Skip to main content

भाषांतर

शोध स्वत्वाचा

लेखक आतिवास यांनी शनिवार, 07/12/2013 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
१९६७ ची गोष्ट. एका वीस वर्षांच्या मुलीचं लग्न. मागणी मुलाने घातलेली. मुलगी मंगलोरची; मुलगा मुंबईचा. टाटा कंपनीतला पगारदार. मुलीला वडील नाहीत. विधवा आईच्या पदरी पाच मुली. मुलगा “हुंडा नको” म्हणतो – ही आणखीच चांगली गोष्ट. मुलाला आणखी नऊ भावंड आहेत. लग्न होतं. पहिल्यांदा जेव्हा नवरा “मी तुला मारेन” म्हणतो, तेव्हा तिला “तो गंमत करतोय” असं वाटतं. पण नवरा खरंच मारहाण करायला लागतो तिला. अगदी नेहमी. कारण? काहीही. कारण असो वा नसो – मार ठरलेला. कधीही, कसाही. कधी हाताने, कधी हाती लागेल त्या वस्तूने – लाकडी हँगर, पट्टा ... तिचा दम्याचा विकार उफाळून येतो या ताणाने.

युद्धकथा १०- फेलिक्स कर्स्टन-हिमलरचा डॉक्टर.......भाग-२

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 04/12/2013 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
युद्धकथा १०- फेलिक्स कर्स्टन-हिमलरचा डॉक्टर.......भाग-१ युद्धकथा -१० फेलिक्स कर्स्टन-हिमलरचा डॉक्टर. भाग - २ Simple, Free Image and File Hosting at MediaFire .......ज्या इस्पितळात कर्स्टन त्याचे प्रशिक्षण घेत होता तेथे हेलसिंकीचा प्रसिद्ध डॉक्टर, डॉ. कोलँडर नियमीत येत असे.

<नवविवाहिताचे बाबांस पत्र>

लेखक राजेश घासकडवी यांनी मंगळवार, 03/12/2013 06:01 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा (शुद्धलेखनाचा दर्जा मूळ लेखनाबरहुकुम ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे) प्रिय बाबा, प्रत्येक मुलाप्रमाणे मी ही लग्नाबद्द्ल लहानपणापासुन खुप उत्सुक होतो. माझ्या बेबी डॉल, ड्रीम गर्लची स्वप्ने रंगवत होते. पण आज मला जाणिव होते आहे की लग्न म्ह्णजे फक्त अमर्याद सेक्स न्ह्वे. लग्न म्हणजे केवळ तुमच्या लाडक्या व्यक्ति सोबत हवे तेव्हा हवे ते करणे न्हवे.

नवविवाहितेचे आईस पत्र ........

लेखक युगन्धरा@मिसलपाव यांनी सोमवार, 02/12/2013 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय आई, प्रत्येक मुलिप्रमाणे मी ही लग्नाबद्द्ल लहानपणापासुन खुप उत्सुक होते. माझ्या राजकुमाराची स्वप्ने रंगवत होते. पण आज मला जाणिव होते आहे की लग्न म्ह्णजे फक्त गुलाबी स्वप्ने न्ह्वेत. लग्न म्हणजे केवळ तुमच्या लाडक्या व्यक्ति सोबत राहाणे न्हवे. तर त्याहि पलिकडे लग्न म्ह्णजे जबाबदार्या, त्याग आणि तडजोडी यांवर अवलंबुन असलेली एक संस्था आहे. मी मला हव्या तितका वेळ झोपु नाहि शकत. मला सर्वांच्या आधी उठणं गरजेच आहे. मी गबाळयासारखी घरभर फिरु नाहि शकत. मी टापटीप राहाणं गरजेच आहे.

हान्का सरोवरावरचे बर्फाचे वादळ व देरसूचा निरोप........भाग ६

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 18/10/2013 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
भाग-१ - निशाचर भाग-२ - डुकराची शिकार भाग-३ - कोरियन गाव भाग-४ - लेफू नदीतून भाग-५ - दलदलीत ६ हान्का तलावावरचे वर्फाचे वादळ. देरसू हान्का लेकला केन्का लेक म्हणतो. याला तलाव म्हणणे धाडसाचे होईल. याचा आकार एखाद्या अंड्यासारखा असून वर तो ३७ मैल आहे तर निमुळत्या भागात तो जवळजवळ याच्या अर्धा आहे.

देरसूचा निरोप............भाग-५ ......... दलदलीत......

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 17/10/2013 18:12 या दिवशी प्रकाशित केले.
भाग-१ - निशाचर भाग-२ - डुकराची शिकार भाग-३ - कोरियन गाव भाग-४ - लेफू नदीतून ५-दलदल. संध्याकाळी मी व देरसू नेहमीप्रमाणे गप्पा मारत असताना ऑलेन्टिएव्ह व मार्चेंको परत आले. धगधगत्या आगीवर किटली बारीक शीळ घालत होती. देरसूने ती जरा हलवली पण त्यातून येणारा आवाज काही कमी झाला नाही. त्याने ती अजून सरकविली. ‘कसा रडतोय बघ ! वाईट माणूस’ ‘देरसू, हा माणूस कसा ?’’ मी विचारले. ‘तो रडतो, गातो व खेळतो सुद्धा’.

देरसूचा निरोप...........भाग-४...लेफू नदीतून..

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 16/10/2013 23:10 या दिवशी प्रकाशित केले.
भाग-१ - निशाचर भाग-२ - डुकराची शिकार भाग-३ - कोरियन गाव ४ दुसऱ्या दिवशी मी ऑलिन्टिएव्ह व मार्चेंको नावाच्या रायफलमनला माझ्याबरोबर घेतले आणि इतरांना चेर्निगोव्हका नावाच्या गावाजवळ आमची वाट पहायला सांगितले. गावपुढाऱ्याच्या मदतीने आम्ही एक सपाट बुडाची, बऱ्यापैकी सुस्थितीतील बोट मिळविली पण त्यासाठी आम्हाला त्याला तब्बल १२ रुबल्स रोख व तीनचार व्होडकाच्या बाटल्या द्याव्या लागल्या.

देरसूचा निरोप.............भाग-३....कोरियन गाव..

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 16/10/2013 07:52 या दिवशी प्रकाशित केले.
भाग-१ - निशाचर भाग-२ - डुकराची शिकार ३ कोरियन गाव... सकाळी मी उठलो तर काय सगळेच उठून आवराआवर करत होते. ‘जरा उशीरच झाला उठायला’ मी मनात म्हटले. पण उठल्या उठल्या माझ्या लक्षात कोणती गोष्ट आली असेल तर ढगाळ आकाश. सूर्यमहाराज त्या ढगाआड अदृष्य झाले होते. सगळे जण संभाव्य पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून त्यांचे सामान काळजीने बांधत होते. ते बघून देरसू म्हणाला, ‘घाई नाही. आज रात्री पाऊस. आत्ता नाही.’ मी त्याला विचारले हे तो कसे काय सांगू शकतो तर तो म्हणाला, ‘तुम्हीच बघा. छोटे पक्षी येतात जातात.

देरसूचा निरोप..........भाग २ - डुकराची शिकार !

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 15/10/2013 10:19 या दिवशी प्रकाशित केले.
भाग-१ - निशाचर २ रानडुक्कराची शिकार चहाचे दोन तीन कप प्यायल्यानंतर सैनिकांनी घोड्यांवर सामान लादायला सुरवात केली. देरसूनेही त्याचे सामान आवरायला घेतले. माझे त्याच्याकडे बारीक लक्ष होते. त्याने पहिल्यांदा त्याचा पिट्टू एका झटक्यात पाठीवर चढवला व झाडाच्या बुंध्याला टेकवून ठेवलेली त्याची रायफल उचलली. थोड्याच वेळात आमची पलटण मार्गस्थ झाली. ज्या घळीतून आम्ही मार्ग काढत होतो ती एखाद्या सापासारखी पसरली होती. तिला मधेच अनेक छोट्या घळी येऊन मिळत होत्या. त्या सगळ्या मार्गावर झरे व धबधबे त्या दरीत पाणी ओतत होते.

एका रशियन गुप्तहेराची थरारकथा !!

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 07/10/2013 13:46 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तक: वर्ल्ड फ़ेमस अडव्हेंचर्स लेखक: अभय कुमार दुबे आवृत्ती: 2008 प्रकरण 21: द सिक्रेट एजंट हू सेव्ह्ड द वर्ल्ड अनुवाद: निमिष न. सोनार, धानोरी, पुणे एका रशियन गुप्तहेराची थरारकथा !! सोर्गि हा देशभक्त गुप्तहेर होता. केवळ पैसे आणि वलय यासाठी तो या क्षेत्रात आला नाही. तो देशभक्त होता आणि त्याची इच्छा नाझींचे निर्दालन करून रशियाला आणि जगाला त्यांच्यापासून वाचवणे ही होती. त्याने हे प्रत्यक्षात आणले ते अशी एक माहिती रशियाला पुरवून की जी हिटलर ची सद्दी संपवायला पुरेशी ठरली. जागतिक दुसरे महायुद्ध अगदी जोरात होते त्यावेळची ही गोष्ट.