Skip to main content

आणखी किती सतिश शेट्टी?

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शनिवार, 06/02/2010 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
आणखी किती सतिश शेट्टी? हा लोकशाही उत्सवांतर्गत पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळात २९ जाने २०१० रोजी एक परिसंवाद झाला. परिसंवाद लोकशाही उत्सव समितीने आयोजित केला होता व सतिश शेट्टींना समर्पित केला होता. परिसंवादात माहिती अधिकार क्षेत्रात काम करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश होता. सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर, मारुती भापकर नगरसेवक पिंपरी चिंचवड मनपा,सिमप्रितसिंग टाटा इन्स्टिट्युट ऒफ सोशल सायन्सेस यांची मुलाखत मुक्तपत्रकार व आपले मिपाकर श्रावण मोडक व नर्मदा बचाव आंदोलनातील सामाजिक कार्यकर्त्या सुनीती सु र यांनी घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद चव्हाण यांनी केल.

होमींग पिजन - कुशल वाटाड्या कबुतर

लेखक अजय भागवत यांनी रविवार, 24/01/2010 07:44 या दिवशी प्रकाशित केले.
कबुतराच्या अचूकतेने घरी परतण्याच्या कुशलतेची माहिती मानवाला खूप आधी पासुन होती असे दिसते. ह्या कुशलतेचा वापर मानवाने लगेचच केला. ज्यांना हे कळाले की, कबुतरांमधेच असे काहीतरी विषेश आहे त्यांची स्तुती केलीच पाहिजे. इजिप्त्शियन संस्कृतीत कबुतरांचा वापर झाल्याचे दाखले आहेत. भारतीय पुराणात काही दाखले आहेत की नाही माहीत नाही. दुसऱ्या विश्वव्यापक युद्धात जर्मनीने कबुतरांचा वापर निरोप्या म्हणून तर केलाच पण त्यांच्या मानेखाली बटू-क्यामेरे लावून चित्रफित मिळवली व युद्धात ह्या माहितीचा वापर केला.

वेगळे विदर्भ राज्य आणि महाराष्ट्रातील वीजनिर्मिती

लेखक सुहास यांनी बुधवार, 20/01/2010 05:33 या दिवशी प्रकाशित केले.
वेगळे विदर्भ राज्य आणि महाराष्ट्रातील वीजनिर्मिती आज २० जानेवारीला विदर्भात वेगळ्या विदर्भ राज्यासाठी हरताळ पाळण्यात येत आहे. काही राजकीय पक्षांनी आणि संघटनांनी त्याला पाठींबा दिलाय (यात काँग्रेस आणि (पश्चिम महा)राष्ट्रवादी काँग्रेस देखील सामील आहेत). फक्त स्वतःसाठी एक वेगळे राजकीय कुरण मिळावे हाच या राजकीय पक्षांचा हेतू आहे हे स्पष्ट आहे. मला स्वतःला वेगळे विदर्भ झाल्यानेच तेथील समस्या सुटणार असतील तरच ते वेगळे राज्य व्हावे असे वाटते.. असो.

मुंबई पोलिस आयुक्तांशी थेट संपर्क साधण्यासाठी..

लेखक बहुगुणी यांनी गुरुवार, 07/01/2010 00:09 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई पोलिस आयुक्तांशी थेट संपर्क साधण्यासाठी cpmumbai09@gmail.com या पत्यावर तुम्ही इ-मेल करू शकता असं श्री. शिवानंदन यांनी कळवलं आहे. पोलिसांसंबंधी इतर माहितीसाठी www.mumbaipolice.org या संस्थळाचा उपयोग करावा असंही ते सुचवतात.

भाषावार प्रांतरचनेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग ३

लेखक सातारकर यांनी सोमवार, 04/01/2010 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
मनसे च्या वादळानंतर मी ही माहीती इतरांना (अर्थातच ज्यांना नसेल त्यांना) देण्याच्या उद्देशान हे लिहायला घेतल खरं.

भ्रष्टाचाराच्या विरोधात 9158242424

लेखक बहुगुणी यांनी रविवार, 03/01/2010 21:31 या दिवशी प्रकाशित केले.
भ्रष्टाचाराच्या विरोधात हे एक चांगलं पाऊल ठरू शकेल असं वाटतं, लोकांनीच निर्भीडपणे आणि निर्भयपणे अँटी करप्शन ब्युरोला सहकार्य करणं महत्वाचं आहे. ----------------- वरील लेखाचा विषय महत्वाचा असल्याने त्या दुव्यातील महत्वाचा भाग खाली सार्वजनीक माहीती म्हणून देत आहे. - संपादक
सरकारी-निमसरकारी कार्यालयातील भ्रष्टाचाराचे पीक कमी करण्यासाठी ऍंटी करप्शन ब्युरोने यापूर्वीही अनेक उपक्रम राबविले आहेत.

सांगा पतंग कुणी हा पाहिला?

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 25/12/2009 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
सांगा पतंग कुणी हा पाहिला? संक्रांतीचे दिवस जसे जवळ येतात तसे पतंग उडवण्याचेही दिवस येतात. काही ठिकाणी नोव्हेंबर महिन्यातच पतंग उडवायला सुरूवात करतात. पतंग उडवण्याचा आनंद अनेक जण लुटतात. या आनंदाच्या वेळी अनेक वेळा अपघात होतात व अनेक जण आपल्या प्राणाला मुकतात. मी पतंगामुळे होणार्‍या नेहमीच्याच अपघातांबद्दल- जसे वीज वाहक तारेला स्पर्श होणे, उंच इमारतीवरून पडणे आदी.- बोलणार नाही. हे असले अपघात पतंग उडवणार्‍यांना होतात. पतंग उडवणारे जर काळजी घेवून उडवत नसतील तर होणार्‍या परिणामांना तेच जबाबदार असतात. हे ठिक आहे.

म्हसवे - सर्वात मोठा वटवृक्ष

लेखक दशानन यांनी सोमवार, 21/12/2009 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवारी घरी निघावे म्हणून निघालो होतो. पाचवडच्या थोडे आधी एका हॉटेल मध्ये ब्रेकफास्टसाठी थांबलो. पुणे ते घर २६२ किमी चा प्रवास. त्यामुळे खूप वेळ हातात आहे असे वाटत होते. फोन चाळताना पुनेरींचा नंबर दिसला. एक कॉल केला व त्यांना येथे आसपास पाहण्यासारखं काही आहे का ते विचारलं. तर त्यांनी मला म्हसवे गावाचं नाव सांगितले पाचवडहून उजव्या हाताला वळलो. चांगले दहा एक किलोमीटर पुढे गेलो तरी काही वडाच्या जंगलाच्या खाणाखुणा दिसत नव्हत्या. शेवटी एकाला थांबवला आणि त्याविषयी विचारले. तर तो म्हणाला उलट आला आहात. सरळ परत पाचवडला जा, तेथून डाव्या बाजूने सरळ जाऊन पहिला उजवा कट मारा.