Skip to main content

वय

लेखक क्रान्ति यांनी बुधवार, 18/03/2009 या दिवशी प्रकाशित केले.
खास माझ्या लेकींसाठी लिहिलेली कविता. वय तुझे फुलण्याचे, वार्‍यासंगे बोलण्याचे इवल्याशा पंखांवर आसमंत पेलण्याचे आपल्याच सुरांमध्ये गात आपलीच गाणी आपल्याच रचनेच्या सौंदर्याला भाळण्याचे कधी खुळ्या वसंताचे, कधी दाहक ग्रीष्माचे आग पिऊन सूर्याची, चंद्रबिंब माळण्याचे वय तुझे भुलण्याचे, अधांतरी चालण्याचे मनाच्या धुंदीत नव्या तालावर डोलण्याचे तुझ्या वयासाठी नाही वाट जुनी रुळलेली, तुझे वय नव्या वाटा धुंडाळून चालण्याचे तुझी स्वप्ने जपताना ज्यांचे वय ओसरले, त्यांनी भाग्य दिले तुला हिरेमोती तोलण्याचे
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2392
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

सुंदर! अप्रतिम!
वय तुझे भुलण्याचे, अधांतरी चालण्याचे मनाच्या धुंदीत नव्या तालावर डोलण्याचे
क्रांतितै एकदम स्फुर्तीदायक काव्य!
तुझ्या वयासाठी नाही वाट जुनी रुळलेली, तुझे वय नव्या वाटा धुंडाळून चालण्याचे
वा वा!

In reply to by धनंजय

तुझ्या वयासाठी नाही वाट जुनी रुळलेली, तुझे वय नव्या वाटा धुंडाळून चालण्याचे हे फार आवडले; महत्त्वाचे वाटले. (सहमत)बेसनलाडू

एक अतिशय तरल कविता/गझल. कधी खुळ्या वसंताचे, कधी दाहक ग्रीष्माचे आग पिऊन सूर्याची, चंद्रबिंब माळण्याचे हा शेर या कवितेचा अत्युच्च बिंदू आहे. तुझ्या वयासाठी नाही वाट जुनी रुळलेली, तुझे वय नव्या वाटा धुंडाळून चालण्याचे अतिशय आशादायक, स्फूर्तीदायक आहे हा शेर. दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे.. हेच आठवलं आवांतर - बाय द वे लेक टिन एजर झाली का? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

आईने आपल्या तारुण्यात पदार्पण करणार्या लेकिस किती योग्य सल्ला दिलाय. माझ्या पिटूकलीसाठि जपून ठेवेन हि कविता.

तुझ्या वयासाठी नाही वाट जुनी रुळलेली, तुझे वय नव्या वाटा धुंडाळून चालण्याचे सह्ह्ह्ही... :) मदनबाण..... "If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

In reply to by मदनबाण

तुझ्या वयासाठी नाही वाट जुनी रुळलेली, तुझे वय नव्या वाटा धुंडाळून चालण्याचे सह्ही !! असेच म्हणतो !!! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

In reply to by अनिल हटेला

तुझ्या वयासाठी नाही वाट जुनी रुळलेली, तुझे वय नव्या वाटा धुंडाळून चालण्याचे सह्हीच! :)

खुपच छान.

इतक्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

तुझ्या वयासाठी नाही वाट जुनी रुळलेली, तुझे वय नव्या वाटा धुंडाळून चालण्याचे खुप छान