~ गंध धुंद ~

लेखनविषय:
कोणे एके काळी विमानतळावर ड्युटी फ्री शॉप दिसलं की दारू गोळा करणे ही एक “ड्युटी” मानून, मी ती अगदी निष्ठेनं पार पाडत असे. नाकासमोर चालण्याचा स्वभाव, नाकाला इतर कुठल्याही प्रलोभनांना बळी पडू न देता नेमक्या दुकानात घेऊन जाई. हव्या त्या बाटल्या मिळाल्या की त्या ड्युटी मधून एकदाचं फ्री झाल्यासारखं वाटायचं. जरा वेळापूर्वी मुक्त असलेले दोनही कर, करमुक्त दुकानातून घेतलेल्या जड बाटल्या सावरण्यात गुंतले की इतर जाणिवा मुक्त होत ज्यात सर्वत्र दरवळणाऱ्या सुगंधाचीही एक असे.

मिताली राजला आउट करणारी नांदेडची मुलगी

लेखनप्रकार
नमस्कार. भारतीय मुलींच्या टीमबरोबर त्यांचं कौतुक करणार्‍यांचंही अभिनंदन! एक खूप वेगळी क्रांती घडते आहे. मुलींच्या खेळाबद्दल आणि एकूणच खेळाच्या जगताबद्दलसुद्धा. परवा मुलींचा सन्मान करणार्‍या मिताली राजला बघून तिला आउट करणारी नांदेडची मुलगी मात्र सारखी आठवते! मिताली राज १९९९ ते २०२२ ही २३ वर्षे भारतासाठी खेळत होती. सर्वांत कमी एकदिवसीय सामन्यांमध्ये एक हजार रन्स करणारा भारतीय खेळाडू हा विक्रम तिच्याच नावावर आहे. २००८ मध्ये ती कॅप्टन असताना अनेक ठिकाणी नवीन खेळाडू शोधायला जायची. तेव्हा ती नांदेडला आली होती. आणि ज्युनियर क्रिकेट खेळणार्‍या एका १६ वर्षांच्या मुलीने तिला आउट केलं होतं!

मुलांच्या निसर्ग शिबिराचा आनंद सोहळा!

लेखनविषय:
लेखनप्रकार
मुलांच्या निसर्ग शिबिराचा आनंद सोहळा! ओढा, स्विमिंग पूल, बेडकं, खेकडोंगर ट्रेक‌ आणि मस्ती की पाठशाला ✪ पानी‌ में शिरा और मस्त पोहा! ✪ अंजवेलमधलं भूताचं झाड… ✪ जोडसाखळी, विष- अमृत, नौकायुद्ध आणि रस्सीखेच ✪ "विराट कोळी" आणि झाडावरच्या लढाऊ मुंग्या! ✪ तोडलेल्या फेविकॉलच्या जोड्या आणि पाठलाग ✪ खजिन्याचा शोध आणि तुंग- तिकोना ✪ हेलिकॉप्टर उडवणारे काका आणि वेगळ्याच गप्पा ✪ अंजनवेलची आपुलकी आणि घरपण ✪ सारखी तीच ती‌ संख्या कशी येतेय? ✪ चंद्र- सूर्य आणि ग्रह- तारे ✪ मुलांचा स्वत: खेळण्याचा उत्साह आणि आनंद ✪ शिबिरातले खास टॉम अँड जेरी! ✪ मस्ती, खेळ, लढाई, टीम वर्क आणि

धूमकेतू C/2025 A6 (Lemmon) बघण्याचा रोमांच

लेखनविषय:
लेखनप्रकार
अंजनवेलमधील निसर्गाचे नयनरम्य अविष्कार! ✪ दोन धूमकेतू सध्या छोट्या टेलिस्कोपने बघता येतात ✪ धूमकेतू C/2025 A6 (Lemmon)- १३९६ वर्षांनी भेटायला आलेला पाहुणा! ✪ सब्र का फल मिठा- अखेर झाले मोकळे आकाश! ✪ अंजनवेलमधला निसर्ग- ढग, पाऊस आणि दवाचा पाऊस ✪ निरव शांततेत ओढ्याची कोसळधार, नितळ आकाश आणि तारेच तारे ✪ सितारों की महफील में कर के इशारा ✪ धुक्याच्या दुलईत पहुडलेले पर्वत ✪ विविधरंगी फुलांचा बहर आणि सह्याद्रीची श्रीमंती ✪ अंजनवेलमध्ये धूमकेतू निरीक्षण सत्र आणि मुलांसाठी हिवाळी शिबिर नमस्कार.

माहिती: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शंभर वर्ष

लेखनविषय:
लेखनप्रकार
या वर्षी विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होतील. अजून पर्यन्त मिसळपाव वर देशातील सर्वात मोठ्या संस्कृतिक आणि सामाजिक संघटणे बाबत एक ही लेख आला नाही. माझा संघाशी प्रत्यक्ष संबंध फारसा आलेला नाही तरीही मी विचार केला अंतराजलावर फिरून आपणच माहिती घ्यावी आणि मिसळपावकरांसाठी सादर करावी. आज RSS च्या ५ लाखांहून अधिक शाखा देशभर कार्यरत आहेत. या शाखा सांस्कृतिक राष्ट्रवाद, व्यक्तिमत्त्व विकास, आणि नैतिक शिक्षण यावर भर देतात.

खपली

लेखनविषय:
लेखनप्रकार
सिद्धार्थने लवंगी फटाका पेटवून अंधाऱ्या बोळात फेकला. फट्ट! असा आवाज बोळात घुमला, क्षणभर उजेड पसरला , आणि सिद्धार्थ पुटपुटला, " कोणीतरी बसलंय मागच्या कंपाउंडवर. " त्याने एक कागद मशालीसारखा पेटवून हातात धरला, कागदाच्या थरथरणाऱ्या ज्वाळेच्या प्रकाशात तो आणि मित्रांची गॅंग कंपाउंडकडे निघाली. " अरे ! शिरीष एवढ्या अंधारात काय करतोयस इथे ? " सिद्धार्थने विचारले. प्रकाशात त्याला शिरीषच्या डोळ्यात अश्रू दिसले. त्याने शिरीषला भिंतीवरून खाली उतरवले. ताईच्या सासर्‍यांची तब्येत बरी नसल्याने, ती मागील दोन वर्ष माहेरी आली नव्हती.

डोक्याला खुराक देणारा रंगतदार ‘ठोकळा’

लेखनविषय:
लेखनप्रकार
ही घटना सन 1974 ची . . . हंगेरीतील वास्तुरचनाशास्त्राचे प्राध्यापक एरनो रुबिक आपल्या विद्यार्थ्यांना त्रिमितीय रचना समजावून सांगायचे तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, यासाठी निव्वळ तोंडी शिकवण्याबरोबर एखादे पूरक शैक्षणिक साधन निर्माण केल्यास विद्यार्थ्यांना ही संकल्पना समजायला सोपी जाईल. मग विचारांती त्यांनी विशिष्ट प्लास्टिकच्या घटकांचा वापर करून 3 X 3 X 3 रचनेत एक क्यूब तयार केला. त्यामध्ये त्याच्या सहा पृष्ठभागांवर सहा वेगळ्या प्रकारचे रंग दिसणार अशी ती रचना होती.

चंद्रग्रहण अनुभूती: हा खेळ सावल्यांचा!

लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार! काल रात्रीच्या चंद्रग्रहणाचा अनुभव अविस्मरणीय होता. सुरूवातीला ढग आणि पाऊस! त्यामुळे "संपेल ना कधी हा खेळ (ढगांच्या) सावल्यांचा" असं वाटत होतं. चंद्राला आधी ढगांचं ग्रहण लागलं होतं. दोन टेलिस्कोप व बायनॅक्युलरसह आम्ही मित्र तयार होतो. पण ढग होते. ढगात असतानाच चंद्र पृथ्वीच्या उपछायेत जाऊन ग्रहणाची सुरूवात झाली. पण सूर्य इतका तेजस्वी आहे की, तो अंशत: झाकला गेला तरी चंद्राच्या तेजात लक्षात येईल असा फरक पडत नाही. नंतर जेव्हा चंद्राने पृथ्वीच्या मुख्य सावलीत प्रवेश केला (सूर्य पूर्णपणे पृथ्वीच्या आड गेला) तेव्हा मात्र चंद्राची कडा काळी झालेली दिसली. पण सतत ढग होते.

सोबत. . . अखेरच्या क्षणांची

लेखनविषय:
लेखनप्रकार
दीर्घकालीन दुर्धर आजार अनेकांच्या वाट्याला येतात. संबंधित आजाराचे सर्व उपचार करून डॉक्टर्स थकले की शेवटी रुग्णाच्या नातेवाईकांना अंतिम सल्ला दिला जातो तो म्हणजे, “आता मृत्यूची वाट पाहण्याखेरीज आपल्या हातात काही नाही”. खरंय, अशा केसेसमध्ये मृत्यू हा अंतिम आणि नैसर्गिक ‘उपाय’ ठरतो. अशा तऱ्हेने त्या रुग्णाचे आयुष्यातील अखेरचे पर्व चालू होते आणि ते किती काळ चालेल हे अनिश्चित असते. आपल्या जिवलग अथवा कुटुंबीयांच्या मृत्यूची चाहूल लागणे हा कुतुहलमिश्रित दुःखद विषय असतो. प्रत्यक्ष मृत्यू होईपर्यंत कुटुंबीय अथवा सेवक अशा कोणाला ना कोणाला तरी रुग्णाची सोबत करावी लागते.

४३ दिवस हिमालयात अडकलेला माणूस!

लेखनविषय:
लेखनप्रकार
- वैद्यकीय शिक्षण घेत असलेला ऑस्ट्रेलियन जेम्स स्कॉट - "तिथे" ३ दिवसांहून जास्त काळ कोणीही तग धरू शकणार नाही - बहीण जोआनचं प्रेम व तिने केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा - कराटेतून मिळालेलं शरीर, प्रसंगावधान, शिस्त आणि धैर्याची कसोटी - सोबतीला जीवाभावाच्या माणसांच्या आठवणी, प्रेम आणि फक्त बर्फ! - छोट्या गोष्टींमधून साध्य केलेलं आत्मबळ - ध्यानाद्वारे अचूक जागा सांगणारे रिनपोचे थरंगू लामा - ऑस्ट्रेलियन लोकांची हिंमत, आत्मविश्वास आणि हट्ट - "तू देव आहेस, कारण कोणीच माणूस इथे असा राहू शकत नाही!" - सुटकेनंतरचा अनपेक्षित घटनाक्रम नमस्कार!
Subscribe to लेख