मराठी असे अमुची मायबोली | जरी तिची आम्हास पर्वा नसे ||
अस मला आजकाल म्हणावसं वाटत आहे. आता तुम्ही विचारलं की का बुआ, असं विशेष काय झालं. नाही म्हणजे प्रत्येक वेळी काहीतरी मनापासून वाटायला काहीतरी घडावाच लागतं असं आहे का ? असो. तसं आहे खरं. आता बघा, मी राहतो पुण्यात. कामानिमित्त. तसा मी मुळचा मुंबईचा, पण पुणं तसं मला नवीन कधीच नव्हतं. बरेच नातेवाईक राहतात माझे इथे. लहानपणापासून येतोय मी इथे. आवडतं ही मला पुणं.
विद्येच माहेरघर म्हणतात ह्याला. एकेकाळी इकडच्या सर्व शाळांना आपापला माज होता. एक गर्व, आता तो दुराभिमान कि अभिमान ह्या वादात मी आत्ता जात नाही. पण हा गर्व आज मला कुठे दिसत नाही.
मिसळपाव
