Skip to main content

प्रकटन

पाकिस्तानी शस्त्रागारांतून नाहींशी झालेली तीस लाख शस्त्रें आपल्यावर रोखली जाणार?!

लेखक सुधीर काळे यांनी मंगळवार, 19/10/2010 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
वरील फोटो 'डॉन' वृत्तपत्रातील असून तो 'AFP'ने 'डॉन'ला पुरवला आहे. पाकिस्तानी तालीबान आणि इतर दहशतवाद्यांबद्दल सहानुभूती असणारे व त्यांच्या कुकर्मात सक्रीय असलेले लोक पोलीस व सैन्यासारख्या सुरक्षादलात आहेत हाच या जवळिकीचा अर्थ आहे. ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- संध्याकाळी घरी जायला गाडीत बसलो कीं सेलफोनवर मी 'डॉन' हे क

झोप.

लेखक मराठमोळा यांनी सोमवार, 18/10/2010 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो/मैत्रिणींनो, झोप. निसर्गाने सर्व प्राण्यांना दिलेलं एक वरदानच म्हणता येईल. झोप घेण्याने थकवा आणि शरिराची झीज भरुन येते. झोप किती तासांची असावी, कधी झोपावे कधी उठावे याबाबत बरेचसे युक्तीवादपण होत असतात. पण या झोपेचे खरं तर एक रहस्यच आहे. झोपेत माणुस कसा असतो हे त्याला कधीच कळत नाही. खरं तर झोप म्हणजे मेल्यानंतर जी अवस्था होत असावी तीच असं माझं मत आहे. असो, तर या झोपेचेही व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणीप्रमाणे प्रकार आहेत. यावरुन गमतीजमतीही बर्‍याच होताना दिसतात. दिवसा झोपणे आणि रात्री झोप न येणे आणि दुसर्‍या दिवशे ऑफिसात झोप येणे हा एक जगभर पहायला मिळणारा प्रकार आहे.

आमचे तंत्रज्ञान प्रेम - सॉफ्टवेअर विभाग

लेखक शानबा५१२ यांनी सोमवार, 18/10/2010 01:06 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार्,नमस्कार...... तंत्रज्ञान म्हणजे एक मित्र जो आपल्याकडुन कसलीच अपेक्षा न ठेवता आपल्याला आनंद देत राहतो.आपण दु:खी असु ,नाराज असु तरी तो स्वःता आपले कार्य अविरतपणे पार पाडतो,आपल्या निराश मनाला दीलासा देत,थंड फुंकर मारत.(बस,बस झाल!!) असो, तर आज आम्ही(?) आमचे तंत्रज्ञानावर असणारे प्रेम 'सॉफ्टवेअर' ह्या त्याच तंत्रज्ञानाचा भाग असणा-या संकल्पनेतुन दाखवु ईच्छीत आहोत.'सॉफ्टवेअर्स' जी आमच्या मनावर राज्य करतात्,त्यांची महीमा(?) गाणार आहोत. नोंद :१) आमचे संगणक्,हार्डवेअर व सॉफ्टवेअर ह्याबाबतचे ज्ञान म्हणजे बालवाडीतल्या पोराला जेवढे 'न्युटन्स थेअरी ऑफ रीलेटीव्हीटी' मधले समजते,तेवढेच असल्याने खाल

पांढरीशुभ्र माणुसकी !!

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 16/10/2010 09:26 या दिवशी प्रकाशित केले.
भर दुपारची, रणरणत्या उन्हाची वेळ! हायवेवर गाड्यांची तुरळक ये-जा सुरू होती. एक आलिशान मोटार भरधाव वेगात रस्त्यावरून पुढे आली आणि क्षणभरासाठी तिची गती मंदावली. रस्त्याकडेला थांबली. मागचा दरवाजा किलकिला उघडला. काहीतरी पांढरंशुभ्र बाजूच्या खड्ड्यात भिरकावलं गेलं. गाडीनं पुन्हा वेग घेतला आणि पुढच्या क्षणाला ती दिसेनाशीही झाली. ... रस्त्याकडेच्या त्या खड्ड्यातून वेदनांनी कळवळणारे आवाज येत होते. खूप मागून, एक जुनाट मोटार जिवाच्या करारावर रस्ता कापत चालत होती. खड्ड्याजवळ येताच, ती मोटार थांबली. मागच्या सीटवरून एक मध्यमवयीन स्त्री बाहेर आली. कळवळण्याचा आवाज आता मंद झाला होता.

अभिनंदन...

लेखक अवलिया यांनी शुक्रवार, 15/10/2010 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
होईल की नाही, झाले तर कसे होईल, कुणी भाग घेईल की नाही आणि अशाच अनेक वादांच्या भोवर्‍यात सापडलेली १९वी राष्ट्रकुल स्पर्धा एकदाची पार पडली. केवळ पारच पडली नाही तर भव्य दिव्य स्वागत आणि सांगता समारोह, भारतीय स्पर्धकांची उत्कृष्ट कामगिरी आणि इतर अनेक भुषणास्पद गोष्टींमुळे ही स्पर्धा कायम स्मरणात राहिल. सर्व स्पर्धकांचे, आयोजकांचे, भारताचे आणि पर्यायाने आपल्या सर्वांचे अभिनंदन ! भारताचा तिरंगा असाच दिमाखात फडकत राहो ही सदिच्छा !! जय हिंद !!