आत्माराम की जय
रामराम मंड्ळी,
हिंदु धर्माच्या मान्य तेनुसार "आत्मा" अमर असतो. प्रत्येक आत्मा एका देहाच्या मृत्युनंतर दुसर्या देहात प्रवेश करतो.. योनी कुठली का असेना. पण आत्म्याला मरण नाही.. भक्तीमार्गाने मोक्ष (?) किंवा जन्म-मरणाच्या फेर्यातुन सुटका होते.
गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात : नैनं छिन्द्न्ती शस्राणि | नैनं दहति पावकः ||
हे तत्वज्ञान जेव्हा सांगितले गेले तेव्हा जगाची (सर्व सजीव धरुन) लोकसंख्या आणि आत्ताची लोकसंख्या यांचा काही मेळ लागतो का?
ह्या तत्वज्ञानाप्रमाणे आत्म्याला जनन-मरण नसेल तर आत्तापर्यंत हजारो वर्षात करोडो आत्मे मोक्षास प्राप्त होऊन पृथ्वीवरील सजीव सॄष्टीचा नाश व्हावयास हवा होता, इथे तर दिवसें दिवस लोकसंख्या वाढत आहे. मग हे आत्मे कुठुन आले? मेल्यानंतर आत्मा कुठे जातो, त्याला दुसर्या शरीरात जायला रस्ता कोण दाखवतो? बहुतेक सजीवात प्रजोप्तदानाची १ ली पायरी अंड्यात असते, जीव आकाराला येईपर्यंत आत्मा कुठे असतो?
माणुसप्राण्यात डोहाळे लागतात, इतर सजीवात काय होत असेल.. वाघीणीने बदल म्हणुन गवत खाल्ल्याचे माहीतीत नाही, मग माणसालाच का हे?
सुष्ट-दुष्ट, चांगले-वाईट असा भेदाभेद मान्य केला, तर चांगले काम करणारा देह पुण्यवान की आत्मा? वाईट कामाची शिक्षा देहाला का भोगायला लागते, तिथे आत्म्याला थेट शिक्षा का नाही होत? का हे देवाच्या अखत्यारीत नाही, मग वाईट माणुस (हे परत साक्षेपी, राज ठाकरे मराठी माणसाला चांगला, पण उत्तर-भारतीयांना वाईट) मेला की नरकवासी का नाही म्हणायचे, तिथे स्वर्गीय, कैलासवासी का म्हणतात?
च्यामारी... प्रश्न काही संपत नाहीत, हे टंकित कोण करतोय, मी कि माझा आत्मा? मग बुध्दीचे स्थान काय?
#:S #:S #:S दमलो बुवा..
जाणकारांनी लक्ष घालावे..
याद्या
3527
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
मग हे
<<<<<<< त्याला
In reply to मग हे by विसोबा खेचर
एखाद्या
In reply to मग हे by विसोबा खेचर
चुकीचा
In reply to एखाद्या by दशानन
मालक,
In reply to मग हे by विसोबा खेचर
नुकतेच
चला आवरून
In reply to नुकतेच by पाषाणभेद
बा हर्षदा...
धन्यवाद मित्रा,
In reply to बा हर्षदा... by धमाल मुलगा
शाबास!
In reply to धन्यवाद मित्रा, by हर्षद आनंदी
हॅहॅहॅ ...
In reply to शाबास! by धमाल मुलगा
टार्या तु