मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

झाडांच्या अश्याही कविता

दत्ता काळे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
१. प्राक्तनात प्राण लाचार जगण्याचे आंदण मिळते फांदीच्या ओलाव्याला नवजात बांडगूळ गिळते . . २. फळभरल्या झाडावरुनी पाखरे निघाली जाया घरट्याचे छत्र गनिम नजरेत विषारी माया . . ३. देवडी विसावून पायी परमार्थ असे बसलेला पानांचे प्राण खुडून अर्पितो दान देवाला . . ४. सावलीत शांत झाडाच्या मरणाची केवळ भ्रांत खंगलेला, खिन्न मनाचा झोपला देह विश्रांत . . ५. रसशुष्क वाळली फांदी वाळीत टाकली कोणी ? डोळ्यात वाळव्यांच्या मगरीचे भावुक पाणी . . . .

वाचने 4056 वाचनखूण प्रतिक्रिया 12

sanjubaba गुरुवार, 03/12/2009 - 11:42
देवडी विसावून पायी परमार्थ असे बसलेला पानांचे प्राण खुडून अर्पितो दान देवाला . . काळेसाहेब, फारच छान कविता संजूबाबा

जागु गुरुवार, 03/12/2009 - 12:36
प्राक्तनात प्राण लाचार जगण्याचे आंदण मिळते फांदीच्या ओलाव्याला नवजात बांडगूळ गिळते . छान आहे.

मदनबाण गुरुवार, 03/12/2009 - 13:17
प्राक्तनात प्राण लाचार जगण्याचे आंदण मिळते फांदीच्या ओलाव्याला नवजात बांडगूळ गिळते . . लयं भारी... मदनबाण..... "If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

लिखाळ गुरुवार, 03/12/2009 - 16:59
फार छान..फार छान.. बांडगुळ तर फार मस्त ! दुसर्‍या कडव्याचा अर्थ समजला नाही. पुढील लेखनास शुभेच्छा. -- लिखाळ.

दत्ता काळे गुरुवार, 03/12/2009 - 17:53
दुसर्या कडव्यात " घरट्याच्या वरती एक साप अंडी खाण्याच्या मिषाने येतो, म्हणून पाखरे घरटी सोडून निघून जातात" - हे लक्षात घेऊन परत वाचा.

रामदास गुरुवार, 03/12/2009 - 19:14
कडवं मला समजलं नव्हतं .आता समजलं. कविता आवडल्या. बालकराम मोठे झालेले दिसतायंत.

प्रमोद देव गुरुवार, 03/12/2009 - 20:28
आहेत चारोळ्या. आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

प्राजु गुरुवार, 03/12/2009 - 20:47
५. रसशुष्क वाळली फांदी वाळीत टाकली कोणी ? डोळ्यात वाळव्यांच्या मगरीचे भावुक पाणी . . . . क्लास!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

क्रान्ति गुरुवार, 03/12/2009 - 22:26
छान आहेत झाडांच्या कविता. वेगळ्या आणि अर्थपूर्ण! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

धनंजय Fri, 03/13/2009 - 07:18
पुष्कळ अर्थ घट्ट विणलेली कडवी. (दुसर्‍या चारोळीतला साप मात्र फारच क्रिप्टिक झाला आहे.)