Skip to main content

प्रकटन

पत्रांमधुनी

लेखक क्रान्ति यांनी शनिवार, 30/05/2009 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
असेच भेटत राहू आता पत्रांमधुनी सुखदु:खाच्या सांगत गाथा पत्रांमधुनी "फुले मिळाली?" विचारले, अन् पुढे म्हणालिस, "फुलांसवे जर गंधहि जाता पत्रांमधुनी!" वळवाची सर जशी झरावी तसे भेटलो जालावरती येता जाता पत्रांमधुनी खुळ्यासारखे रुसवे-फुगवे, भांडण-तंटे, नको उगाळू त्या कटु वार्ता पत्रांमधुनी मनावेगळ्या मनात जपलेले क्षण हळवे कधी फिरुन येतिल का हाता पत्रांमधुनी? हळूच भिजल्या पापण्यांतला चंद्र हासला, पुन्हा तुझे प्रतिबिंब पहाता पत्रांमधुनी तुला वाचले, तुला जाणले, भरुन पावले! चित्र नको, तू ये ना आता पत्रांमधुनी! अवांतर :-या गझलचं सगळं श्रेय चुचुताईला!

नाती गोती-२

लेखक विनायक प्रभू यांनी शनिवार, 30/05/2009 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
Never underestimate spirited women ह्या उक्तीवर माझा संपुर्ण विश्वास आहे. दोन दिवसांनी आई आपल्या मुलीला घेउन घरी आली. ह्यावेळी कधी नव्हे ती बायको पण उपस्थित राहीली. मुलगी आईला उजवी ठरेल दिसायला अशी होती. '"तुला सी.ई.टी त किती मार्क मिळतील असे वाटते " मी विचारले " साधारण १६५ पर्यंत पडतील." मुलगी "तु ओपन मधे बसतेस का?"मी "हो" मुलगी "मग मुंबई मधे मीळणे जरा कठीणच आहे. प्रायवेट सी.ई.टी चे काय? त्यात काय वाटते? तिथे तरी १७०+ मिळतील का? " हो, सर. ह्या वेळेला स्टेट सी.ई.टी मधे फीजीक्स चा पेपर जरा कठीण होता. पण प्रायवेट मधे मिळतील्."-मुलगी "किंवा दुसरा एक उपाय आहे.

क्रांती.....

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 30/05/2009 08:37 या दिवशी प्रकाशित केले.
आपणच जेव्हां दगड बनतो तेव्हां कोणीहि उपटसुंभा क्रांतिसूर्य होतो आणि भिरकावतो आपल्याला कोणाच्या तरी घरावर सार्वजनिक मालमत्तेवर कारण त्याला वाटत असते विध्वांस म्हणजेच क्रांती...! पण दगडालाच पंख फुटले अन घेतली झेप त्याने स्वबळावर मोकळ्या आकाशात कुठल्याश्या हिरव्या गार फांदीवर बसला गात....
Taxonomy upgrade extras

नाती गोती-१

लेखक विनायक प्रभू यांनी शनिवार, 30/05/2009 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
परत चालेलेल्या लाटेवर पायाखालची वाळु सरकतानाचा अनुभव घेताना अचानक अवलियाने प्रश्न विचारला, "मास्तर, सर्वात आवडते पुस्तक कोणते?" "अर्थात महाभारत"- मी "का"?- अवलिया मी विचारात पडलो आता उत्तर काय द्यावे. "नंतर सांगा विचार करुन" अवलिया कारने घाटकोपर ओलांडल्यावर परत तोच प्रश्न. "मानवी मनाची आणि नात्यागोत्याची गुंतागुंत इतर कुठेही सापडणार नाही"- मी "तुम्हाला पटते का बघा, आपण सर्व जण आपल्या आयुष्यात महाभारताचा कुठला ना कुठला अंश जगतोच्-अवलिया _______________________________________________________ हातातली मिठाईची पेटी बायकोच्या हातात दिली.

आली पन्नाशी!

लेखक बहुगुणी यांनी शुक्रवार, 29/05/2009 23:41 या दिवशी प्रकाशित केले.
वडा-सांबार खावं, नाहीतर छोले-पुरी चमचमीत सारं शेवटी येणार घशाशी! तरूणांची मजा आहे, येऊन आमच्या घरी, नावालाच यजमान, पण आम्ही आपले उपाशी आली पन्नाशी! पोट आड येतंय, म्हंटलं खुर्ची मागे सरकवावी जराशी जमतंय असं वाटलं पण टेबल पडलं तोंडघशी! आली पन्नाशी! 'सकाळी जावं पळायला, अजून झालं नाही वय' 'जलद चालणं' बरं वाटलं, पहिल्याच दिवशी 'आधिक ताण बरा नव्हे, हळू-हळू होईल सवय' कुणाला माहीत इथे, व्यायाम खातात कशाशी आली पन्नाशी! 'ट्रेकींगला निघालाय?
Taxonomy upgrade extras

अण्णामामा.

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 29/05/2009 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
३० मे २००८. मी ऑफिसला निघण्याची तयारी करत होतो. सकाळी सकाळी फोनची रिंग वाजली, नंबरात ९१ आकडा दिसत होता म्हणजे भारतातून फोन होता. शुक्रवारी सकाळी फोन? जरा चमत्कारिक वाटलं. "दादा, अण्णामामा गेला!" पलीकडून बहीण बोलत होती. "आं...कधी? कसा काय?" "आजच. मल्टिपल ऑर्गन फेल्युअर! हा फोन झाल्यावर आईला लग्गेच फोन कर. तिला खूप टेन्शन आलंय!" तिचा आवाज कापत होता. ऐकत होतो. शेजारच्या खुर्चीत खचलो. हार्ट ऍटॅक नंतर हॉस्पिटलमधे भरती केल्यावर एकेक सिस्टिम फेल होत गेली आणि शेवटी गेला. मुलगा स्वतःच डॉक्टर त्यामुळे काळजी घेण्याची परिसीमा असणार हे उघड होतं. अमेरिकेतून मुलगीही आलेली होती.

आठवणींचा पाऊस

लेखक अनामिक यांनी बुधवार, 27/05/2009 09:32 या दिवशी प्रकाशित केले.
बाविसाव्या मजल्यावरच्या माझ्या ऑफिसातून आज बाहेर बघताना खूप काळे ढग जमलेले दिसताहेत. तसं ऍटलांटामधलं वेदर फारच अनिश्चित असतं, आणि एवढ्यात तर ऊन आणि पाऊस अगदी पाठशिवणीचा खेळ खेळताहेत. पण आज न जाणो का खिडकीतून बाहेर जमलेले ढग बघताना मनातही आठवणींचे ढग जमून आले... खूप नॉस्टॅल्जीक वाटायला लागलं आणि मन कधी भूतकाळात गेलं ते कळलंच नाही. (भारतातही आता पावसाचं लवकरच आगमन होईल. वादळी पावसाने तर विदर्भात आधीच आपली वर्दी लावली आहे.) मे महिन्याचा शेवट झाला आणि जूनच्या सुरवातीला मृग नक्षत्राच्या आसपास पावसाची चाहूल लागली की घरोघरी एकच प्रकार सुरू असतो ..