Skip to main content

(डास)

लेखक बेसनलाडू यांनी बुधवार, 01/04/2009 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
या तनुचा माझ्या करशी दररोजचा घास तुझा डोंबिवली वा धारावी, घरभर हा वास तुझा तू जळी अन् तू नाली, इवलासा श्वास तुझा ए.सी.च्या खालीसुद्धा रंगतो तो रास तुझा मॉर्टीन असो वा कछवा, धसका जीवास तुझा गुणगुणता कानी करती सगळे दुस्वास तुझा नाना रुपे बळावे अवतार तो, भास तुझा डेंग्यू अन् मलेरियाचा आजारी खास तुझा तारशील भवसागरी? मागे घे डास तुझा झोपु दे जरासे रात्री, प्रभु मी रे दास तुझा प्रेरणा: क्रान्ति ताईंचा दास

वाचने 4718
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

जोरदार आगमन!!! लगे रहो!! आवांतर : (डासांच्या त्रासाच्या वेदनेतून काव्य प्रसवलं असावं हे..) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मी `दासा`चे रसग्रहण केले. =D> आता या `डासा`चे मी काय रसग्रहण करणार. कारण डासच `रस` ग्रहण करतात ना! :)) मीनल.

बेलाशेठ आज काम नाही वाटतं? विकांतासाठी थोडा वेळ ठेवा...

काय मस्त धम्माल विडम्बन! अगदी झकास. =)) =)) =)) =)) क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

एकदम मजेशीर विडंबन !! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

काय पण ते डासांचे महाभाग्य म्हणावे.. बेलाच्या विडंबनात प्रभुचे स्थान मिळावे.. डासांच्या दुनियेत हे महाकाव्य ठरावे.. विडंबनाचे डास तुम्हास असेच चावत रहावे.. आपला मराठमोळा ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

मस्तच! अदिती आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

हे हे हे... झक्कास्स्स्स्स्... :) मदनबाण..... मूलभूत राजकीय पक्ष दोनच- सत्ताधारी, सत्ताकांक्षी जालावरुन सभार...

बेला , विडंबन झकास ! :) मनातल्या मनात : आम्ही नमोगतींच्याही उत्तम लेखनाला मनापासून दाद देतो.