Skip to main content

ए४ आकाराची कहाणी

लेखक नरेंद्र गोळे यांनी सोमवार, 21/12/2009 07:26 या दिवशी प्रकाशित केले.
ए४ आकाराचा कागद आपल्या साऱ्यांच्याच जीवनाचा अविभाज्य घटक झालेला आहे. हा आयाताकृती, उभट कागद २९७ x २१० मिलीमीटर आकाराचा असतो. पण तसा तो का असतो? याचा आपण कधीच विचार करत नाही. एवढ्या अडनेडी आकारास इतक्या विस्तृत प्रमाणात स्वीकृती कशी काय लाभलेली आहे? त्याचा इंचातल्या जुन्या मापनपद्धतीशी काही अर्थाअर्थी संबंध आहे काय? थोडक्यात म्हणजे या ए४ आकाराचा जन्म कसा झाला असावा? हा प्रश्न भल्या भल्यांची उत्सुकता चाळवू शकतो. मला कळलेल्या, ए४ आकाराच्या कागदाची कहाणी मी इथे सांगणार आहे. उभट आकार वाचण्यास सोपा असतो. म्हणूनच वर्तमान पत्रांतही स्तंभलेखनच लोकप्रिय होते.

तुमच्या गावाचे नाव काय?

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 17/12/2009 06:08 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही खेडेगावात राहत असाल, शहरी असाल. तुम्ही राहता त्या गावाचे नाव घ्या, किंवा तुम्हाला माहित असलेल्या कोणत्याही गावाचे (किंवा गावांची नावे) नाव घ्या. त्या गावांची नावे कशी पडली असतील असा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय? तुम्ही त्यावर विचार करून ते नाव का ठेवलेय असा कधी विचार केलाय? नक्कीच केला असणार. मी तर बुवा गावाचे नाव कसे पडले असेल त्याचा विचार करतो. उदाहरणच द्यायचे झाले तर: पिंपळगाव. गावात (पुर्वी) पिंपळाची झाडे जास्त. वडगाव : गावात (पुर्वी) वडाची झाडे जास्त होती. (आता कसली झाडे जास्त?) हे झाले आपले सरळसोट नावे असलेली गावे. पण काही गावांची नावे इरसाल असतात.

फोटोगॅलरी: मुळशी-ताम्हिणीत लपलेला स्वर्गीय तलाव

लेखक भटकंती अनलिमिटेड यांनी गुरुवार, 17/12/2009 00:35 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यात राहण्याचा अजून एक फायदा म्हणजे मुळशी धरण आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर. कितीही वेळा या परिसरात फिरलो असलो तरी प्रत्येक वेळी गेल्यावर काही तरी नवीन गवसल्याचा आनंद मिळाला आहे. म्हणूनच कुठेच ट्रेकचा प्लॅन नसतो तेव्हा मी वीकेंडला मुळशीमध्ये सापडतो. मुळशीमध्येच ताम्हिणी घाटाच्या आधी (प्लस व्हॅलीच्या आधी) एक सुंदर, अनटच्ड तलाव आहे, जो बऱ्याच तथाकथित भटक्यांना माहीत नाही. तो तलाव, दरी, असंख्य पक्षी, डोंगर, लहानसे खेडेगाव, शाळेत जाणारी मुले, बकऱ्या-गुरे चारणारे लोक असे काही भन्नाट फोटो मिळतात की विचारूच नका. या संधीसाठी मी गेल्या १५ दिवसांत तीन वेळा गेलो आहे.

भिगवणचे परदेशी पाहुणे

लेखक भटकंती अनलिमिटेड यांनी मंगळवार, 15/12/2009 23:41 या दिवशी प्रकाशित केले.
मागल्या आठवड्यात खबर लागली की पुण्यापासून १०० किलोमीटरवर असणाऱ्या भिगवणला नवीन पाहुणे आलेत: रोहित पक्षी म्हणजे फ्लेमिंगो ऊर्फ अग्निपंख. मग काय केले दोन लोक तयार आणि गेलो डायरेक्ट तिकडे. पण काही कारण नसताना ट्राफिक जाम लागले पुणे-सोलापूर रोडवर आणि १०० किमी अंतर कापायला चार तास लागले. पहाटे पाच वाजता निघालो होतो, पण साडेनऊला पोचलो तिथे. काही बरे फोटो मिळाले. त्यातलेच दोन मिपासाठी.
सर्व हक्क सुरक्षित.

२ रुपये? छे हे तर तत्त्वासाठी....

लेखक स्वानन्द यांनी शुक्रवार, 11/12/2009 00:57 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रहो, आपण डोंबिवली फास्ट पाहिला आहे का हो? अर्थात, आवर्जून मराठी संकेत्स्थळावर येणा-या, मनसोक्त लेखन करणार्‍या आणि तेवढीच उत्साहाने प्रतिक्रियांचा पाऑस पाडणार्‍या बहुतेक मिपाकरांनी पाहिला असावा असं ग्रुहीत धरतो. तर वरील प्रश्न विचारायचे कारण म्हणजे, त्यात दाखवलेला थंड पेयाच्या किमतीवरून झालेला प्रसंग माझ्या बाबतीत कालच घडला. हपिसात एका कठीण समस्येवर काम करत होतो. बराच वेळ डोकं घुसवून सुद्धा काही उत्तर मिळत नव्हतं. म्हणून मग जरा ताजतवानं व्हावं या विचाराने एकटाच बाहेर पडलो. कंपनीच्या गेट च्या बाहेर पडलो. जवळच दोन तीन टपर्‍या आहेत. एका टपरीतून वडापाव घेतला.

एअर ट्रॅफिक कंट्रोल

लेखक अजय भागवत यांनी मंगळवार, 08/12/2009 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
तीनेक वर्षांपुर्वी एअर ट्रॅफिक कंट्रोल ह्या सिस्टीमच्या एका छोट्या भागाचा अभ्यास करण्याचा योग आला होता. त्यावेळी जवळ-जवळ हजार पानांइतके स्पेक वाचायची, त्या गंजीतून सुई शोधून काढायची कामगिरी टाकण्यात आली होती. येथे मी लिहिणार आहे ते त्यातील काही मनोरंजक गोष्टींबद्दल, ज्या आपल्या सर्व-सामान्यांच्या आयुष्यात अनेकदा कळत-नकळत प्रवेश करतात. किंबहूना मी असे म्हणेन की, ह्यांच्या शिवाय आपण विमानप्रवास सुखरुप करुच शकणार नाही व विमानप्रवास जरी केला नसेल तर आजपर्यंत आपल्या डोक्यावर भरकटून (सहजा-सहजी) एखादे विमान का आदळत नाही हे समजायला ही माहिती उपयोगी ठरावी.

गूगलचे लिप्यंतर (Google Transliteration)

लेखक राहूल यांनी रविवार, 06/12/2009 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
माझा एक फ्रेंच मित्र आहे - जिरोम म्हणून. त्याच्या कॉम्प्युटरला मी शक्यतो हात लावत नाही. कारण त्याच्या laptop मध्ये अथपासून इतिपर्यंत सर्वकाही फ्रेंच भाषेत आहे; आणि अस्मादिकांना फ्रेंच मधल्या bonjour व merci च्या पलीकडे ओ कि ठो कळत नाही. जिरोमची हि तऱ्हा; तर चिनी मित्राच्या कॉम्प्युटरकडे बघायला सुद्धा नको. फ्रेंच भाषा कळली नाही तरी निदान लिपी इंग्रजीसारखी आहे. चिनी भाषेची अगम्य गिचमिड पाहून आपण निरक्षर असल्याचा भास मला होतो.