Skip to main content

लेखन स्पर्धा २००९

लेखक मोहन यांनी सोमवार, 09/11/2009 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर लेखकांकरता माहिती, पु.ल. देशपांडे जयंती निमित्ताने, puladeshpande.net या संस्थळाने लेखन स्पर्धा २००९ आयोजित केली आहे. महाविद्यालयीन व खुल्या अशा दोन गटात ही स्पर्धा आहे. ३० नोव्हें. अंतिम तारीख आहे. या बद्द्लची अधिक माहिती इथे पाहू शकाल. स्पर्धेत भाग घेणारे इच्छुक लेखकांना शुभेच्छा. आपला मोहन.

मराठी अभिमान गीत कोरस ध्वनीमुद्रण

लेखक अजय भागवत यांनी मंगळवार, 03/11/2009 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
कौशल इनामदार ह्यांच्या पुढाकाराने खालील एकमेवाद्वितीय कार्यक्रमाचे आयोजन त्यांच्या "मराठी अस्मिता" ह्या संस्थेने केले आहे. त्याबद्दल माहिती मिपाकरांना द्यावी ह्या उद्देशाने, त्यांच्या संस्थळावरील माहिती खाली दिली आहे- "मराठी अभिमान गीताचं काम आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. या गाण्याच्या ध्वनिमुद्रणाचा शेवटचा टप्पा म्हणजे एकत्र २०० गायक-गायिकांचं एका वेळी ध्वनिमुद्रण. आपल्यापैकी ज्यांना एका पट्टीमध्ये, बऱ्यापैकी सुरात गाता येतं त्यांनी या ध्वनिमुद्रणात अवश्य सहभागी व्हावं. हा कार्यक्रम नाही, ध्वनिमुद्रण आहे. त्यामुळे आलं की गावं लागेल हे लक्षात ठेवावं!!!

लक्ष्मण यादव अहिरे: एक सायकलपटू समाजसेवक

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 03/11/2009 06:10 या दिवशी प्रकाशित केले.
लक्ष्मण यादव अहिरे: एक सायकलपटू समाजसेवक आज आपण एका सायकलपटू असलेल्या सामाजसेवकाला भेटणार आहोत. नाव आहे लक्ष्मण यादव अहिरे. त्यांनी सायकलवर भारतभ्रमण केले आहे. ते वयाच्या ७१ व्या वर्षी अजूनही सायकलवरून नशिक उजैन अशी स्वारी करू शकतात. आजही पुढील महीन्यात आपला ७२ वा वाढदिवस साजरा केल्यानंतर सायकलवरून 'इंधन बचाओ' हा संदेश घेवून भ्रमण करण्यास ते निघणार आहेत.

'अग तारा गाव झोपलाय सारा'

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 31/10/2009 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
'अग तारा गाव झोपलाय सारा' हे गीत श्री. प्रल्हाद शिंदे यांनी आपल्या दमदार आवाजात गायलेले आहे. गीतकार आपल्या ताराला 'आता रात्रीचे बारा वाजलेत व सारा गाव झोपलाय' असे सुचवतो. हे गाणे ऐकून काही मंडळी आपली नाके मुरडतील पण जनसामान्यांना असलीच गाणी आवडतात व जनसामान्यांचीच संख्या जास्त आहे. दुर्बोध, र ला र ट ला ट टाईप कवितांपेक्षा त्यांना असलीच डोक्याला ताप न देणारी गाणी आवडतात.

चाळीशी

लेखक विकास यांनी गुरुवार, 29/10/2009 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
"A mere forty years ago, beach volleyball was just beginning. No bureaucrat would have invented it, and that's what freedom is all about."
Newt Gingrich (अमेरीकन राजकारणी नव्वदच्या दशकातील रीपब्लीकन सभापती)
आज हे वरील वाक्य आठवायचे कारण जरा "स्पेश्शल" आहे. ज्या एका जाळ्यात गुंतत तुम्ही आम्ही आज केवळ मराठी संकेतस्थळांपुरतेच नाही तर दिवसातील अनेक गोष्टी करत असतो, त्याच्या शिवाय जगणे अशक्यच, ज्याने जगात वैचारीक मुक्तपणा (freedom)आणला... अशा एका तंत्रज्ञानाचा "औपचारीक" चाळीसावा वाढदिवस आहे.

"एक्स्पोर्ट सरप्लस"

लेखक सुधीर काळे यांनी गुरुवार, 29/10/2009 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
"एक्स्पोर्ट सरप्लस" दहा-पंधरा वर्षांपूर्वी भारतात एकादा माल "एक्स्पोर्ट सरप्लस आहे" असे सांगणे म्हणजे अप्रत्य़क्षपणे त्या मालाच्या प्रतीबद्दल (qualityबद्दल) ग्वाही देण्याचाच एक भाग होता.

एक वेगळे जग- सीमलेस ट्युब

लेखक अजय भागवत यांनी बुधवार, 28/10/2009 19:50 या दिवशी प्रकाशित केले.
बॉल-बेअरींग, बंदूकीच्या आणि तोफांच्या नळ्या, प्रत्येक दुचाकी/चारचाकीचे सांगाडे, बॉम्बशेल, अनेक आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भव्य इमारती आणि जमीनीतून कच्चे तेल काढण्यासाठी तयार केलेल्या विंधणविहीरींच्या केसिंगसाठी ज्या सीमलेस ट्यूब वापरल्या जातात त्या कशा तयार करतात ह्याची माहिती अगदी थोडक्यात येथे द्यावीशी वाटते. ६० च्या दशकात जमशेदपुरला आपल्या देशातील पहिला प्रकल्प ईटलीच्या तंत्रज्ञानांच्या मदतीने उभा राहिला.

मिपाचे वैभव...

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 27/10/2009 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मिपाकरहो, हे मिपाचे वैभव! हे केवळ अन् केवळ तुम्हा सर्व मिपाकरांमुळेच शक्य आहे. मी सर्वांचा ऋणी आहे.. आपला, (कृतार्थ आणि कृतज्ञ) तात्या अभ्यंकर.