मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बिंदू

मनीषा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
क्षणात फुलतं ओठांवर एक कुत्सित हास्य .... आणि उगारले जातात विखारी शब्दांचे भाले रोखून पाहणार्‍या डोळ्यांमधे दिसते अघोरी चमक एक असहाय्य सावज कोंडीत पकडल्याच्या उन्मादाने लखलखणारी स्वतःचं 'मी' पण सुखाउन शांत झालेलं त्यांचं मन मश्गुल होतं .....यशाच्या धुंदीत ------- आणि माझ्या मनात उमलत असतो ..रसरसलेला एक बिंदू .... तिरस्काराचा ! या आत्ममग्नांच्या कळपात राहूनही मनावर तरंगत असते एकच जाणीव " मला जायलाच हवं .." कुठे? -- कसं? काहीच माहिती नसतं पण ... जाणं -- जरुरी असतं हा उंबरठा ओलांडल्या शिवाय तिरस्काराचा तो 'बिंदू' पुसला जाणं अवघड असतं म्हणून जीवाच्या कराराने पाउल उचलते .. बंद असलेल्या दारावर हात ठेवते .. आणि लक्षात येतं .... दरवाजा बंद नाहीये ! इतका वेळ उगीचच त्याच्या भितीने अडकून राहिले मी इथे --- मनावर साचलेली जळमटे क्षणात झटकली जातात आणि बघता बघता तिरस्काराचा तो बिंदू दिसेनासा होतो ... चैतन्याच्या तेजस्वी प्रवाहात |

वाचने 2165 वाचनखूण प्रतिक्रिया 12

अनंता 12/05/2009 - 09:05
छान आशय!! मी सुद्धा अशा अनुभवातून गेलोय!!

राघव 12/05/2009 - 09:40
अर्थपूर्ण, आशयघन कविता! येऊ द्यात अजून. शुभेच्छा! राघव

In reply to by राघव

मराठमोळा 12/05/2009 - 19:53
सहमत आहे, :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

In reply to by राघव

विसोबा खेचर 13/05/2009 - 14:05
अर्थपूर्ण, आशयघन कविता! येऊ द्यात अजून. शुभेच्छा! हेच बोल्तो... तात्या.

सँडी 12/05/2009 - 09:54
वा वा! क्या बात है! मस्तच! -संदीप. काय'द्याच बोला.

In reply to by जागु

सायली पानसे 12/05/2009 - 11:01
सहमत. आशय छान आहे कवितेचा. पुलेशु.

परिकथेतील राजकुमार 12/05/2009 - 11:13
क्षणात फुलतं ओठांवर एक कुत्सित हास्य .... आणि उगारले जातात विखारी शब्दांचे भाले रोखून पाहणार्‍या डोळ्यांमधे दिसते अघोरी चमक एक असहाय्य सावज कोंडीत पकडल्याच्या उन्मादाने लखलखणारी हे वर्णन वाचले आणी मला एकदम जुन्या काळातील खलनायीका बिंदु आठवली. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

मनीषा 13/05/2009 - 13:02
माझं लेखन अगदीच अनाकलनीय नाहीये तर ...

क्रान्ति 12/05/2009 - 19:57
पराच्या प्रतिक्रियेशी सहमत. कविता मस्त्च. क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** http://www.agnisakha.blogspot.com

दत्ता काळे 13/05/2009 - 13:22
"आत्ममग्नांचा कळप" - हि शब्दसंकल्पना फार आवडली.