला कुठल्याही गोष्टीविषयी असलेलं नैसर्गिक कुतूहल, उत्सुकता याविषयी समजावून सांगण्याऐवजी आणखी काहीतरी गूढ, अकल्पित सांगण्याची प्रथा आहे. किंवा आमच्या पिढीच्या लहानपणात तरी होती. साधी-सोपी आणि मुलांना समजू शकेल अशी गोष्टही निष्कारण अवघड करून सांगायची आणि त्या मुलाच्या मनाचा गोंधळ वाढवून ठेवायचा. मुंजीत दंडात बेडकी भरण्याचा बागुलबुवा हा यातला आदीम प्रकार. मुंजीच्या वेळी त्या लहानग्याचं वय असतं जेमतेम आठ ते दहा वर्षं. मुंजीतल्या या "अघोरी' प्रथेविषयी त्याच्या मनात भयगंडच निर्माण होईल, याची पुरेपूर खात्री मामे, काके, आई-वडील या गैरसमजाची भलावण करून सांगण्यातून करायचे. मलाही या बेडकी प्रकाराने मुंज होईपर्यंत धडकी भरली होती. शेवटी मुंजीचा दिवस संपता संपता, असलं काही नसतं, हे कळलं होतं. पण दंडात "बेडकी' येणं, म्हणजे शरीर वाढीला लागण्याचं लक्षण, शरीरात बदल घडण्याचं, तारुण्याकडे वाटचाल करण्याचं लक्षण, हे सरळ-साधं सत्य कुणी सांगण्याची तसदी घेतली नाही.
काही गैरसमज असे वडीलधाऱ्यांच्या सांगण्यातून होतात, तर काही नकळत मनात रुजत असतात. त्याविषयी कुतूहलानं अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न न केल्यानं, किंवा कुणी स्वतःहून न सांगितल्यानं ते मनात पक्के होत जातात. लहानपणी महाभारतातल्या गोष्टी ऐकताना "चक्रव्यूह' प्रकरणाचं मला भारी आकर्षण आणि गूढ वाटायचं. अभिमन्यू चक्रव्यूहात अडकला, म्हणजे काय, तेच जाम कळायचं नाही! सैन्याची गोलाकार रचना, म्हणजे एखाद्या गुहेसारखी किंवा गणपतीत देखावे तयार करतात, तशी कुठेतरी अज्ञात ठिकाणी अशी सैनिकांची गोलाकार (गुरुत्वाकर्षणाच्या नियमांना धुडकावून!) रचना केली असावी की काय, अशीच शंका यायची मला. मीही ती निरसन करून घेण्याचा प्रयत्न बरीच वर्षं केला नव्हता. साध्या जमिनीवर सैन्याला विशिष्ट रीतीनं उभी करण्याची रचना म्हणजे चक्रव्यूह, हे (मोठेपणी) समजल्यावर "एवढीही अक्कल नव्हती आपल्याला,' असं वाटून गेलं.
राजकीय तत्त्वं आणि समजाबद्दलची तर बातच वेगळी! कॉलेजात असेपर्यंतही बाळासाहेब ठाकरे, वाजपेयी म्हणजे आपली दैवतं होती. आणि कॉंग्रेसचे तमाम पुढारी म्हणजे जवळपास राक्षस वाटायचे. ठाकरे-पवार हे मित्र आहेत आणि एकमेकांना भेटतात-बिटतात असं सांगणाऱ्या एका मित्राविषयी त्या क्षणी "तूच का तो ब्रूटस' असंच वाटलं होतं. कारण मनताल्या कोणत्याही संकल्पना, गृहीतकं यापेक्षा वेगळं काही या समाजात असू शकतं, हे लहानपणी कुणी कधी मनावर बिंबवलंच नव्हतं. एकाच विषयाला अनेक पैलू असतात, व्यक्तिमत्त्वाला अनेक रंग असू शकतात, हे समजण्याची पात्रताच नव्हती.
आता माझ्या चार वर्षांच्या लेकीलाही मी अतिउत्साहानं पोस्ट ऑफिस म्हणजे काय, तिथलं काम कसं चालतं, झाडं कशी वाढतात वगैरे गोष्टी शिकवायला जातो (आणि ती मला फाट्यावर मारून खेळायला निघून जाते,) तेव्हा मला माझ्या लहानपणाच्या या आठवणी कुठेतरी मनात असतात. आपल्या मुलीनं आपल्याइतकं तरी बावळट राहू नये, अशी माफक अपेक्षा असते.
तुमच्याही असतील ना अशाच काही आठवणी? जुन्या काळची, जुनाट गृहीतकं, भोळ्या कल्पना? सांगाल??
याद्या
13013
प्रतिक्रिया
69
मिसळपाव
खूप आहेत.
मला
In reply to खूप आहेत. by प्राजु
टि. व्हि. वरिल जहिराती
जहिराती,
In reply to टि. व्हि. वरिल जहिराती by कुमार भिडे
वरील, बघू!!!
In reply to जहिराती, by टिउ
व्वा!
लेख आवडला !
"महिना
(घराघरांती
In reply to "महिना by भडकमकर मास्तर
वाह अशा
:-)
In reply to वाह अशा by भाग्यश्री
आई माझा
लहानपणच्या महान शंका...
अच्छा!
In reply to लहानपणच्या महान शंका... by बिपिन कार्यकर्ते
मलाही हाच प्रश्न... ;)
In reply to अच्छा! by चतुरंग
४-५ वर्षाचा असेन
विष्णू
In reply to ४-५ वर्षाचा असेन by चतुरंग
ते तर
In reply to विष्णू by मनिष
अरे हो!!!
In reply to ते तर by llपुण्याचे पेशवेll
लग्न झाले
हो..
In reply to लग्न झाले by सँडी
छान विषय!!
मलाही
बालपण
बस कन्डक्टर
लहानपणी
आकाशवाणी
माझाही मोठा गैरसमज
माझी मुलगी
माझ्याही मुलाने
In reply to माझी मुलगी by जागु
आता राहवत नाही!
In reply to माझ्याही मुलाने by प्राजु
व्वा!
१. >>पृथ्वीच
In reply to व्वा! by आपला अभिजित
पैसे
मस्त
मी सात आठ
मस्त --
In reply to मी सात आठ by रेवती
धम्माल!!!!!! अ
In reply to मी सात आठ by रेवती
शालू नेसायला
In reply to धम्माल!!!!!! अ by बिपिन कार्यकर्ते
ढिश्क्यांव!!!!!!
In reply to शालू नेसायला by चतुरंग
हाहाहा!
In reply to ढिश्क्यांव!!!!!! by बिपिन कार्यकर्ते
रेवती..
In reply to शालू नेसायला by चतुरंग
अगं मला
In reply to रेवती.. by प्राजु
पैठणीचा
In reply to अगं मला by रेवती
दुप्पट!!!!! :(
In reply to अगं मला by रेवती
युती.
In reply to दुप्पट!!!!! :( by बिपिन कार्यकर्ते
टाटा...
अगायायाया
In reply to टाटा... by मदनबाण
हा बाणा
In reply to अगायायाया by शक्तिमान
रेडिओत
अगदी तसेच
In reply to रेडिओत by टिउ
चंद्राचे बाबा कोण?
हा हा
In reply to चंद्राचे बाबा कोण? by संदीप चित्रे
नक्कीच
In reply to हा हा by रेवती
साधारण
In reply to नक्कीच by विनायक पाचलग
आठवतात पण
In reply to साधारण by प्राजु
इयत्ता ७वी
In reply to साधारण by प्राजु
झाड
मला आठ्वतय
लहानपणी (
तुमच्याही
ही.. ही ..ही...
पृथ्वी गोल
>>मग तिने
झकास !!
वा!!! छान
..
हा हा हा...
In reply to .. by आपला अभिजित
लहानपणी पडणारा प्रश्न