मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आम्ही देवाच्या दयेने सुखरूप आहोत

सुधीर काळे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
"Image removed. मिपा"वरील सभासद मित्रांनो, हा लेख असा इथे लिहिणे कायद्यात बसत असेल अशी आशा करतो. एक-एक करत खूप जणांनी खूप आस्थेने माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या सुरक्षित असल्याबद्दलची चौकशी केली व त्याने मी भारवून गेलो आहे. प्रत्येकाला आतापर्यंत वैयक्तिक उत्तरेही पाठविली, पण शेवटी असं जाहीररीत्या कळवायचं ठरविलं! हा धरणीकंप सुमात्रा बेटाच्या पश्चिमेला "पाडांग"जवळ झाला. रिश्टर स्केलवर ७.९ म्हणजे चांगलाच मोठा होता. जीवित-वित्तहानी खूपच झालेली दिसतेय. सुरुवातीला ७५ माणसांच्या मृत्यूचा अंदाज होता, पण अजून बर्‍याच इमारतीखाली गाडली गेलेली माणसे, गाड्या वगैरे काढणे चालूच आहे व आताच आलेल्या आकड्यानुसार २५० लोकांचे मृतदेह मिळाले असून हा आकडा वाढतोच आहे!) याच पश्चिम सुमात्रा बेटाच्या उत्तरेच्या बाजूला "बंदा आचे"जवळ ("Aceh" चा उच्चार "आचे" असा करतात इथल्या भाषेत!) झालेल्या धरणीकंपानेच जीवघेण्या त्सुनामीला जन्म दिला होता. त्यात दोन अडीच लाख लोक दगावले होते. पण यावेळी सुदैवाने त्सुनामी झाली नाही. पण यावेळी जकार्ताला कांहीं जाणवले नाहीं. खरं तर आम्हालाही या धरणीकंपाबद्दल इथल्या दूरचित्रवाणीवरूनच कळलं. आपण सगळ्यांनी इतक्या आस्थेने चौकशी केलीत याबद्दल मनापासून आभार! खरंच मिपावर अशी आस्थेने वागणारी मंडळी खूप आहेत हेही या फोरमचे मोठे यश म्हणायला हवे! व याचे श्रेय सभासदांना, संपादकमंडळाच्या अधिकार्‍यांनी घडविलेल्या या फोरमच्या "स्वभावा"ला व आपणा सर्व मराठी बंधू-भगिनींच्या प्रेमळ स्वभावालाच आहे. वर जावा-सुमात्राच्या नकाशावर पाडांग, बंदा आचे व जकार्ता दाखवली आहेत. (पाडांगभोवती वर्तुळ काढलेले नाहीं, पण सुमात्राच्या पश्चिमेला असलेले हे शहर आपल्याला सहज सापडेल. (हा नकाशा माझ्या दुसर्‍या एका लेखासाठी बनविला होता त्यामुळे बरीच वर्तुळे "नको तिथे" काढली आहेत असे आपल्याला वाटेल म्हणून मुद्दाम लिहितोय!) पुनश्च सर्वांचे आपल्या प्रेमाबद्दल आभार! सुधीर

वाचन 7106 प्रतिक्रिया 0