Skip to main content

आजीची भातुकली

लेखक सुनिल पाटकर यांनी मंगळवार, 23/03/2010 21:59 या दिवशी प्रकाशित केले.
भातुकली...आजच्या इंग्रजी माध्यमात ,संगणक युगात वावरणा-या मुलांना हा शब्द माहितही नसेल .परंतु एकेकाळी या शब्दाभोवती लहान मुलांचे भावविश्व गुंफलेले होते.एकत्रित जमण्याचे मैत्री वाढविण्याचे संकेत भातुकलीचा हा खेळ मुलांना द्यायचा.काळनुसार खेळही बदलले.जुन्या पिढीचे ते खेळ ,भातुकलीतील ती चिमुकली भांडी , १०० वर्षांपूर्वी वापरात असणा‍र्‍या त्या वस्तू..आपल्याला आजही पहावयास मिळतात. पुणे येथिल विलास करंदीकर यांनी २० वर्षांपासून अशा वस्तू जमवल्या आहेत.

२१ मार्च - जागतिक कवी दिनानिमित्त - महाराष्ट्र टाईम्सच्या "शब्दांचीच रत्ने" या अग्रलेखामधून संपादित.

लेखक Manish Mohile यांनी मंगळवार, 23/03/2010 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
अहमदाबादला आल्यापासून म्हणजे गेली जवळ जवळ १४ वर्षे मराठी वर्तमानपत्राशी संपर्क नाहीच म्हटले तरी चालेल. अधून मधून जेव्हा डोम्बिवलीला आई वडिलांकडे जातो तेव्हा महाराष्ट्र टाईम्स वाचतो तेवढाच. आई मात्र जर काही वाचण्यासारखं असेल तर हमखास कात्रण ठेवते किंवा नोंद करून आणते. तसच या वेळेस तिने आणली नोंद "शब्दांचीच रत्ने" या महाराष्ट्र टाईम्स च्या अग्रलेखाच्या संपादित भागाची. तोच संपादित भाग खाली देत आहे. जगभरच्या लाखो प्रसिद्ध व अप्रसिद्ध कवींसाठी 'युनेस्को' ने २१ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय कविता दिन म्हणून साजरा करण्याचा उपक्रम सुरू केला.

उन्हाळ्याची तयारी

लेखक अरुंधती यांनी सोमवार, 22/03/2010 22:23 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाळा आला की आमची दरवर्षीप्रमाणे 'उन्हाळ्याची बेगमी' सुरु होते. म्हणजे सर्व जाडजूड पांघरुणे, दुलया ह्यांना माळा दाखवायचा आणि त्या जागी डोळ्यांना शांत करणार्‍या रंगांच्या स्वच्छ सुती, तलम चादरी, पडदे वगैरे लावायचे. कूलरची साफसफाई करून ठेवायची! ठुमकत ठुमकत कुंभारवाड्यातून चांगल्यापैकी माठ आणायचा आणि त्याला दोन तीन दिवस आधी पाण्यात, मग उन्हात असे आलटून पालटून ठेवायचे.... त्याला तिपाईवर ठेवून त्यात पाणी भरायचे, वाळ्याची जुडी घालायची, ओले फडके बाहेरून गुंडाळायचे आणि थंडगार पाण्याच्या चवदार आस्वादाला सज्ज व्हायचे!

अमृत महोत्सवासाठी काढण्यात आलेले भित्तिचित्र...

लेखक डावखुरा यांनी सोमवार, 22/03/2010 21:49 या दिवशी प्रकाशित केले.
सर जमशेटजी जीजीभाई उपयोजित कला महाविद्यालय्, किल्ला[फोर्ट], दा.नौ.मार्ग, मुम्बई.४००००१.

सावध ऐका (मागल्या) हाका!

लेखक भोचक यांनी सोमवार, 22/03/2010 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
पदार्थाची चव लिहून सांगता येत नाही, तो अनुभवाचा भाग आहे, तद्वतः इंदूरी हाकांचे विश्व हा खास अनुभवाचाच भाग आहे. आता लेखाची सुरवातच खाद्यपदार्थाच्या शब्दाने व्हावी हा खास इंदुरी असल्याचा अपरिहार्य नि अटळ परिणाम आहे. पण तो अट्टल खवय्या असल्याची साक्षही आहे. इंदुरात आल्यावरही इथल्या हाकांमध्ये भिजले नाहीत नि त्या हाका तुमच्या जिभेत भिजल्या नाहीत, तर तुम्ही 'इंदौरकर' कधीच होऊ शकणार नाही. इथल्या भय्याचा उच्चार तुम्ही कोणत्या वेळी, कोणासमोर नि कसा करता यावरही तुम्ही इंदौरी आहात की नाही हे ठरते.

घारापुरी

लेखक प्रशु यांनी शनिवार, 20/03/2010 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
गो नी दांचे 'कादंबरीमय शिवकाल' वाचत होतो. त्यात 'दर्या भवानी ' मध्ये उल्लेख आला 'घारापुरी' ... द्वारकापुरी, शुर्पारक, घारापुरी, दाल्भ्य्पुरी ह्या प्राचीन सागर प्रवास मार्गातील एक... 'घारापुरी' ... मुंबईच्या इतके जवळ असुन हे ठीकाण पाहिला नाही ह्याची खंत वाटली आणि गोनींच्या शिल्प वर्णनांनी कुतुहल देखील चाळावले. लगेचच लोकसत्ते 'सीटी वाक' च्या विनायक परबांच्या घारापुरी बद्द्ल लेख वाचला आणी ठरवले घारापुरी दर्शन करायचेच. प्र. के घाणेकरांचे 'इये महाराष्ट्र देशी' मधुन 'घारापुरीची माहिती मिळाली. मिपाकर स्वानंद ला बरोबर घेतले आणी निघालो घारापुरी बघायला.

आमची काही चित्रे

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 20/03/2010 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आम्ही मिपावर नविनच आहोत, आम्ही प्रसवत असलेली चित्रे आणी काही लिखाण इथे द्यावे म्हणतो....