किराणा घराण्याचा संक्षिप्त इतिहास...
सप्रेम नमस्कार मंडळी..
आज आपण किराणा घराण्याचा थोडक्यात आढावा घेऊयात..
किराणा घराण्याचा इतिहास हा थोडासा विचित्र आणि थोडासा वादातीत आहे तरीही ते घराणं सर्वात जास्त लोकप्रिय आहे.
असं सर्वसाधारण समज आहे की किराणा घराणं उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेबांपासून सुरु होतं.पण ते काही खरं नव्हे. तर, अमिर खुस्त्रोचा शिष्य 'गोपाल नायक' किराणा घराण्याचा खरा आद्य पिता आहे. त्याच्यापासुन किराणा घराणं सुरु झालं. पुर्वी तो दुताई नावाच्या यमुनातीरी असलेल्या गावी रहात असे. पण त्याने यमुनेच्या पुरामुळे आपला मुक्काम मुझफ्फरनगर जिल्ह्यातील 'किराणा' ह्या गावी हलवला.
मिसळपाव